ब्रिटनच्या महाराणी क्वीन एलिझाबेथ डॉक्टरांच्या देखरेखीखाली, प्रकृती चिंताजनक असल्याचं वृत्त
Queen Elizabeth II Health latest News: ब्रिटनच्या महाराणी क्वीन एलिझाबेथ यांच्या प्रकृती चिंताजनक असून राजघराण्यातील लोकांनी बकिंगहॅम पॅलेसकडे धाव घेतली आहे.
लंडन: ब्रिटनच्या राजघराण्यात गेल्या 70 वर्षांपासून राज्य करणाऱ्या महाराणी एलिझाबेथ यांची प्रकृती चिंताजनक असून त्या सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली असल्याची माहिती बकिंगहॅम पॅलेसच्या वतीनं देण्यात आली आहे. एएफपी या वृत्तसंस्थेनेही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यांच्या प्रकृतीची माहिती मिळताच डचेस ऑफ सस्सेक्स मेगन मर्कल आणि प्रिन्स हॅरी हे देखील बकिंगहॅम पॅलेसकडे रवाना झाल्याचं वृत्त आहे.
ब्रिटनच्या नवनियुक्त पंतप्रधान लिझ ट्रस यांनी महाराणी एलिझाबेथ यांच्या प्रकृतीविषयी चिंता व्यक्त केली आहे. पंतप्रधान लिझ ट्रस यांनी दोनच दिवसांपूर्वी महाराणींची भेट घेतली होती.
The whole country will be deeply concerned by the news from Buckingham Palace this lunchtime.
— Liz Truss (@trussliz) September 8, 2022
My thoughts - and the thoughts of people across our United Kingdom - are with Her Majesty The Queen and her family at this time.
गेल्या 70 वर्षांपासून महाराणी
ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ या गेल्या 70 वर्षांपासून महाराणी या पदावर आहेत. त्यांनी थायंलडचा राजा भूमिबोल अदुल्यादेज (Bhumibol Adulyadej) यांना मागे टाकत सर्वाधिक काळ राजसत्तेत राहण्याचा विक्रम केला आहे. थायलंडच्या राजाने 1927 ते 2016 या कालावधील तब्बल 70 वर्षे 126 दिवस राज्य केले होते. फ्रान्सचे चौदावे लुई हे दीर्घकाळ राज्य करणारे पहिले सम्राट आहेत. त्यांनी 1643 ते 1745 या कालावधीत म्हणजे तब्बल 73 वर्षे 110 दिवस राज्य केले होते. 1953 साली सिंहासनावर बसणाऱ्या ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांनी सप्टेंबर 2015 साली महाराणी व्हिक्टोरिया ( Queen Victoria) यांना मागे टाकत दीर्घकाळ सेवा करणाऱ्या ब्रिटिश सम्राज्ञी (British monarc) ठरल्या आहेत.
#UPDATE Queen Elizabeth II's doctors are "concerned" for her health and recommended she "remain under medical supervision", Buckingham Palace said on Thursday pic.twitter.com/WoJb97EMfc
— AFP News Agency (@AFP) September 8, 2022
महत्त्वाच्या बातम्या :
- राणी एलिझाबेथ यांनी ब्रिटनच्या पंतप्रधानपदी ट्रस यांची केली नियुक्ती, नवीन मंत्र्यांची नावे आज होणार जाहीर
- Britain : महाराणी एलिझाबेथ यांची सत्तेची 'सत्तरी'; राणी म्हणून 70 वर्षांची कारकीर्द पूर्ण