एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Russia Ukraine War : रशिया आणि युक्रेन नागरिकांच्या संरक्षणासाठी सुरक्षित कॉरिडॉर तयार करणार, जाणून घ्या 10 महत्त्वाचे मुद्दे
Russia Ukraine War : रशियाशी चर्चा करणार्या युक्रेनच्या शिष्टमंडळाच्या सदस्याने सांगितले की, दोन्ही देशांनी नागरिकांच्या स्थलांतरासाठी आणि मानवतावादी मदत पुरवण्यासाठी सुरक्षित कॉरिडॉर तयार करण्यासाठी तात्पुरता करार केला आहे.
![Russia Ukraine War : रशिया आणि युक्रेन नागरिकांच्या संरक्षणासाठी सुरक्षित कॉरिडॉर तयार करणार, जाणून घ्या 10 महत्त्वाचे मुद्दे russia ukraine agree to build humanitarian corridors for safety of both countries citizens Russia Ukraine War : रशिया आणि युक्रेन नागरिकांच्या संरक्षणासाठी सुरक्षित कॉरिडॉर तयार करणार, जाणून घ्या 10 महत्त्वाचे मुद्दे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/03/0f29a6b8e1f640a26751678b4f58f789_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Russia Ukraine War
Russia Ukraine War : रशियासोबत चर्चा करणार्या युक्रेनच्या शिष्टमंडळाच्या सदस्याने सांगितले की, दोन्ही देशांनी नागरिकांच्या सुरक्षित स्थलांतरासाठी आणि मानवतावादी मदत पुरवण्यासाठी सुरक्षित कॉरिडॉर तयार करण्यासाठी तात्पुरता करार केला आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांचे सल्लागार मिखाइलो पोडोलियाक यांनी सांगितले की, रशिया आणि युक्रेन यांनी प्राथमिक करार केला आहे की ज्या भागात सुरक्षित कॉरिडॉर बांधले गेले आहेत तेथे युद्धविराम लागू केला जाईल.
जाणून घ्या 10 महत्त्वाचे मुद्दे :
- युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्या सल्लागाराच्या दिलेल्या माहितीनुसार, मॉस्को आणि कीव्ह यांच्यातील चर्चेच्या दुसऱ्या फेरीत नागरिकांसाठी सुरक्षित कॉरिडॉर तयार करण्याचा तात्पुरता करार झाला. या कॉरिडॉरच्या कार्याबाबत अद्याप पूर्ण स्पष्टता नाही.
- राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या बैठकीत पुतिन यांनी पुर्नरुच्चार केला की, रशिया नव्या नाझींना उखडून टाकत आहे. रशियन आणि युक्रेनियन नागरिक एक आहेत, हा विश्वासाला कायम राहील.
- पूतिन यांनी फ्रेंच अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांना सांगितले की मॉस्कोचा राष्ट्रवादी सशस्त्र गटांच्या अतिरेक्यांविरुद्ध बिनधास्त लढा सुरू ठेवण्याचा मानस आहे.
- झेलेन्स्कीने पश्चिमेकडील देशांना लष्करी मदत वाढवण्याचे आवाहन केले आहे. झेलेन्स्की यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, जर युक्रेनचा अंत झाला तर, तर पुढे लॅटव्हिया, लिथुआनिया, एस्टोनियावर संकट ओढवेल. पुतीन यांच्याशी थेट चर्चा हाच युद्ध थांबवण्याचा एकमेव मार्ग आहे.
- उत्तर युक्रेनमधील चेर्निहाइव्ह शहरात रशियन सैन्याने निवासी भागात शाळा आणि उच्चभ्रू इमारतींवर हल्ला केल्याने गुरुवारी 33 लोकांचा मृत्यू झाला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
- रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी पाश्चात्य राजकारण्यांवर अणुयुद्धाचा विचार केल्याचा आरोप केला. लावरोव्ह यांनी रशियन आणि परदेशी माध्यमांना सांगितले की, पाश्चात्य राजकारण्यांच्या डोक्यात अणुयुद्धाची कल्पना सतत फिरत आहे आणि रशियन लोकांच्या डोक्यात नाही.
- रशियन सैन्याने दक्षिण युक्रेनमधील खेरसनच्या काळ्या समुद्रातील बंदरावर कब्जा केला आहे. मॉस्कोला धक्का बसल्याचे हे पहिले मोठे शहर आहे.
- UN ने कथित युद्ध गुन्ह्यांची चौकशी सुरू केली आहे. याचे कारण की, रशियन सैन्याने युक्रेनमधील शहरांवर शेल आणि क्षेपणास्त्रांचा भडिमार केल्याने नागरिकांना तळघरांमध्ये आश्रय घेण्यास भाग पाडले आहे.
- युरोपियन युनियनने युक्रेनमधून पळून जाणाऱ्या युद्ध निर्वासितांसाठी संरक्षण यंत्रणा जलद गतीने मंजूर करणे अपेक्षित आहे. युक्रेनमधून पळून जाणाऱ्यांची संख्या आतापर्यंत सुमारे एक दशलक्ष आहे.
- युरोपियन युनियनने केलेल्या हालचाली रशियावर अनेक निर्बंध लादले गेले आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Russia Ukraine War : 'यूक्रेनमध्ये मेडिकल शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची माहिती गोळा करा', महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाचे निर्देश
- Russia Ukraine War : रशिया-युक्रेन युद्ध संपवण्याबाबत कोणताही करार नाही, लवकरच चर्चेच्या तिसऱ्या फेरीची शक्यता
- Russia Ukraine War: युक्रेननं भारतीय विद्यार्थ्यांना ओलीस ठेवलं, रशियाचा आरोप; मदतीसाठी सरसावणार!
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
बीड
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)