Sri Lanka Economic Crisis : श्रीलंकेत महागाईने तोडले सर्व रेकॉर्ड, पेट्रोलपेक्षाही दूध महाग, पेट्रोल पंपावर हाणामारी
Sri Lanka Economic Crisis : श्रीलंकेतील महागाईच्या संकटाने सर्व रेकॉर्ड तोडले आहेत. डिझेलच्या तुटवड्यामुळे बस थांबल्या असून वीजनिर्मिती करणारे प्रकल्प बंद पडल्याने वीजपुरवठाही खंडित झाला आहे.
Sri Lanka Economic Crisis : भारताचा शेजारील देश श्रीलंकेची आर्थिक परिस्थिती सध्या अत्यंत बिकट आहे. तिथल्या रुग्णालयातील औषधे संपली आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या तीव्र टंचाईनंतर पंपावर फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. तर आता विजेचे संकटही निर्माण झाले आहे. श्रीलंकेतील महागाईने 2015 पासूनचा विक्रमी उच्चांक गाठला आहे. भाजीपाला आणि किराणा मालाचे भाव गगनाला भिडले आहेत.
वीजपुरवठा खंडित, ट्रेनही ठप्प
श्रीलंकेत डिझेलचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे परिणामी इथे बस आणि ठप्प झाल्या आहेत. इतकंच नाही तर वीजनिर्मिती प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालत नसल्याने वीजपुरवठा खंडित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. श्रीलंकेत डिझेलचा सर्वात मोठा तुटवडा आहे. बस, ट्रेन आणि पॉवर प्लांट तसेच इतर अनेक उद्योग डिझेलचा इंधन म्हणून वापर करतात. डिझेलच्या तीव्र टंचाईमुळे उद्योग पुरेशा क्षमतेने चालू शकत नाहीत. इंधनासाठी लोक हत्या करण्यासाठीही तयार आहे. त्यामुळे पेट्रोल पंपावर लष्कर तैनात करण्यात आलं आहे.
डिझोल अभावी 80 ते 90 टक्के बसेस बंद
श्रीलंकेचे ऊर्जा मंत्री जैमिनी लोकुगे यांनी सांगितले की, इंधन आणि गॅससाठी देशातील रांगा संपवण्यासाठी किमान सात महिने लागतील. श्रीलंकेत मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून 80 ते 90 टक्के बसेस बंद पडल्या आहेत. श्रीलंकेतील पेट्रोल पंपांबाहेर इंधनासाठी गाड्यांच्या लांबच लांब रांगा पाहणे आता सर्वसामान्य गोष्ट आहे. श्रीलंकेत पेट्रोलचा पुरवठा पुरेश्या प्रमाणात असल्यामुळे खासगी वाहनांवर याचा फारसा परिणाम होताना दिसत नाही.
रुग्णालयातील वीज खंडित
श्रीलंकेतील वैद्यकीय संघटना सरकारला रुग्णालयातील वीज खंडित न करण्याचे आवाहन करत आहेत. वीज खंडित झाल्यामुळे श्रीलंकेच्या कृषी क्षेत्रावरही परिणाम होत आहे. शेतकऱ्यांना विद्युत यंत्रे चालवता येत नाहीत. इंधनाअभावी ते पीकही बाजारात आणू शकत नाहीत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Coronavirus Cases Today : देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 1335 नवे रुग्ण, 52 जणांचा मृत्यू
- Jammu Kashmir : शोपियानमध्ये लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, एक दहशतवादी ठार, शोध मोहिम सुरू
- Chhatrapati Sambhaji Maharaj Punyatithi : छत्रपती संभाजी महाराजांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन! अजिंक्य शंभूराजांचा पराक्रमी इतिहास
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha