रशिया, चीन आणि पाकला UNHRC मधून बाहेर काढण्याची मागणी, गुरुवारी UN मध्ये होऊ शकते मतदान
संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेमधून (UNHRC) रशिया, चीन आणि पाकिस्तानला बाहेर काढा, अशी मागणी करण्यात आली आहे.
![रशिया, चीन आणि पाकला UNHRC मधून बाहेर काढण्याची मागणी, गुरुवारी UN मध्ये होऊ शकते मतदान Russia, China and Pakistan are set to withdraw from the UNHRC on Thursday रशिया, चीन आणि पाकला UNHRC मधून बाहेर काढण्याची मागणी, गुरुवारी UN मध्ये होऊ शकते मतदान](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/10/14/9c369534d56f17f2c646731192e42df1_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेमधून (UNHRC) रशिया, चीन आणि पाकिस्तानला बाहेर काढा, अशी मागणी करण्यात आली आहे. युनायटेड नेशन्स वॉचचे कार्यकारी संचालक हिलेल न्युअर यांनी बुधवारी ही मागणी केली. या संदर्भात गुरुवारी यूएनमध्ये मतदान होऊ शकते, असे सांगण्यात येत आहे.
रशियाने युक्रेनवर केलेला हल्ला आणि मानवाधिकारांचे उल्लंघन यावर ही मागणी करण्यात आली आहे. 14व्या जिनिव्हा शिखर परिषदेसाठी प्रतिनिधींचे स्वागत करताना न्युअर म्हणाले की, इतिहासात ही दुसरी वेळ आहे की काही UNSC सदस्यांना परिषदेतून बाहेर काढले जाऊ शकते. यामध्येच अमेरिकेने जाहीर केले आहे की, आम्ही आणि इतर युरोपीय देश युक्रेनसाठी एकत्र काम करू.
न्युअर म्हणाले की, रशियाने छळलेल्या युक्रेनला सशक्त केले पाहिजे. मानवाधिकार आणि लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी रशियाला परिषदेतून निलंबित करण्यासाठी पावले उचलण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. न्युअर यांनी परिषदेतील गैर-लोकशाही देशांच्या सदस्यत्वावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्याने दावा केला की, रशियाला मानवाधिकार परिषदेतून काढून टाकले जाण्याची खात्री आहे, कारण केवळ काही सदस्य त्याला मतदान करतील.
अमेरिकन राजदूताने रशियाचा केला विरोध
मंगळवारी संयुक्त राष्ट्रातील अमेरिकन राजदूत लिंडा थॉमस ग्रीनफिल्ड म्हणाल्या की, मानवी हक्कांचा आदर वाढविण्याचा उद्देश असणाऱ्या परिषदेत रशियाने असू नये. त्या म्हणाले की, रशिया परिषदेतील सदस्यत्वाचा वापर करून मानवाधिकारांची काळजी घेतो, असा प्रचार करत आहे. परंतु रशियाच्या परिषदेतील सहभागामुळे या संस्थेच्या विश्वासार्हतेवर प्रश्न निर्माण होत असून, संपूर्ण संयुक्त राष्ट्राला हानी पोहोचत आहे.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)