(Source: ECI/ABP News/ABP Majha)
...तर, तिसरं महायुद्ध निश्चित होणार, युक्रेनच्या राष्ट्रपतींनी व्यक्त केली भीती
Russia Ukraine War : रशियाचे राष्ट्रपती पुतीन यांच्यासोबत चर्चा करण्याची तयारी युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्की यांनी दाखवली आहे. मात्र, त्यांनी तिसऱ्या महायुद्धाचाही इशारा दिलाय.
Russia Ukraine War : रशिया आणि युक्रेनमधील युद्ध सलग २५ व्या दिवशीही सुरूच आहे. रशियन सैन्याने पुन्हा एकदा लांब पल्ल्याच्या हायपरसॉनिक आणि क्रूझ क्षेपणास्त्रांनी युक्रेनच्या लष्करी ठिकाणांना लक्ष्य केले. तर, युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी रशियाचे राष्ट्रपती पुतीन यांच्यासोबत चर्चेची तयारी दर्शवली आहे. मात्र ही चर्चा अपयशी ठरल्यास तिसरं महायुद्ध होण्याची भीती झेलेनस्की यांनी व्यक्त केली.
झेलेन्स्की यांनी 'सीएनएन'ला दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले की, रशियाचे राष्ट्रपती पुतीन यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी आपण तयार आहोत. याआधीदेखील दोन वर्षांपासून माझी चर्चेची तयारी होती. चर्चेशिवाय हे युद्ध संपणार नसल्याचेही झेलेन्स्की यांनी म्हटले. युद्ध थांबवण्यासाठी आमच्याकडे फक्त एक टक्के संधी असेल तरी ती संधी आम्ही गमावणार नाही, असेही झेलेन्स्की यांनी स्पष्ट केले.
तर, तिसरं महायुद्ध पेटणार; झेलेन्स्कीचा इशारा
रशियन फौजा आम्हाला ठार करण्यासाठी आल्या आहेत. आमचे सैन्य आणि नागरीक रशियाच्या हल्ल्याचा जोरदार प्रतिकार करण्यास सक्षम आहोत. मात्र, चर्चा करण्यावर भर दिला पाहिजे असे मला वाटते. पुतीन यांच्यासोबत चर्चा करण्यास तयार असल्याचे त्यांनाी सांगितले. पुतीन यांच्यासोबतची चर्चा अपयशी ठरणे म्हणजे जगाला तिसऱ्या महायुद्धाकडे नेण्यासारखं असल्याचे झेलेन्स्की यांनी म्हटले.
रशियाचा मारियुपोल शहरावर हल्ला
रशियाने युक्रेनमधील मारियुपोल शहरावर जोरदार हल्ले सुरू केले आहेत. या शहरातील बहुतांशी निवासी इमारतीदेखील उद्धवस्त झाल्या असून शहर बेचिराख झाले आहे. रशियाने शरणार्थी असलेल्या शाळेच्या इमारतीवर हल्ला केला असल्याचा दावा युक्रेनने केला आहे. रशियाकडून सुरू असलेला मारियुपोल शहरावरील हल्ला ही दहशतवादी कारवाई असल्याचे राष्ट्रपती झेलेन्स्की यांनी म्हटले.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- Russia Ukraine War : थिएटरच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले 1100 हून अधिक लोक, बॉम्बस्फोटात अनेक इमारती उद्ध्वस्त
- Russia Ukraine War : रशिया आणि युक्रेनमधील युद्ध संपणार? दोन्ही देश कराराच्या जवळ, रशियन अधिकाऱ्याचा दावा