Russia-Ukraine War : युक्रेनमधून परतलेल्या विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकार काय करणार? कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती
Russia-Ukraine War : कर्नाटकातील नवीन या विद्यार्थ्याच्या अंत्यसंस्काराला जाण्यापूर्वी बोम्मई म्हणाले, केंद्र सरकार विद्यार्थ्यांच्या भविष्याचा गांभीर्याने विचार करत आहे.
![Russia-Ukraine War : युक्रेनमधून परतलेल्या विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकार काय करणार? कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती Russia-Ukraine War centre considering alternative educational measures for indian students returned from ukraine says cm bommai Russia-Ukraine War : युक्रेनमधून परतलेल्या विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकार काय करणार? कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/21/86273d861a7b4408c2f0761b6e2bd63c_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Russia-Ukraine War : रशिया-युक्रेन युद्ध (Russia-Ukraine War) सलग 25 व्या दिवशी सुरुच आहे. याच दरम्यान, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सोमवारी सांगितले की, युद्धग्रस्त युक्रेनमधून अभ्यासादरम्यान परत आलेल्या वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी (Medical Students) केंद्र सरकार पर्यायी उपाययोजनांवर गांभीर्याने विचार करत आहे. कर्नाटकातील नवीन या विद्यार्थ्याच्या अंतिम संस्काराला जाण्यापूर्वी बोम्मई यांनी दावणगेरे येथे सांगितले की, युक्रेनमधील अभ्यासक्रम भारतापेक्षा वेगळा आहे. केंद्र सरकार त्यांच्या भविष्याचा गांभीर्याने विचार करत आहे. कारण, त्यात विविध राज्यांतील विद्यार्थ्यांचे भविष्य समाविष्ट आहे.
पुढे ते म्हणाले की, सरकारी विद्यापीठांमध्ये फी कमी आहे. मात्र, खासगी क्षेत्रात वैद्यकीय शिक्षण महाग आहे. 90-95 टक्के गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांनाही NEET मध्ये जागा मिळत नाहीत. मॅनेजमेंट कोटा आणि एनआरआय कोट्यातील जागांचे शुल्क जास्त असल्याने विद्यार्थ्यांनी इतर पर्याय शोधावेत.
बोम्मई म्हणाले की, फी कमी करण्यासाठी जागा अ, ब आणि क श्रेणीमध्ये वर्गीकृत करण्याच्या प्रस्तावावर आम्ही विचार करत आहोत. मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया वैद्यकीय अभ्यासक्रमांशी संबंधित समस्यांवर निर्णय घेते. विद्यार्थ्यांचा पुनर्विचार केला जात आहे.
युक्रेनमध्ये गोळीबारात ठार झालेले नवीन शेखरप्पा यांच्यावर सोमवारी हावेरी येथे अंत्यसंस्कार विधी करण्यात आले. अंत्यसंस्काराच्या वेळी मुख्यमंत्री बोम्मई देखील उपस्थित होते. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे पार्थिव दावणगेरे येथील एसएस मेडिकल कॉलेजला वैद्यकीय संशोधनासाठी दान करण्यात येणार आहे. नवीन यांचे पार्थिव सोमवारी पहाटे 3 वाजता बंगळुरू येथे आले आणि तेथून ते त्यांच्या गावी नेण्यात आले.
महत्वाच्या बातम्या :
- Russia Ukraine Conflict : युक्रेनमध्ये प्राण गमावलेल्या विद्यार्थ्याचे पार्थिव कर्नाटकात दाखल, मुख्यमंत्री बोम्मईंनी वाहिली श्रद्धांजली
- ...तर, तिसरं महायुद्ध निश्चित होणार, युक्रेनच्या राष्ट्रपतींनी व्यक्त केली भीती
- Russia Ukraine War : थिएटरच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले 1100 हून अधिक लोक, बॉम्बस्फोटात अनेक इमारती उद्ध्वस्त
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)