एक्स्प्लोर
Advertisement
ब्रिटनच्या राजघराण्यात नवा पाहुणा, प्रिन्स हॅरी-मेगन मार्कल यांच्या 'रॉयल बेबी'चं आगमन
ब्रिटनचे प्रिन्स हॅरी आणि अभिनेत्री मेगन मार्कल यांना स्थानिक वेळेनुसार 6 मे रोजी पहाटे 5 वाजून 26 मिनिटांनी मुलगा झाला.
लंडन : ब्रिटनच्या राजघराण्यात नव्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. प्रिन्स हॅरी आणि अभिनेत्री मेगन मार्कल यांना मुलगा झाला. स्थानिक वेळेनुसार 6 मे रोजी पहाटे 5 वाजून 26 मिनिटांनी बाळाचा जन्म झाला.
हॅरी हे ड्यूक ऑफ ससेक्स, तर मेगन मार्कल या हर रॉयल हायनेस द डचेस ऑफ ससेक्स म्हणून ओळखले जातात. ब्रिटनच्या राजघराण्यातील नवा पाहुणा क्वीन एलिझाबेथ यांचं चौथं पतवंड ठरलं आहे
प्रिन्स हॅरी यांनी आपण अत्यंत आनंदी आहोत, अशा भावना व्यक्त केल्या. प्रिन्स हॅरी आणि मेगन यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनीही दोघांचं अभिनंदन केलं आहे.
प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कल यांचं रॉयल वेडिंग लंडनमधील सेंट जॉर्ज चॅपेलमध्ये गेल्या वर्षी (19 मे 2018 रोजी) झालं होतं. प्रिन्स हॅरी हे दिवंगत प्रिन्सेस डायना आणि प्रिन्स चार्ल्स यांचे धाकटे पुत्र, तर क्वीन एलिझाबेथ द्वितीय यांचे नातू आहेत. मेगन मार्कलने लग्नापूर्वी टीव्ही आणि चित्रपटांमध्ये अभिनय केला होता. सुट्स, फ्रिंज, सीएसआय : मायामी, नाईट रायडर अँड कॅसल सारख्या टीव्ही सीरिज, हॉरिबल बॉसेस सारख्या चित्रपटात ती झळकली आहे. केंब्रिजचे ड्यूक आणि डचेस अर्थात प्रिन्स हॅरी यांचे ज्येष्ठ बंधू प्रिन्स विल्यम आणि केट मिडलटन यांना 5 वर्षांचा प्रिन्स जॉर्ज, 3 वर्षांची प्रिन्सेस शार्लेट आणि सव्वा वर्षांचा प्रिन्स ल्युईस ही तीन अपत्यं आहेत.Her Royal Highness The Duchess of Sussex was safely delivered of a son at 0526hrs. The baby weighs 7lbs 3oz and The Duke of Sussex was present for the birth. Read the full announcement here: https://t.co/RCUFjQG8pe
— The Royal Family (@RoyalFamily) May 6, 2019
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
क्रिकेट
पुणे
कोल्हापूर
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
for smartphones
and tablets
and tablets
संकेत वरकप्रतिनिधी
Opinion