Gotabaya Rajapaksa Resigns: गोटाबाया राजपक्षे यांनी ईमेलद्वारे दिला श्रीलंकेच्या राष्ट्रपतीपदाचा राजीनामा, मालदीवनंतर सिंगापूरला पोहोचले
Sri Lanka's President Gotabaya Rajapaksa Resign: गोटाबाया राजपक्षे यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिला आहे. गोटाबाया यांनी आपला राजीनामा ई-मेलद्वारे श्रीलंकन संसदेच्या अध्यक्षांना पाठवला आहे.
Sri Lanka's President Gotabaya Rajapaksa Resign: गोटाबाया राजपक्षे यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिला आहे. गोटाबाया यांनी आपला राजीनामा ई-मेलद्वारे श्रीलंकन संसदेच्या अध्यक्षांना पाठवला आहे. गोटाबाया राजपक्षे यांनी बुधवारी देश सोडला आणि ते मालदीवला गेले. तेथे एक दिवस मुक्काम केल्यानंतर ते आज सिंगापूरला पोहोचले आहेत.
याच दरम्यान सिंगापूर सरकारने गोटाबाया राजपक्षे खासगी भेटीवर आल्याचे म्हटले आहे. सिंगापूर सरकारने म्हटले आहे की, गोटाबाया यांनी आमच्याकडे आश्रय मागितला नाही. तसेच आम्हीही त्यांना आश्रय दिला नाही. दरम्यान, श्रीलंकेत मोठ्या संख्येने अजूनही लोक रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी लष्कराला मैदानात उतरावे लागले आहे. श्रीलंकेच्या सरकराने एका निवेदनात म्हटले आहे की, श्रीलंकेच्या लष्कराने आंदोलकांना सर्व प्रकारच्या हिंसाचारापासून दूर राहण्याचे किंवा परिणामांना सामोरे जाण्यास तयार राहण्याचे आवाहन केले आहे. कारण सशस्त्र दलाच्या सदस्यांना मानवी जीवनास धोका, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाल्यास बळ वापरण्याची कायदेशीर परवानगी देण्यात आली आहे.
बुधवारी श्रीलंकेत पंतप्रधान कार्यालय आणि संसदेच्या मुख्य रस्त्यावर आंदोलकांची सुरक्षा दलांशी झटापट झाली. ज्यात 84 लोक जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बॅरीगेटिंग अडथळे तोडून प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश करण्याचा प्रयत्न करणाऱ्या जमावावर पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या आणि पाण्याचा मारा केला. दरम्यान, श्रीलंकेत शुक्रवारी होणारी संसदेची बैठक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. अध्यक्ष महिंदा यापा अभयवर्धने यांनी सांगितले की, राष्ट्रपतींचा राजीनामा प्राप्त झाल्यानंतर तीन दिवसांत संसद बोलावण्यात येईल. गोटाबाया राजपक्षे यांनी आज संध्याकाळी राजीनामा दिल्याने संसद बोलावण्याची प्रक्रिया पुन्हा सुरू होण्याची अपेक्षा आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
- Joe Biden visit to Israel and Saudi Arabia : इराण सैन्य दहशतवादी संघटनेच्या यादीत राहणार, हल्ल्याचा पर्याय खुला, ज्यो बायडेन यांचा इशारा
- Sri Lanka Crisis : आधी मालदीव, मग सिंगापूर, आता सौदी अरेबिया... राष्ट्रपती गोटाबाया यांची पळापळ
- Sri Lanka Crisis : श्रीलंकेतील आर्थिक परिस्थिती आणखी चिघळली, आंदोलनात 84 जण जखमी