(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Coronavirus Cases Today : देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 1335 नवे रुग्ण, 52 जणांचा मृत्यू
Coronavirus Cases Today in India : देशात गेल्या 24 तासांत कोरोना विषाणूचे 1335 नवीन रुग्ण आढळले असून 52 जणांचा मृत्यू झाला आहे. काल कोरोनाच्या 1225 रुग्णांची नोंद झाली.
Coronavirus Cases Today in India : देशात आज कोरोना विषाणूच्या नवीन रुग्णांमध्ये किंचित वाढ झाली आहे. गेल्या 24 तासांत देशात कोरोना विषाणूचे 1335 नवीन रुग्ण आढळले असून 52 जणांचा मृत्यू झाला आहे. काल कोरोनाचे 1225 रुग्ण नोंदवले गेले आणि 28 जणांचा मृत्यू झाला होता. जाणून घ्या देशातील सध्याची परिस्थिती काय आहे.
सक्रिय प्रकरणांची संख्या 13 हजार 672 इतकी कमी झाली
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गुरुवारी दिवसभरात देशात 1 हजार 918 लोक बरे झाले होते. देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 13 हजार 672 झाली आहे. कोरोनामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या 5 लाख 21 हजार 181 झाली आहे. देशात आतापर्यंत 4 कोटी 24 लाख 90 हजार 922 लोक संसर्गमुक्त झाले आहेत. देशात आतापर्यंत 4 कोटी 30 लाख 25 हजार 775 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
आतापर्यंत 184 कोटींहून अधिक डोस देण्यात आले
देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत कोरोना प्रतिबंधात्मक लसींचे 184 कोटींहून अधिक डोस देण्यात आले आहेत. गुरुवारी दिवसभरात 23 लाख 57 हजार 917 डोस देण्यात आले. देशात आतापर्यंत 184 कोटी 31 लाख 89 हजार 377 डोस लसीचे देण्यात आले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आरोग्य कर्मचारी, कोरोना योद्धा आणि इतर आजारांनी ग्रस्त असलेल्या 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना 2 कोटींहून अधिक (2 कोटी 31 लाख 71 हजार 740) कोरोना लसी देण्यात आल्या आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Covid19 Restrictions : आजपासून महाराष्ट्र निर्बंधमुक्त; दोन वर्षांनंतर कोरोनाच्या नियमांपासून सुटका, मास्क सक्ती नाही
- 1 एप्रिलपासून बँकेचे नियम बदलणार, औषधं महागणार, जीएसटीतही बदल; जाणून घ्या काय आहेत 10 मोठे बदल
- PM Modi : 'परीक्षा पे चर्चा', पंतप्रधान मोदी साधणार 1 हजार विद्यार्थ्यांशी संवाद, परीक्षेच्या काळात तणावमुक्त होण्यावर चर्चा
- April Fool's Day : 'एप्रिल फुल डे' साजरा करण्यामागचं कारण माहिती आहे का? नसेल तर जाणून घ्या...
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha