IS Terrorist Arrest In Russia: भारतातील सत्ताधारी नेत्याच्या हत्येचा कट; IS च्या आत्मघाती दहशतवाद्याला रशियात अटक
IS Terrorist Arrest In Russia: भारतात आत्मघाती हल्ला करण्याच्या तयारीत असलेल्या इस्लामिक स्टेटच्या एका दहशतवाद्याला रशियात अटक करण्यात आली आहे.
IS Terrorist Arrest In Russia: रशियात इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्याला (IS Terrorist Arrest) अटक करण्यात आली आहे. या हल्लेखोराने चौकशीत मोठा गौप्यस्फोट केला आहे. भारतातील सत्ताधारी पक्ष, भाजपमधील मोठ्या नेत्याच्या हत्येचा कट आखण्यात आला असल्याची (IS Plan to Terror Attack in India) कबुली या दहशतवाद्याने दिली आहे. रशियाच्या फेडरल सिक्युरिट सर्व्हिसेसने त्याच्या अटकेची माहिती दिली.
रशियन तपास यंत्रणांनी दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटशी संबंधित एका दहशतवाद्याची ओळख पटवली. त्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले. या दहशतवाद्याने भारतातील सत्ताधारी भाजपच्या मोठ्या नेत्याच्या हत्येचा कट आखला होता अशी माहिती, रशियन तपास यंत्रणांनी दिली. अटकेत असलेला दहशतवादी हा आत्मघाती हल्लेखोर असल्याची माहिती समोर आली आहे.
रशियाने इस्लामिक स्टेट या दहशवादी संघटनेवर बंदी घातली आहे. रशियन तपास यंत्रणांना या दहशतवाद्याच्या हालचाली माहिती मिळाल्यानंतर त्याला अटक केली. हा दहशतवादी 30 वर्षीय आशियाई युवक असल्याची माहिती वृत्तसंस्थांनी दिली. भारतातील मोठ्या राजकीय नेत्याची हत्या याच वर्षात करण्याचा कट त्याने आखला होता, अशी माहितीदेखील चौकशीतून समोर आली आहे.
तीन महिने तुर्कीत प्रशिक्षण
रशियन वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, या दहशतवाद्याने एप्रिल ते जून दरम्यान तुर्कीत दहशतवादी हल्ल्याचे प्रशिक्षण घेतले होते. या तरुणाला इस्लामिक स्टेटच्या मोठ्या नेत्याने दहशतवादी संघटनेत सामिल करून घेतले होते. टेलिग्रामच्या माध्यमातून हा युवक इस्लामिक स्टेटमध्ये सामिल झाला.
भारतात होणार होता दाखल
रशियन संस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, इस्लामिक स्टेटने काही आवश्यक कागदपत्रांसह त्याला रशियात पाठवले होते. त्यानंतर रशियातून भारतात हा युवक दाखल होणार होता. भारतात एका मोठ्या राजकीय नेत्यावर हल्ला करण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपवण्यात आली होती. कोणत्या नेत्यावर हल्ला होणार होता, याची माहिती अद्याप समोर आली नाही.
इस्लामिक स्टेट ही दहशतवादी संघटना क्रूर दहशतवादी संघटना समजली जाते. वर्ष 2013 मध्ये ही दहशतवादी संघटना अस्तित्वात आली होती. या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या अबू बक्र अल बगदादी याला मुस्लिमांचा खलिफा घोषित करण्यात आले. इराक आणि सीरियातील मोठ्या भूभागावर या दहशतवादी संघटनेचा ताबा आहे. त्याशिवाय, आफ्रिकेतील काही देशांमध्येही आयएस शिरकाव करण्याच्या प्रयत्नात असल्याचे म्हटले जात आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या: