Russia Ukraine War : मारियुपोल शहरात विध्वंस, गार्डन आणि शाळेच्या आवारात मृतदेह पुरण्याची वेळ
Russia Ukraine War : रशियाच्या हल्ल्यात युक्रेनमध्ये मोठ्या संख्येने लोक मारले जात आहेत. अनेक शहरं उद्ध्वस्त झाली आहेत. मारियुपोल शहरात सर्वात वाईट परिस्थिती असून इथे गार्डन आणि शाळेच्या आवारात मृतदेह पुरण्याची वेळ आली आहे.
Russia Ukraine War : रशियाचा युक्रेनवर हल्ला सुरुच आहे. बॉम्ब हल्ला, क्षेपणास्त्र हल्ल्यात युक्रेनमधील अनेक नागरिक मारले जात आहेत. अनेक शहरं उदध्वस्त झाली असून मारियुपोल शहरात सर्वात वाईट परिस्थिती आहे. इथे मृतदेह स्मशानभूमीत नेणे शक्य नसल्याने गार्डन आणि शाळांमध्ये दफन करण्याची वेळ आली आहे. अनेक मृतदेह असेच पडून आहेत. मारियुपोल शहर मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त झाले असून त्याची तुलना सीरियातील अलेप्पो शहराशी केली जाऊ लागली आहे.
मारियुपोल शहराचा संपर्क तुटला
मिळालेल्या अहवालानुसार, मारियुपोल शहरामधील संपर्क सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. अनेक लोकांनी बंकरमध्ये आश्रय घेतला आहे. त्यापैकी अन्न किंवा इतर जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी कुणी बाहेर पडले तर त्याच्या परतण्याची शक्यताही कमी असते. त्या व्यक्तींबरोबर काय झाले याची कोणालाच खबर मिळत नाही. मारियुपोल शहराचा देश आणि जगापासून पूर्णपणे संपर्क तुटला आहे. केवळ सोशल मीडियाच्या माध्यमातून काही बातम्या मिळत आहेत.
रशियन सैन्यावर आरोप
युक्रेनमधील काही नागरिकांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये आरोप करण्यात आला आहे की, शहर सोडून इतर देशांमध्ये जाण्याचा प्रयत्न करत असलेल्या नागरिकांकडून रशियन सैन्य पासपोर्ट हिसकावून घेत आहे आणि त्यांना जबरदस्तीने रशियन सीमेवर पाठवत आहे. अशा प्रकारे सुमारे 3 हजार लोकांना रशियाला पाठवण्यात आले आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Russia Ukraine Conflict : नाटोच्या सुरक्षेसाठी अमेरिकेचं मोठं पाऊल, नौदलाची सहा विमानं केली तैनात
- Russia Ukraine War : मी सत्तेत असतो तर युद्ध झाले नसते; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर ट्रम्प यांचा हल्ला
- Russia Ukraine War : रशियाचा युक्रेनमधील इंधन डेपोवर क्षेपणास्त्र हल्ला, आग विझवण्यासाठी लागले 14 तास
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha