(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Lebanon Pager Serial Blasts : लेबनॉनमधील 'दे दणादण' पेजर स्फोटात भारतीय वंशाच्या उद्योजकाचे नाव समोर! 7 भाषा बोलणारी सीईओ सुद्धा रडारवर
Lebanon Pager Serial Blasts : रिन्सनसह हंगेरियन सीईओ क्रिस्टियानो बारसोनी यांचेही नाव संशयितांच्या यादीत आहे. पेजर पुरवठ्यात तैवान, हंगेरी आणि बल्गेरियातील कंपन्यांची नावे समोर आली आहेत.
Lebanon Pager Serial Blasts : लेबनॉनमधील पेजर स्फोटात (Lebanon Pager Serial Blasts) भारतीय वंशाच्या रिन्सन जोसचे (वय 37) याचे नाव समोर आले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, केरळच्या वायनाडमध्ये जन्मलेला रिन्सन जोस बल्गेरियन कंपनी नॉर्टा ग्लोबल लिमिटेडचे मालक आहेत. रिन्सन यांच्यावर नॉर्टा ग्लोबल (Norta Global Limited) या कंपनीच्या माध्यमातून हिजबुल्लाह संघटनेला पेजर पुरवल्याचा आरोप आहे. लेबनॉनमध्ये पेजर स्फोटाचा आरोप इस्रायलवर आहे. रिपोर्ट्सनुसार, वायनाडमध्ये राहणाऱ्या रिन्सनच्या वडिलांनी पोलिसांना सांगितले की, त्यांचा मुलगा रोज फोन करायचा, पण गेल्या अनेक दिवसांपासून त्याचा फोन आला नव्हता.
रिन्सनसह हंगेरियन सीईओ क्रिस्टियानो बारसोनी यांचेही नाव संशयितांच्या यादीत आहे. पेजर पुरवठ्यात तैवान, हंगेरी आणि बल्गेरियातील कंपन्यांची नावे समोर आली आहेत. 17 सप्टेंबर रोजी लेबनॉनमध्ये पेजर बॉम्बस्फोट झाले होते. यामध्ये 12 जणांचा मृत्यू झाला असून सुमारे 3000 लोक जखमी झाले आहेत.
बल्गेरियाने रिन्सन जोसला क्लीन चिट दिली
सीबीएस न्यूजनुसार, नॉर्टा ग्लोबल लिमिटेडची स्थापना एप्रिल 2022 मध्ये झाली. नॉर्टा ग्लोबलची मालकी रिन्सन जोस यांच्याकडे आहे, जो मूळचा नॉर्वेचा आहे. रॉयटर्स वृत्तसंस्थेनं नॉर्टा ग्लोबलचे मालक रिन्सन जोस यांच्याशी ईमेलद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु, अद्याप त्यांना प्रतिसाद मिळालेला नाही. बल्गेरियाच्या राष्ट्रीय सुरक्षा एजन्सीने रिन्सन जोसला क्लीन चिट दिली आहे. सुरक्षा एजन्सीने सांगितले की, रिन्सन जोस आणि त्याच्या नॉर्टा ग्लोबलची कोणतीही शिपमेंट देशातून निघून गेली नाही.
रिन्सन नॉर्वेला अभ्यासासाठी गेला होता, हल्ल्यानंतर बेपत्ता
केरळ मीडिया वेबसाइट मनोरमानुसार, रिन्सन हा वायनाडचा रहिवासी आहे. एमबीए पूर्ण केल्यानंतर तो नॉर्वेला गेला होता आणि नोव्हेंबर 2023 मध्ये गावी शेवटची भेट दिली होती. तो नॉर्वेमध्ये सल्लागार कंपनी चालवत होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रिन्सन सध्या अमेरिकेत असून त्यांची नॉर्टा ग्लोबल लिमिटेड ही इस्त्रायली शेल कंपनी असू शकते.
काही दिवसांपासून त्याचा एकही फोन आला नाही
पोलिसांनी रिन्सनच्या पालकांना त्यांच्या घरी अनेकदा भेट दिली आहे, परंतु अद्याप अधिकृतपणे चौकशी केलेली नाही. रिन्सनचे वडील जोस मूथेडम हे मानंतवाडी गावात शिंपी म्हणून काम करत होते, त्यांना परिसरात 'टेलर जोस' म्हणून ओळखले जाते. त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना सांगितले की, आपला मुलगा रोज फोन करत असे, मात्र काही दिवसांपासून त्याचा एकही फोन आला नाही. शुक्रवारी त्यांना फोन केला पण संपर्क होऊ शकला नाही.
7 भाषा जाणणारी हंगेरियन सीईओ संशयाच्या भोवऱ्यात
तैवानची कंपनी गोल्ड अपोलोने हे पेजर्स बनवल्याचा दावा यापूर्वी करण्यात आला होता, मात्र गोल्ड अपोलोने याचा इन्कार केला होता. गोल्ड अपोलोने सांगितले होते की, पेजरवर त्यांच्या कंपनीचे नाव असूनही त्यांनी त्याचा पुरवठा केला नव्हता. हंगेरियन कंपनी बीएसी कन्सल्टिंगने ते बनवले असावे, असे गोल्ड अपोलोने म्हटले आहे. त्यांचा बीएसी कन्सल्टिंगशी करार आहे. या कंपनीचे मुख्यालय राजधानी बुडापेस्ट येथे आहे.
त्यानंतर, हंगेरियन मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला की बीएसी कन्सल्टिंग या व्यवहारात केवळ मध्यस्थ आहे. बीएसी कन्सल्टिंग कार्यरत नाही, त्याचे कार्यालयही नाही. बीएसी कन्सल्टिंगच्या सीईओ क्रिस्टियाना बारसोनी यांनी सांगितले की बीएसी कन्सल्टिंग केएफटी गोल्ड अपोलोसोबत काम करते, परंतु पेजर बनवण्यास नकार दिला. बारसोनी 7 भाषांमध्ये अस्खलित आहे आणि प्रॅक्टिकल फिजिक्समध्ये पीएचडी आहे.
इतर महत्वाच्या बातम्या