(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Russia Ukraine War : लहान मुलांच्या रुग्णालयावर रशियाचा हल्ला; 'जग दहशतीकडे किती दिवस दुर्लक्ष करणार?' युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांचा सवाल
Russia Ukraine War : युक्रेनमधील अधिकाऱ्यांनी सांगितले की, रशियाने बुधवारी युद्धबंदी कालावधीत मारियुपोल येथील मुलांच्या रुग्णालयावर हवाई हल्ला केला.
Russia Ukraine War : रशियाचा युक्रेनवरील हल्ला अधिक तीव्र होताना पाहायला मिळतोय. रशियाच्या हल्ल्यामध्ये अनेक युक्रेनियन नागरिक मारले गेले आहेत. आता रशियाकडून युक्रेनमधील चिमुकल्यांच्या रुग्णालयाला लक्ष्य केलं गेल्याच समोर आले आहे. अधिकार्यांनी सांगितले की, रशियाने मारियुपोल शहरामधील लहान मुलांचे रुग्णालय आणि प्रसूती केंद्रावर हल्ला आहे. बुधवारी नगर परिषदेच्या सोशल मीडियावरील निवेदनात सांगण्यात आले आहे की, या हल्ल्यामध्ये अनेक जणांचा मृत्यू झाला असून रुग्णालयाचे प्रचंड नुकसान झाले आहे.
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी याबाबत ट्विट केले आहे की, 'मारियुपोलमध्ये रशियन सैनिकांनी प्रसूती रुग्णालयावर हल्ला केला. लोक, मुले ढिगाऱ्याखाली गाडली गेली आहेत. जग किती काळ दहशतीकडे दुर्लक्ष करत राहणार? हत्या थांबवा! तुमच्याकडे सामर्थ्य आहे पण तुम्ही माणुसकी गमावत आहात.'
Mariupol. Direct strike of Russian troops at the maternity hospital. People, children are under the wreckage. Atrocity! How much longer will the world be an accomplice ignoring terror? Close the sky right now! Stop the killings! You have power but you seem to be losing humanity. pic.twitter.com/FoaNdbKH5k
— Володимир Зеленський (@ZelenskyyUa) March 9, 2022
झेलेन्स्की यांच्या कार्यालयाचे उपप्रमुख किरिलो तैमोशेन्को म्हणाले की, अधिकारी मृत किंवा जखमी लोकांची संख्या निश्चित करण्याचा प्रयत्न करीत आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने या हल्ल्यात उद्ध्वस्त झालेल्या रुग्णालयाचा व्हिडिओही शेअर केला आहे.
Today, Russia shelled a Childrenʼs hospital and a Maternity hospital in 📍Mariupol.#closeUAskyNOW #StopRussianAggression#Russia pic.twitter.com/tTu7AAGhoD
— MFA of Ukraine 🇺🇦 (@MFA_Ukraine) March 9, 2022
प्रादेशिक गव्हर्नर पावलो किरिलेन्को यांनी सांगितले की, रशियाने युद्धबंदी कालावधीत मारियुपोलमधील लहान मुलांच्या हवाई हल्ला केला. या हल्ल्यात कामगार महिलांसह 17 जण जखमी झाल्याचे त्यांनी सांगितले.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Russia Ukraine War : रशिया युक्रेनवर रासायनिक हल्ल्याच्या तयारीत? अमेरिकेकडून सर्तकतेचा इशारा
- Russia Ukraine War : रस्त्यावर मृतदेह, अन्नाच्या शोधात भटकणारे लोक; रशियाच्या हल्ल्यानंतर युक्रेनमध्ये विध्वंसाचं दृश्य
- Russia Ukraine War : देश सोडून चाललेल्या गर्लफ्रेंडला युक्रेनच्या सैनिकाचं प्रपोज, चेकपॉईंटवरच घडला प्रकार, व्हिडिओ व्हायरल
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha