SWIFT : रशियाच्या आर्थिक नाड्या आवळणारा SWIFT निर्बंध आहे तरी काय?
What is SWIFT : जगभरातून रशियावर आर्थिक निर्बंध लादण्यात आले आहेत. पण रशियाला सर्वाधिक फटका SWIFT वरील निर्बंधांमुळे बसणार आहे. जाणून घ्या स्विफ्ट नक्की आहे तरी काय?
Society for Worldwide Interbank Financial Telecommunication : सध्या संपूर्ण जगाच्या नजरा पूर्व युरोपवर खिळल्या लागल्या आहेत. गेल्या आठवड्यात रशियानं युक्रेनवर हल्ला (Russia Ukraine War) केल्यानंतर जागतिक राजकारणात झपाट्यानं बदल होत आहेत. या हल्ल्यानंतर अमेरिका आणि इतर अनेक देशांनी रशियावर कठोर आर्थिक निर्बंध जाहीर केले आहेत. या निर्बंधांमध्ये रशियाला इंटरनॅशनल पेमेंट्स स्विफ्ट्स (SWIFT) पासून वेगळं करण्याचा देखील घाट घालण्यात आल्याचं बोललं जात आहे. आतापर्यंत लादण्यात आलेल्या सर्व निर्बंधांपैकी रशियाला याचा सर्वाधिक फटका बसणार असल्याचं मानलं जात आहे. स्विफ्टपासून रशियाला वेगळं करण्याच्या या हालचालींना महासत्ता अमेरिका आणि त्याचे इतर मित्र देश अतिशय प्रभावी पाऊल मानत आहेत. पण बलाढ्य रशियाला वेठीस धरणारं स्विफ्ट्स नावाचं नावाचं ब्रम्हास्त्र नेमकं आहे तरी काय? आणि ती काय काम करते हे जाणून घेऊया...
... म्हणून SWIFT बँकिंगसाठी महत्त्वपूर्ण
स्विफ्ट म्हणजे, Society for Worldwide Interbank Financial Telecommunication. नावावरुनच आपण अंदाज लावू शकतो की, ही एक कम्युनिकेशन सिस्टम आहे. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर, SWIFT हे आंतरराष्ट्रीय बँकिंग प्रणालीचं व्हॉट्सअॅप (WhatsApp) आहे. हे सध्या जगभरातील 11 हजारांहून अधिक वित्तीय संस्था आणि कंपन्यांशी जोडलेलं आहे. सध्या स्विफ्टचा वापर आंतरराष्ट्रीय पेमेंटसाठी 200 हून अधिक देश करत आहेत. स्विफ्टचा वापर करणाऱ्यांमध्ये फेडरल रिझर्व्ह, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ चायना यासह जगभरातील जवळजवळ सर्व केंद्रीय बँकांचा समावेश होतो.
पाहा व्हिडीओ : Why Indian Students Visit Ukraine : डॉक्टर होण्यासाठी भारतीय विद्यार्थ्यांची पसंती युक्रेनलाच का?
स्विफ्ट नेमकं कसं करते काम?
SWIFT प्रणाली अंतर्गत, ते वापरणाऱ्या संस्था आणि कंपन्यांना 8 ते 11 अंकांचा कोड दिला जातो. ज्याला स्विफ्ट कोड (SWIFT Coad) असंही म्हटलं जातं. तुम्ही जर भारतात राहत असाल आणि तुमचं खातं SBI मध्ये आहे. तुमचे नातेवाईक किंवा एखादा मित्र कॅनडामध्ये राहत असेल आणि तुम्हाला त्यांना पैसे पाठवायचे असतील. तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या खात्यातून त्याच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करताना SWIFT कोड सबमिट करावा लागतो. त्यानंतर SBI कॅनेडातील ज्या बँकेत तुमच्या मित्राचं खातं आहे, त्या बँकेला एक SWIF मेसेज पाठवेल. त्यानंतर ती बँक या मेसेजची पडताळणी करेल आणि त्यानंतरच पैशांचं ट्रान्झॅक्शन पूर्ण होईल.
पण, SWIFT वरील निर्बंधांमुळे रशियाला काय फटका?
सध्या स्विफ्टनं युनिवर्सल सिस्टमचं रुप धारण केलं आहे. त्याशिवाय एका देशातून दुसऱ्या देशात पेमेंट करणं फार कठीण झालं आहे. अशातच युक्रेन आणि रशिया यांच्यात युद्ध सुरु झाल्यानंतर जगभरातील देशांनी रशियावर अनेक निर्बंधांसह आर्थिक निर्बंधही लादले आहेत. या आर्थिक निर्बंधांमध्ये स्विफ्टसंदर्भातील निर्बंधांचाही समावेश आहे. त्यामुळे रशियातील कोणत्याही व्यक्तीला इतर देशांतील व्यक्तींकडून पैसे पाठवण्यात किंवा पैसे मागवताना अडचणी येणार आहेत. याव्यतिरिक्त रशियातील कंपन्यांनाही पैशांची देवाण-घेवाण करताना अडचणींचा सामना करावा लागणार आहे. एकंदरीत यामुळे कॅश फ्लो कमी होईल आणि रशियाच्या अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसेल.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह | ABP Majha