Russia Ukraine War : रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरले, एकाच दिवसात डागली 120 क्षेपणास्त्रे
Russia Ukraine War: रशिया आणि युक्रेनचे युद्ध हे अद्यापही सुरूच आहे. आतापर्यंत या युद्धात दोन्ही देशांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. तरी हे युद्ध अजूनही थांबलं नाही आहे. यातच आता रशियाने युक्रेनवर क्षेपणास्त्र हल्ला केल्याची बातमी समोर आली आहे.
Russia Ukraine War: रशिया आणि युक्रेनचे युद्ध हे अद्यापही सुरूच आहे. आतापर्यंत या युद्धात दोन्ही देशांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. तरी हे युद्ध अजूनही थांबलं नाही आहे. यातच आता रशियाने युक्रेनवर क्षेपणास्त्र हल्ला केल्याची बातमी समोर आली आहे. गुरुवारी रशियाने युक्रेनची राजधानी कीवसह देशाच्या अनेक भागात क्रूझ क्षेपणास्त्रे डागली आहेत.
Russia Ukraine War: रशियाने 120 क्षेपणास्त्रे डागली
रशियाने युक्रेनवर 120 क्षेपणास्त्रे डागली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, रशियाने कीवसह 7 शहरांवर समुद्र आणि आकाशातून क्षेपणास्त्रे डागली, ज्यामध्ये 14 वर्षीय मुलीसह 3 जण जखमी झाल्याची माहिती आहे. याबाबत युक्रेनच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, "गुरुवारी रशियाने राजधानी कीवसह देशाच्या अनेक भागात क्षेपणास्त्र हल्ला केला. त्यामुळे गुरुवारी सकाळी देशाच्या अनेक भागांमध्ये हवाई हल्ल्याचे सायरन ऐकू आले.'' कीवमधील प्रादेशिक प्रशासनाचे म्हणणे आहे की, "क्षेपणास्त्र हल्ल्यांना आळा घालण्यासाठी सुरक्षा यंत्रणा सुरू करण्यात आली आहे.''
याशिवाय युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांचे सल्लागार मायखाइलो पोडोलियाक यांनीही यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले आहेत की, हा हल्ला निवासी भागांवर करण्यात आला होता. अनेक इमारती उद्ध्वस्त झाल्या आहेत. कीव व्यतिरिक्त, ल्विव्ह, खार्किव, मायक्लोव्ह, ओडेसा, पोल्टावा आणि झिटोमिर येथेही हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्याबद्दल युक्रेनच्या हवाई दलाने सांगितले की, "रशियाने क्रूझ क्षेपणास्त्रे डागली आहेत. या हल्ल्यात ड्रोनचाही वापर करण्यात आला आहे. गुरुवारी सकाळी युक्रेनच्या अनेक शहरांमध्ये एअर रेड अलर्टही ऐकू आला.
या हल्ल्यानंतर कीवचे महापौर विटाली क्लिट्स्को यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, ''हवाई हल्ले थांबेपर्यंत बंकरमध्येच रहा. आम्ही आमच्या हवाई संरक्षण यंत्रणेच्या मदतीने 16 रशियन क्षेपणास्त्रे हवेत नष्ट केली. याशिवाय मोडेसा भागात 21 रशियन क्षेपणास्त्रेही पाडण्यात आली. या महिन्याच्या सुरुवातीला रशियाने 70 क्षेपणास्त्रे डागली, आम्ही 60 क्षेपणास्त्रे पाडली.''
Ukraine Buys 1,400 Drones : युक्रेनने 1,400 ड्रोन केले खरेदी
युक्रेनने आक्रमणादरम्यान रशियन सैन्याने वापरलेले ड्रोन पाडण्यासाठी अनेक ड्रोन फायटर मॉडेल्समध्ये विकसित करण्याच्या योजनांसह, सुमारे 1,400 ड्रोन खरेदी केले आहेत. युक्रेनच्या तंत्रज्ञान मंत्र्यांनी ही माहिती दिली. युक्रेनचे डिजिटल तंत्रज्ञान मंत्री मायखाइलो फेडोरोव्ह यांनी युक्रेन-रशिया युद्धाचे वर्णन इंटरनेट युगातील पहिले मोठे युद्ध म्हणून केले आहे.