Russia-Ukraine War : पृथ्वीवर हाहाःकार, क्षणार्धातच कोट्यवधी मृत्यू; अणू युद्ध झाल्यास काय होईल? तज्ज्ञांची धडकी भरवणारी माहिती
Russia Ukraine War Nuclear Weapon : रशिया युक्रेनच्या युद्धात आता अणूयुद्ध सुरू होण्याचा धोका असल्याची चर्चा सुरू आहे.
![Russia-Ukraine War : पृथ्वीवर हाहाःकार, क्षणार्धातच कोट्यवधी मृत्यू; अणू युद्ध झाल्यास काय होईल? तज्ज्ञांची धडकी भरवणारी माहिती Russia Ukraine war what will happens if nuclear war will start in world Russia-Ukraine War : पृथ्वीवर हाहाःकार, क्षणार्धातच कोट्यवधी मृत्यू; अणू युद्ध झाल्यास काय होईल? तज्ज्ञांची धडकी भरवणारी माहिती](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/02/4a06f430b0892103169605e76fd05809_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Russia Ukraine War Nuclear Weapon : रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाला सहा दिवस पूर्ण झाले आहेत. रशियाकडून सुरू असलेल्या हल्ल्याला युक्रेनकडून जोरदार प्रतिकार करण्यात येत आहे. रशियाच्या विरोधात अमेरिका आणि इतर देशांकडून मोर्चेबांधणी सुरू आहे. या युद्धादरम्यान अणू युद्ध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे जगभरात चिंता व्यक्त केली जात आहे. अणू युद्ध झाल्यास काय होईल, याचा तज्ज्ञांनी अंदाज वर्तवला आहे.
दुसऱ्या महायुद्धात पहिल्यांदा अणूबॉम्बचा वापर करण्यात आला. अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी या शहरांवर हे अणूबॉम्ब टाकले होते. या हल्ल्यात काही क्षणातच लाखो नागरिकांचा मृत्यू झाला. ही दोन्ही शहरं बेचिराख झाली. त्यानंतर अणूबॉम्बचा वापर कोणत्याही देशाने केला नाही.
>> अणू युद्ध झाल्यास काय होईल?
स्विर्त्झलँडमधील International Campaign to Abolish Nuclear Weapons (ICAN) या संस्थेने अणू युद्ध झाल्यास त्याचे काय परिणाम होतील याबाबत अंदाज वर्तवला आहे. या संस्थेला 2017 मध्ये शांततेचा नोबेल पुरस्कारदेखील मिळाला होता. ICAN नुसार, एका अणूबॉम्बच्या स्फोटाने लाखो लोकांचा मृत्यू होईल. तर, 10 किंवा शेकडो अणूबॉम्बचा वापर केल्यास कोट्यवधी नागरिकांचा मृत्यू होईलच शिवाय पृथ्वीच्या वातावरणावर मोठा परिणाम होईल.
>> ICAN ने काय म्हटले ?
- ICAN च्या मते, एक अणुबॉम्ब संपूर्ण शहर नष्ट करेल. सध्याच्या काळात अनेक अण्वस्त्रे वापरली गेली तर त्यात कोट्यवधी लोकांचा मृत्यू होईल. अमेरिका आणि रशियामध्ये मोठे अणूयुद्ध सुरू झाल्यास मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या 10 कोटींहून अधिक असू शकेल.
- अधिक लोकसंख्येची अधिक घनता असलेल्या मुंबईसारख्या शहरात, ज्या ठिकाणी प्रत्येक एक किलोमीटरच्या परिघात 1 लाखांहून अधिक लोक राहतात, तिथे हिरोशिमासारखा अणुबॉम्ब टाकल्यास एका आठवड्यात 8.70 लाखांहून अधिक मृत्यू होतील. अमेरिका आणि रशिया यांच्यातील अणुयुद्धात 500 अणुबॉम्ब वापरल्यास अर्ध्या तासात 10 कोटी नागरिकांचा मृत्यू होऊ शकतो.
- सध्या जगात असलेल्या अण्वस्त्रांपैकी एक टक्क्यांहून कमी अण्वस्त्रांचा वापर केला तर जवळपास दोन अब्ज नागरिकांना उपासमारीचा सामना करावा लागणार. त्याशिवाय आरोग्य व्यवस्थेवर मोठ्या प्रमाणावर ताण येईल. त्याच्या परिणाम आरोग्य व्यवस्था उद्धवस्त होईल. त्यामुळे जखमींवर उपचार करण्यास अडचणी निर्माण होतील.
>> पृथ्वीच्या वातावरणावर परिणाम
- हिरोशिमावर टाकण्यात आलेल्या बॉम्बच्या आकाराएवढे 100 बॉम्बचा वापर झाला तरी पृथ्वीच्या वातावरणावर मोठा परिणाम होईल. पृथ्वीवरील हवामानात मोठा बदल होईल. त्याचा परिणाम शेतीवरही होऊ शकतो.
- सध्या संपूर्ण जग ग्लोबल वार्मिंगच्या संकटाशी झुंजत आहे. अणूयुद्ध झाल्यास पृथ्वीचे तापमान अधिक वाढेल.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- Russia Ukraine War : रशियाकडून युक्रेनमध्ये खतरनाक बॉम्बचा वापर, जाणून घ्या काय आहे व्हॅक्यूम बॉम्ब आणि क्लस्टर बॉम्ब?
- रशियाच्या मदतीला 'हिवाळा'! इतिहास सांगतोय... हिवाळ्याच्या मदतीने रशियाने अनेक शत्रूंना लोळवलंय
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)