Russia Ukraine Conflict : नाटोच्या सुरक्षेसाठी अमेरिकेचं मोठं पाऊल, नौदलाची सहा विमानं केली तैनात
Russia Ukraine War : अमेरिकेच्या संरक्षण विभागाने सांगितले की, नाटो (NATO) म्हणजेच पूर्व युरोपमध्ये नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशनची सुरक्षा अधिक भक्कम करण्यासाठी अमेरिका सहा नौदल विमाने तैनात करत आहेत.
Russia Ukraine Conflict : नाटोच्या (NATO) सुरक्षेसाठी अमेरिकेने मोठं पाऊल उचललं आहे. अमेरिकेने नौदलातील सहा विमाने नाटोसाठी तैना त करण्यातचि निर्णय घेतला आहे. अमेरिकेच्या संरक्षण विभाग पेंटागॉनने सांगितले आहे की, नाटो (NATO) म्हणजेच पूर्व युरोपमध्ये नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशनची सुरक्षा मजबूत करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक युद्धात तज्ज्ञ असलेली सहा नौदल विमाने तैनात करत आहेत. याशिवाय अमेरिका पूर्व युरोपमध्ये सुमारे 240 नौदल सैनिकांनाही तैनात करणार आहे.
पेंटागॉनचे प्रवक्ते जॉन किर्बी यांनी सांगितले की, वॉशिंग्टन राज्यातील नौदल तळ असलेल्या व्हिडबे बेटावर आधारित EA-18G 'ग्रॉलर' विमान सोमवारी जर्मनीतील स्पॅंगडाहलम विमानतळावर पोहोचेल. हे विमान येथे तैनात असेल. पेंटागॉनच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही विमाने रशिया-युक्रेन युद्धात वापरली जाणार नाहीत.
नाटोच्या सरावादरम्यान चार नौसैनिकांचा मृत्यू
नुकत्याच झालेल्या नाटो सराव दरम्यान, विमान अपघातात चार नौसैनिकांचा मृत्यू झाला. त्यांचे मृतदेह अमेरिकेला पाठवण्यात आले. यूएस मरीन कॉर्पने सांगितले की, 18 मार्च रोजी आर्क्टिक सर्कलमधील नॉर्वेजियन शहरात एक ऑस्प्रे विमान कोसळले आणि यात चार नौसैनिकांचा मृत्यू झाला.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Russia Ukraine War : मी सत्तेत असतो तर युद्ध झाले नसते; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर ट्रम्प यांचा हल्ला
- Russia Ukraine War : रशियाचा युक्रेनमधील इंधन डेपोवर क्षेपणास्त्र हल्ला, आग विझवण्यासाठी लागले 14 तास
- Viral Video : टॉम अॅन्ड जेरीचा खेळ... उंदराची शिकार करणाऱ्या मांजरीची फजिती, व्हिडीओ पाहिल्यावर तुम्हालाही हसू आवरणार नाही
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha