Russia Ukraine War : रशियाच्या आण्विक दलाकडून युद्धाभ्यास सुरू, आण्विक पाणबुडी आणि क्षेपणास्त्रेही अलर्टवर
Russia Ukraine Conflict : रशियानं आण्विक पाणबुडी, आण्विक क्षेपणास्त्र सज्ज ठेवल्याची माहिती रशियन मीडियानं दिली आहे.
Russia Ukraine Crisis : एकीकडे रशिया आणि युक्रेनमध्ये बेलारुसच्या सीमेवर चर्चा सुरु असताना दुसरीकडे रशियानं आपलं आण्विक फोर्स अलर्टवर ठेवले आहे. रशियानं आण्विक पाणबुडी, आण्विक क्षेपणास्त्र सज्ज ठेवल्याची माहिती रशियन मीडियानं दिली आहे. त्यामुळे एकीकडे सुरु असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर चर्चेतून तोडगा काढला जात आहे. तर दुसरीकडे आण्विक युद्धाची धमकी दिली जाते आणि यामुळे बैठकीतल्या चर्चेत रशिया दबाव टाकण्याचा प्रयत्न करतोय का असा सवाल उपस्थित होत आहे.
रशिया आणि युक्रेन युद्धाचा आज पाचवा दिवस आहे. गेल्या चार तासांपासून बेलारुसच्या सीमेवर रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांच्या शिष्टमंडळाची बैठक सुरु आहे. या बैठकीत युक्रेननं राजधानी कीव्हसह डोनबास आणि क्रीमियातून रशियन सैन्य हटवण्याची मागणी केली आहे. रशियानं तातडीने शस्त्रसंधी करावी अशी मागणी झेलेन्स्की यांनी केलीय. त्यामुळे आता बेलारुसमध्ये होणाऱ्या बैठकीत काय होणार? रशिया-युक्रेन युद्ध संपणार का याकडं जगाचं लक्ष लागलंय.
#BREAKING | Russian nuclear triad takes up standby alert duty with reinforced staff, Shoigu tells Putinhttps://t.co/sFPMpCvBDj pic.twitter.com/8rQA1rA1kM
— Sputnik (@SputnikInt) February 28, 2022
दरम्यान Nuclear Deterrent Force ही आण्विक हल्ल्याचे प्रतिबंध करणारी यंत्रणा आहे. शीत युद्धादरम्यान Deterrence Theory समोर आली होती. शीत युद्धादरम्यान सेव्हियत संघ आणि अमेरिके दरम्यान तणावाचे वातावरण होते. अमेरिकेने Nuclear Deterrent Strategy चा वापर केला होता. याचा अर्थ असा आहे की, सेव्हियत संघ किंवा कोणत्याही देशाने अमेरिकेवर आण्विक हल्ला केल तर त्यांना प्रत्युत्तर देण्यात येणार आहे. अमेरिकेच्या या रणनितीचा वापर आता रशियाचे राष्ट्रपती पुतीन याचा वापर करणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- कॉमेडियन ते राष्ट्राध्यक्ष! आता हा पठ्ठ्या थेट पुतिन यांना भिडतोय अन् नडतोय... जाणून घ्या कसा आहे व्होदिमर झेलेन्स्की यांचा प्रवास
- Russia-Ukraine Crisis: रशिया-युक्रेन वादावर केवळ संवादातून मार्ग निघेल; पुतिन यांच्याशी झालेल्या चर्चेत मोदींचे आवाहन
- Russia-Ukraine: थोडा जरी आत्मसन्मान शिल्लक असेल तर इम्रान खाननी रशिया दौरा रद्द करावा: शशी थरूर