(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Russia School Firing: रशियन शाळेत गोळीबार, 7 विद्यार्थ्यांसह 13 जण ठार
Russia School Firing: रशियातील एका शाळेत भीषण गोळीबार झाल्याची बातमी समोर येत आहे. या गोळीबारात अनेक विध्यार्थी जखमी झाल्याचं समजतं आहे.
Russia School Firing: रशियातील (Russia) एका शाळेत भीषण गोळीबार झाल्याची बातमी समोर येत आहे. या गोळीबारात अनेक विध्यार्थी (Students) जखमी झाल्याचं समजतं आहे. यामध्येच ज्या व्यक्तीने हा गोळीबार केला त्याने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याची माहिती स्थानिक माध्यमांनी दिली आहे. रशियाची मीडिया (Russian Media) संस्था आरटीने (RT) दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी इझेव्हस्क शहरातील एका शाळेत झालेल्या गोळीबारात 13 जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले.
स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये 7 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. हे विद्यार्थी शहरातील शाळा क्रमांक 88 मध्ये शिकत होते. हल्ल्यानंतर बंदूकधाऱ्याने आत्महत्या केल्याचे रशियाच्या तपास समितीने सांगितले. या हल्लेखोरांची ओळख पटवली जात आहे. गोळीबार करणाऱ्या या उक्तीने स्की मास्क आणि नाझी चिन्हे असलेला काळा टी-शर्ट घातल्याचे सांगण्यात येत आहे.
उदमुर्तियाचे गव्हर्नर अलेक्झांडर बर्चलोव यांनी सांगितलं की, मयत लोकांमधील एक हा शाळेचा शाळेचा सुरक्षा रक्षक होता. पत्रकारणशी बोलताना ते म्हणाले आहेत की, ''आज उदमुर्तिया येथे एक दुर्दैवी घटना घडली आहे.'' या घटनेबाबत रशियन शिक्षण मंत्रालयाने सांगितले आहे की, ज्या शाळेत गोळीबार झाला ती शाळा रिकामी करण्यात आली आहे.
घटनेचा व्हिडीओ आला समोर
या घटनेचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात घटनास्थळावरील कॅमेरा फुटेजमध्ये विद्यार्थी आणि शिक्षक इमारतीतून पळताना दिसत आहेत. यासोबतच अपघातग्रस्तांना स्ट्रेचरवर रुग्णवाहिकेत नेले जात आहे. तसेच या व्हिडीओत विद्यार्थी शाळेतील एका खोलीत जमा होताना देखील दिसत आहे. या भीषण घटनेमुळे संपूर्ण रशियात खळबळ उडाली आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून या घटनेतील हल्लेखोराने स्वतःवर गोळी झाडात आत्महत्या केली आहे. या व्यक्तीने हा गोळीबार का केला, यामागचं कारण पोलीस शोधत आहे.
आधीही शाळेत गोळीबार झाल्याच्या घटना आल्या आहेत समोर
गेल्या काही वर्षांत रशियातील शाळांमध्ये गोळीबाराच्या अनेक घटना घडल्या आहेत. गेल्या वर्षी मे महिन्यात काझान येथील शाळेत एका किशोरवयीन मुलाने सात मुलांसह नऊ जणांची गोळ्या झाडून हत्या केली होती. या वर्षी एप्रिलमध्ये बालवाडीत घुसून दोन मुले आणि एका शिक्षकाची एका बंदूकधाऱ्याने हत्या केली होती. या घटनेनंतर आरोपीने आत्महत्या केली.
महत्त्वाच्या इतर बातम्या