Russia Ukraine Conflict : एअर इंडियाचे विमान बुखारेस्टला रवाना, युक्रेनमध्ये भारतीयांना मायदेशी आणणार
Russia Ukraine Conflict : युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी एअर इंडियाचे विमान बुखारेस्टला रवाना झाले आहे.
Russia Ukraine Conflict : युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी एअर इंडियाचे विमान बुखारेस्टला रवाना झाले आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी एअर इंडियाच्या विमानाने शनिवारी सकाळी रोमानियाची राजधानी बुखारेस्टसाठी मुंबई विमानतळावरून उड्डाण केले. वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले की, फ्लाइट क्रमांक AI1943 ने मुंबई विमानतळावरून पहाटे 3.40 वाजता उड्डाण केले आणि IST सकाळी 10 वाजेच्या सुमारास बुखारेस्ट विमानतळावर पोहोचणे अपेक्षित आहे.
युक्रेनमधील भारतीय नागरिकांना घेऊन रोमानियाहून एअर इंडियाचे विमान आज दुपारी चार वाजता मुंबईत दाखल होणे अपेक्षित आहे.केंद्रीय मंत्री पीयूष गोयल मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर मायदेशी परतणाऱ्या भारतीयांचे स्वागत करतील. वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले की, युक्रेन-रोमानिया सीमेवर रस्तेमार्गे पोहोचलेल्या कोणत्याही भारतीय नागरिकांना भारतीय सरकारी अधिकारी बुखारेस्टला घेऊन जातील जेणेकरून त्यांना एअर इंडियाच्या फ्लाइटद्वारे घरी आणता येईल. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना मायदेशी आणण्यासाठी एअर इंडिया शनिवारी बुखारेस्ट आणि हंगेरीची राजधानी बुडापेस्ट येथे उड्डाणे होणार आहेत.
Air India evacuation flight from Romania carrying Indian citizens evacuated from Ukraine is arriving in Mumbai at 4 p.m. today
— PIB in Maharashtra 🇮🇳 (@PIBMumbai) February 26, 2022
Union Minister Shri Piyush Goyal will receive the evacuees at Chhatrapati Shivaji Maharaj International Airport, Mumbaihttps://t.co/KRzKlKpepz
केंद्र सरकारसह राज्य सरकारही युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. युक्रेनमधील भारतीय दूतावासाकडून अडकलेल्या भारतीयांसाठी सूचना जारी करण्यात आली आहे. भारत सरकारच्या अधिकाऱ्यांशी पूर्व समन्वय साधल्याशिवाय कोणत्याही सीमेवर जाऊ नये, असे सांगण्यात आले आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Russia Ukraine Crisis : युक्रेनमधील अडकलेल्या भारतीयांसाठी एअर इंडियाच्या फ्लाइट्स, पुतिन यांच्याकडून भारतीयांच्या सुरक्षेचे आश्वासन
- Russia Ukraine Crisis : 1200 भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले, आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वड्डेट्टीवार यांची माहिती
- Russia Ukraine War: 'मैं झुकेगा नही...', युक्रेनची रक्षा करण्यासाठी कीवमध्येच उभा; राष्ट्राध्यक्ष व्होदिमर झेलेन्स्की यांचा व्हिडीओ व्हायरल
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha