Russia Ukraine War : रशियाला मदत केली तर चीनला परिणाम भोगावे लागतील ; जो बायडन यांचा इशारा
Russia Ukraine War : रशियाला मदत केली तर चीनला परिणाम भोगावे लागतील, असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन ( Joe Biden) यांनी दिला आहे.
Russia Ukraine War : रशिया आणि युक्रेनमध्ये सुरु असलेल्या युद्धावरून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना इशारा दिला आहे. युक्रेनवर हल्ला करणार्या रशियाला मदत करण्याचा चीनने निर्णय घेतला तर त्याचे परिणाम भोगावे लागतील असे बाडयन यांनी म्हटले आहे. व्हाईट हाऊसच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने याबाबत माहिती दिली आहे.
रशिया आणि युक्रेनमधील युद्धाबाबत काल जो बायडन आणि जिनपिंग यांच्यात एक तास पन्नास मिनिटे व्हिडीओ कॉलवरून संभाषण झाले आहे. युक्रेनमधील रशियाच्या लष्करी कारवाईवर आणि अमेरिका-चीन संबंधांव्यतिरिक्त आंतरराष्ट्रीय व्यवस्थेवर होणार्या परिणामांवर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
राष्ट्राध्यक्ष बायडन यांनी रशियावरील निर्बंधांसह युक्रेनवरील हल्ले रोखण्यासंदर्भातील उपायांबाबत जिनपिंग यांच्याशी चर्चा केली. युक्रेनवर हल्ला करण्यासाठी चीनने रशियाला मदत केल्यास त्याचे काय परिणाम होऊ शकतात हेही जो बायडन यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.
रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर चीनकडून या हल्ल्याचा अद्याप निषेध करण्यात आला नाही. व्हाईट हाऊसचे प्रेस सेक्रेटरी जेन साकी यांनी सांगितले की, युक्रेनच्या संकटावर अमेरिका त्यांचे सहयोगी आणि भागीदारांचे विचार समजून घेण्यासठी चर्चा करत आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना चीनने पाठिंबा दिल्याबद्दल आणि युक्रेनवरील रशियाच्या हल्ल्याचा निषेध न केल्याबद्दल बाडन यांनी जिनपिंग यांना प्रश्न विचारले. याबरोबरच चीनचे राष्ट्राध्यक्ष कोणाचे समर्थन करत आहेत याचे मूल्यांकन करण्याची ही संधी आहे,"
रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यासाठी चीनकडून रशियाला लष्करी आणि आर्थिक मदत देण्यापासून रोखण्याचा प्रयत्न अमेरिकेकडून करण्यात येत आहेत. चीन आणि अमेरिकेने मिळून शांततेसाठी आंतरराष्ट्रीय जबाबदारी पार पाडली पाहिजे, असे जिनपिंग यांनी दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या संभाषणात म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या
- Russia Ukraine War : रशिया-युक्रेन युद्धाबाबत शी जिनपिंग यांचे मोठे वक्तव्य, म्हणाले...
- Russia Ukraine Crisis : रशियाचा युक्रेनवर रॉकेट हल्ला; अभिनेत्री ओक्साना श्वेत्स यांचा मृत्यू
- Russia-Ukraine War : देशासाठी आधी हातात रॅकेट घेतलं, बलाढ्य फेडररला हरवलं, आता रशियाला हरवण्यासाठी रायफल हाती!
- व्लादिमीर पुतीन यांच्यावर टीका करणाऱ्या मॉडेलचा मृतदेह सुटकेसमध्ये सापडला!