सासूने पकडले पाय, पतीने दाबला गळा; नवऱ्याने सासूच्या मदतीने बायकोचा काटा काढला
Delhi Crime News : नोएडा पोलिसांना गौतमबुद्ध नगर युनिर्व्हसिटीमधील स्टाफ क्वार्टरमधील पाण्याची टाकीत एका महिलेचा मृतदेह सापडला होता. नोएडा पोलिसांनी आता या हत्येचं गूढ उकललं आहे.
नवी दिल्ली : नोएडामधील गौतमबुद्ध नगर युनिर्व्हसिटी कॅम्पसमध्ये एका महिलेली निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. नोएडा पोलिसांना गौतमबुद्ध नगर युनिर्व्हसिटीमधील स्टाफ क्वार्टरमधील पाण्याची टाकीत एका महिलेचा मृतदेह सापडला होता. नोएडा पोलिसांनी आता या हत्येचं गूढ उकललं आहे. स्टाफ क्वार्टरमध्ये आढळलेल्या महिलेच्या मृत्यू प्रकरणी पोलिसांनी महिलेचा पती आणि सासू सुमित्रा यांना अटक केला आहे. पती आणि सासू या दोघांनीच मिळून महिलेची हत्या केली असल्याचं उघड झालं आहे.
नवऱ्याने सासूच्या मदतीने बायकोची केली हत्या
महिलेची हत्या तिचा पती कपिल आणि सासू सुमित्रा यांनी केल्याचा खुलासा नोएडा पोलिसांकडून करण्यात आला आहे. मृतदेह पाण्याच्या टाकीत लपवून दोघांनी पळ काढला होता. पतीने सासूच्या मदतीने पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पतीने आईच्या मदतीने आपल्याच पत्नीची निर्घृणपणे हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. क्षुल्लक कारणावरून सासू आणि सूनेमध्ये वाद झाला. या वादाचं रुपांतर नंतर हाणामारीत झालं आणि सासू आणि पतीने मिळून महिलेची हत्या केली.
सासूने पकडले पाय, पतीने दाबला गळा
सासूशी झालेल्या किरकोळ भांडणातून नवऱ्यानेच पत्नीचा जीव घेतल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे. पोलिसांना स्टाफ क्वार्टरमधील सिमेंटच्या पाण्याच्या टाकीत पूनमचा मृतदेह आढळला होता. ग्रेटर नोएडाचे अतिरिक्त डीसीपी अशोक कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, सासू सुमित्रा यांनी पूनमचे पाय धरले होते, तर पती कपिलने तिचा गळा दाबला होता, असे चौकशीदरम्यान सांगत पूनमची हत्या केल्याचं कबूल केलं आहे. पूनम आणि तिची सासू सुमित्रा यांच्यात 5 मे रोजी कडाक्याचं भांडण झालं होतं. कपिलही या भांडणात सामील झाला होता. नंतर हे भांडण टोकाला पोहोचलं, यावेळी कपिलने पूनमला धक्का दिला, ज्यामुळे ती खाली पडली. यानंतर सासू सुमित्राने पूनमचे पाय धरले आणि पती कपिलने तिचा गळा दाबून तिची हत्या केली.
मृतदेह पाण्याच्या टाकीत टाकून फरार
पूनमच्या मृत्यूनंतर तिचा मृतदेह स्टाफ क्वार्टरमधील सिमेंटच्या पाण्याच्या टाकीत टाकून आई आणि मुलगा दोघांनी पळ काढला. मॅन्युअल इंटेलिजन्स आणि इलेक्ट्रॉनिक सर्विलंसच्या मदतीने आरोपी कपिल आणि सुमित्रा या दोघांना जिम्स तिराहा येथून नोएडा पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. आरोपी कपिल हा मूळचा अलिगड, उत्तर प्रदेशचा रहिवासी असून तो विद्यापीठात चतुर्थ श्रेणी कर्मचारी आहे. तो पत्नी पूनम आणि आई सुमित्रासोबत विद्यापीठाच्या एम ब्लॉक एफ-53 येथील स्टाफ क्वार्टरमध्ये राहत होता.
महत्त्वाच्या इतर बातम्या :