(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Russia Ukraine Conflict : युद्धामुळे महिला, मुलांचा परिस्थिती वाईट; शेजारच्या देशांत आश्रय घेण्यास भाग
Russia Ukraine Conflict : हजारो लोक युक्रेनमधून पश्चिमेकडील देशांमध्ये जात आहेत आणि त्यांना शेजारील देशांमध्ये आश्रय घेण्यास भाग पाडले जात आहे. युक्रेन सरकारने या पुरुषांना देश सोडण्याची परवानगी दिलेली नाही.
Russia Ukraine Conflict : रशिया आणि युक्रेनमधील युद्ध सुरूच आहे. युक्रेनमधून लोकांचे झपाट्याने स्थलांतर होत आहे. हजारो युक्रेनियन लोक आपली घरे सोडून आश्रय घेण्यासाठी पश्चिम सीमेवरील शेजारील देशांमध्ये पोहोचत आहेत. युद्धामुळे घाबरलेल्या आणि असहाय्य झालेल्या लोकांच्या डोळ्यात अश्रू पाहायला मिळत आहेत. युक्रेनमधील महिला आणि मुले शेजारील देशांमध्ये आश्रय घेत आहेत, कारण युक्रेनियन सरकारने पुरुषांना देश सोडण्याची परवानगी दिलेली नाही. युद्धाच्या भीतीमुळे युक्रेनच्या नागरिकांना इतर देशांमध्ये निर्वासित होण्यास भाग पाडले जात आहे.
युद्धादरम्यान लोकांना युक्रेनमधून लोकांचे पलायन
युक्रेनमधील हजारो लोक पश्चिमेकडील देशांमध्ये जात आहेत आणि त्यांना शेजारील देशांमध्ये आश्रय घेण्यास भाग पाडले जात आहे. शेकडो युक्रेनियन निवासी पोलंड, हंगेरी, रोमानिया किंवा मोल्दोव्हा सीमा ओलांडून मोल्दोव्हामध्ये दाखल झाले आहेत. अनेक लोक बस किंवा कारने येथे पोहोचले आहेत. अनेकजण लहान मुलांना घेऊन रस्त्यावर फिरत आहेत. सर्वांचे डोळ्यांमध्ये अश्रू पाहायला मिळत आहेत.
पुरुषांना देश सोडण्यास परवानगी नाही
अचानक उद्भवलेल्या युद्धाच्या परिस्थितीमुळे युक्रेनच्या नागरिकांना आपला देश सोडावा लागला. या सर्व महिला आणि लहान मुले आहेत. युक्रेन सरकारने 18 ते 60 वयोगटातील पुरुषांना देश सोडण्यास मनाई केली आहे. मोल्दोव्हा सरकारने मानवतावादी आधारावर या लोकांना आपल्या सीमेत प्रवेश करण्यास परवानगी देत मदतीचे आश्वासनही दिले आहे. पुरुषांना ट्रेनमधून उतरवण्यात आल्याचे अनेक महिलांनी सांगितले. कारण युक्रेनच्या झेलेन्स्की सरकारने 18-60 वयोगटातील पुरुषांना देश सोडण्यास बंदी घातली आहे. रशियाकडून सातत्याने होणाऱ्या हल्ल्यांनंतर दहशतीचे वातावरण आहे. या हल्ल्यात अनेकांना जीव गमवावा लागला आहे.
शेजारील देशांमध्ये आश्रय
रोमानियामध्येही रस्त्यावर महिला लहान मुलांसोबत आसरा शोधत आहेत. या निर्वासितांसाठी मोकळ्या मैदानात तंबू उभारले जात आहेत. खाण्यापिण्याची व्यवस्थाही केली जात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 24 तासांत 10 हजारांहून अधिक लोक रोमानियाच्या सीमेवर दाखल झाले आहेत. युक्रेनचे लोकही पोलंडला पोहोचले आहेत. काही लोक रेल्वेने आग्नेय रोमानियातील जेसिमल शहरात पोहोचले.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Russia Ukraine Conflict : एअर इंडियाचे विमान बुखारेस्टला रवाना, युक्रेनमध्ये भारतीयांना मायदेशी आणणार
- Russia Ukraine Crisis : युक्रेनमधील अडकलेल्या भारतीयांसाठी एअर इंडियाच्या फ्लाइट्स, पुतिन यांच्याकडून भारतीयांच्या सुरक्षेचे आश्वासन
- Russia Ukraine War: 'मैं झुकेगा नही...', युक्रेनची रक्षा करण्यासाठी कीवमध्येच उभा; राष्ट्राध्यक्ष व्होदिमर झेलेन्स्की यांचा व्हिडीओ व्हायरल
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha