एक्स्प्लोर

Russia-Ukraine War : ...म्हणून वैद्यकीय शिक्षणासाठी भारतीय विद्यार्थ्यांची पहिली पसंती युक्रेन!

Russia-Ukraine War : भारतातील सर्वाधिक विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणासाठी युक्रेनला जातात. पण का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

Russia-Ukraine War : सध्या जगभरात एकाच विषयवार चर्चा सुरु आहे आणि ती म्हणजे, युक्रेन (Ukraine) आणि रशियामध्ये सुरू असलेलं युद्ध. या युद्धाचे पडसाद आता जगभरात उमटू लागले आहेत. एकीकडे तेलाची किंमत वाधारली आहे. तर दुसरीकडे भरतासह अनेक देशांमध्ये शेअर मार्केट चांगलच गडगडलं आहे. आताच्या परिस्थितीबाबत बोलायचं झालं तर रशियन आर्मीनं युक्रेनच्या खारकिवी हा दुसऱ्या मोठ्या शहरात प्रवेश केला आहे. तर युक्रेनची राजधानी किव्हकवर रशियाचं (Russia) सैन्य मोठा हल्ला करण्याच्या तयारीत आहे. सॅटेलाईट फोटोवरुन दावा करण्यात आला आहे की, रशियन सैन्य किव्हवर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत आहे. तर दुसरीकडे या युद्धात Nucelar शस्त्रांचा वापर होणार का? याकडे सर्वांचं लक्ष आहे. या संपूर्ण परिस्थतीत भारतासाठी महत्त्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे युक्रेनमध्ये अडकलेले भारतीय रहिवाशी. सध्या युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. यातील अनेकजण हे medical चे विद्यार्थी आहेत. युक्रेनमधील विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी भारतीय सैन्याकडून शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. अशातच भारतानं युक्रेनमधील नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना Airlift करणं सुरू केलं आहे. 

रशिया-युक्रेन युद्ध सुरु झालं आणि युक्रेनमध्ये शिक्षणासाठी गेलेल्या भारतीय विद्यार्थ्यांची संख्या समोर येऊ लागली. अनेक विद्यार्थ्यांचे मदतीसाठी आर्जवं करणारे व्हिडीओ व्हायरल झाले. अशातच सर्वांसमोर पडलेलं कोडं म्हणजे, एवढ्या मोठ्या संख्येनं भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये शिक्षणासाठी का जातात? यामागील काही कारण आम्ही शोधण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये असं समोर आलं की, सर्वाधिक विद्यार्थी हे MBBS चं शिक्षण घेण्यासाठी युक्रेनला जातात. 

पाहा व्हिडीओ : Why Indian Students Visit Ukraine : डॉक्टर होण्यासाठी भारतीय विद्यार्थ्यांची पसंती युक्रेनलाच का?

भारतीय विद्यार्थी डॉक्टर होण्यासाठी युक्रेनलाच का जातात? 
 
अनेकांना प्रश्न पडलाय की, भारतीय विद्यार्थी डॉक्टर होण्यासाठी युक्रेनलाच का जातात? नेमकी काय कारणं आहेत? जाणून घेऊया सविस्तर... 

जगभरात कुठेही शिक्षण घ्यायचं झालं तर पैसा लागतो. पैसा म्हणजे, जगण्यासाठी लागणारी मूलभूत गरज असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. त्यातल्या त्यात भारतीय, भविष्यासाठी पैशांची बचत करण्यात माहीर. हाच मुद्दा युक्रेन आणि MBBS चं शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांबाबत महत्त्वाचा आहे. युक्रेनमध्ये शिक्षणाचा खर्च भारतापेक्षा कमी आहे. म्हणजेच, 6 वर्षांच्या Medical कोर्ससाठी युक्रेनमध्ये 12 ते 18 लाख खर्च होणार असेल, तर भारतात प्रायव्हेट कॉलेजमध्ये तोच खर्च 80 लाख ते 1 कोटीपर्यंत जातो. त्यात युक्रेनमध्ये 30 हुन अधिक Medical कॉलेजेस असून Infrastructure वर त्या सरकारनं जास्त भर दिला आहे. त्यामुळे कमी खर्च आणि उत्तम सुविधेसह युक्रेनमध्ये वैद्यकिय शिक्षण पूर्ण करता येतं. त्यासोबतच महत्त्वाची बाब म्हणजे,  युक्रेनच्या Medical अभ्यासक्रमाला जगाची मान्यता आहे. युक्रेनच्या शिक्षण मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, '2020 साली भारतातून 18 हजार 95 विद्यार्थी युक्रेनमध्ये शिक्षणासाठी आले होते.' हा आकडा एकूण परदेशी विद्यार्थ्यांच्या 24 टक्के इतका होता.

अमेरिकेशी तुलना केल्यास युक्रेनमध्ये शिक्षणाचा खर्च किती? 

वैद्यकिय शिक्षणासाठी इतर देशांत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर असणारा सर्वात मोठा प्रश्न म्हणजे, तिथे राहण्याचा आणि खाण्याचा खर्च. इतर देशांत शिक्षणासाठी जाताना त्या देशात घरभाड किती असेल? हा प्रश्न कुणालाही पडू शकतो. तर युक्रेनमध्ये अमेरिकेपेक्षा 76 टक्के कमी घरभाडं आहे. म्हणजेच, अमेरिकेत तुम्ही 1000 रुपये देत असाल, तर युक्रेनमध्ये फक्त तुम्हाला 250 ते 300 रुपयेच द्यावे लागतात. काही ठिकाणी तर अमेरिकेत युक्रेनपेक्षा 300 टक्के जास्त घर भाडं आहे. आता त्यानंतर महत्वाचं म्हणजे, जेवणाचा खर्च. तर अमेरिकत जेवणाचा खर्च युक्रेनपेक्षा 180 ते 186 टक्के जास्त आहे. तितकाच फरक किराणा सामान खरेदी करताना तुम्हाला जाणवेल.
 
स्पर्धा हे सुद्धा भारताहून युक्रेनला जाण्याचं कारण, ते कसं? 

अजून एक महत्त्वाची गोष्टी म्हणजे, भारतात 2021 साली 15 लाख विद्यार्थ्यांनी NEET ची परीक्षा दिली. आणि जागा होत्या फक्त 88120. त्यामुळे स्पर्धा हे सुद्धा भारतीय विद्यार्थ्यांचं वैद्यकीय शिक्षणासाठी परदेशात जाण्यामागील एक महत्त्वाचं कारण आहे. आणि त्यामुळेच भारतीय युक्रेनला पसंती देतात. कमी प्रवेश फी, राहण्या खाण्याचा खर्चही  कमी आणि महत्वाचं म्हणजे कमी स्पर्धा. यामुळेच भारतातील विद्यार्थी डॉक्टर होण्यासाठी युक्रेनला जातात. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह | ABP Majha

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Top 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP MajhaPankaja Munde : पंकजाताईंना पाहताच कुटुंबियांनी फोडला टाहो; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटलाCm Eknath Shinde Meeting : मुख्यमंत्री शिंदेंच्या मुंबईतील नंदनवन बंगल्यावरील बैठक संपन्नABP Majha Headlines : 05 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
Embed widget