BMC Election 2026: थेट निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतदान केंद्रावर मतदारांची नावे शोधण्यासाठी चक्क भाजपच्या अॅपचा वापर! ठाकरे गटाच्या नेत्याचा व्हिडिओ बाॅम्ब
BMC Election 2026: अखिल चित्रे यांनी व्हिडिओ बॉम्ब टाकत निवडणूक आयोगावर कडाडून प्रहार केला आहे. मुंबईत मतदान केंद्रावर थेट भाजपचे अॅप वापरले जात असल्याचा त्यांनी व्हिडिओ ट्विट करत खळबळ उडवून दिली आहे.

BMC Election 2026: राज्यातील सर्वाधिक लक्ष लागून राहिलेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी अत्यंत चुरशीने लढत होत आहे. मात्र मतदारयादीतील घोळाने अनेकांना मतदान करता आलेल नाही. इतकेच नव्हे तर बोटाला लावलेली शाई सुद्धा अवघ्या काही मिनिटांमध्ये पुसून जात असल्याने निवडणूक आयोगाचा दळभद्रीपणा पुन्हा एकदा समोर आला आहे. त्यामुळे अनेकांना बोगस मतदान करण्यासाठी ही संधी मिळाली आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. सोशल मीडियात अनेकांनी व्हिडिओ पोस्ट करत एका झटक्यात शाई घालवून दाखवली आहे.
मतदान केंद्रावर थेट भाजपच्या अॅपचा वापर!
दरम्यान, आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते अखिल चित्रे यांनी व्हिडिओ बॉम्ब टाकत निवडणूक आयोगावर कडाडून प्रहार केला आहे. मुंबईत एका मतदान केंद्रावर थेट भाजपचे अॅप वापरले जात असल्याचा त्यांनी व्हिडिओ ट्विट करत खळबळ उडवून दिली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अखिल चित्रे यांनी हा व्हिडिओ पोस्ट करताना आचारसंहितेचं उल्लंघन असल्याचं म्हटलं आहे.
मतदान केंद्रावर निवडणूक अधिकारी मतदारांची नावे शोधण्यासाठी भाजपचे अॅप वापरत असल्याचा दिसून येत आहे.
— Akhil Chitre अखिल चित्रे (@akhil1485) January 15, 2026
निष्पक्ष निवडणुकीत पक्षीय अॅपचा वापर म्हणजे थेट आचारसंहिता उल्लंघन! @ECISVEEP आता कारवाई करा ..राज्य निवडणूक आयोग आता करणार का कारवाई?? pic.twitter.com/Th9p0N6zbI
अखिल चित्रे यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, मतदान केंद्रावर निवडणूक अधिकारी मतदारांची नावे शोधण्यासाठी भाजपचे अॅप वापरत असल्याचा दिसून येत आहे. निष्पक्ष निवडणुकीत पक्षीय अॅपचा वापर म्हणजे थेट आचारसंहिता उल्लंघन! आता कारवाई करा.. राज्य निवडणूक आयोग आता करणार का कारवाई?? या ट्विटमध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाला टॅग केलं आहे. दुसरीकडे, या व्हिडिओत अधिकाऱ्याला मराठी मतदार जाब विचारताना दिसून येत आहेत. तुम्ही अधिकारी आहात, तर हे अॅप वापरण्याची परवानगी कोणी दिली? अशी विचारणा मतदार करताना दिसून येत आहे. मुंबईत अनेक ठिकाणी मतदारयादीत घोळ झाला आहे. अनेक ठिकाणी एकाच कुटुंबातील नावे विखुरली गेली आहेत. त्यामुळे अनेकांना मतदान केंद्रावर जाऊनही मतदान करता आलेलं नाही.
इतर महत्वाच्या बातम्या




















