एक्स्प्लोर

PM Modi France Visit: पंतप्रधान मोदी पॅरिसमध्ये दाखल, राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांची घेणार भेट

PM Modi: डेन्मार्कच्या अर्थपूर्ण’ भेटीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी पॅरिसला पोहोचले आहेत. डेन्मार्कच्या भेटीदरम्यान मोदींनी पंतप्रधान मेटे फ्रेडरिक्सन यांची भेट घेतली.

PM Modi: डेन्मार्कच्या अर्थपूर्ण’ भेटीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी पॅरिसला पोहोचले आहेत. डेन्मार्कच्या भेटीदरम्यान मोदींनी पंतप्रधान मेटे फ्रेडरिक्सन यांची भेट घेतली. यासोबतच या भेटीनंतर पंतप्रधान मोदी यांनी दुसऱ्या भारत-नॉर्डिक शिखर परिषदेला हजेरी लावली.

तीन युरोपीय देशांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यावर पंतप्रधान मोदी हे मंगळवारी बर्लिनहून येथे आले होते. डॅनिश पंतप्रधान मेटे फ्रेडरिक्सन यांच्याशी मोदींची मंगळवारी अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. त्यांनी भारतीय समुदायालाही संबोधित केले आणि डॅनिश राजघराण्याशी संवाद साधला. पंतप्रधान मोदी बुधवारी डेन्मार्कमधील दुसऱ्या भारत-नॉर्डिक शिखर परिषदेत सहभागी झाले होते. परिषदेत प्रामुख्याने साथीच्या कोरोना संकटानंतर आर्थिक पुनर्प्राप्ती, हवामान बदल, ऊर्जा आणि जागतिक सुरक्षा परिदृश्य यावर लक्ष केंद्रित केले गेले. शिखर परिषदेच्या पार्श्‍वभूमीवर मोदींनी नॉर्वे, स्वीडन, आइसलँड आणि फिनलंड येथील त्यांच्या समकक्षांशी द्विपक्षीय बैठका घेतल्या आणि त्यांच्याशी द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्याच्या मार्गांवर चर्चा केली.

मोदी फ्रान्समध्ये मॅक्रॉन यांची भेट घेणार 

पॅरिसमध्ये अल्पावधीत मोदी इमॅन्युएल मॅक्रॉन यांची भेट घेतील. एप्रिलमध्ये फ्रान्सच्या अध्यक्षपदी फेरनिवड झाल्यानंतर मॅक्रॉन यांच्यासोबत बैठक घेणारे मोदी हे पहिले जागतिक नेते असतील. मॅक्रॉन यांची अध्यक्षपदी पुन्हा निवड झाल्याबद्दल मोदींनी त्यांचे अभिनंदन केले होते. मोदींनी ट्विट केले होते की, “माझा मित्र इमॅन्युएल मॅक्रॉन यांची पुन्हा निवड झाल्याबद्दल अभिनंदन. भारत-फ्रेंच धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत करण्यासाठी एकत्र काम करत राहण्यास मी उत्सुक आहे.”

इतर महत्वाच्या बातम्या: 

महत्त्वाच्या बातम्या

Colombia Earthquake : कोलंबियात 7.4 रिश्टर स्केलचा विनाशकारी भूकंप; 20 जणांचा मृत्यू, अनेक इमारती कोसळल्या, परिस्थिती बिकट
कोलंबियात 7.4 रिश्टर स्केलचा विनाशकारी भूकंप; 20 जणांचा मृत्यू, अनेक इमारती कोसळल्या, परिस्थिती बिकट
AI Virus: चक्क AI ने बनवला नवा व्हायरस! वैद्यकीय क्षेत्रात क्रांतीची आशा, पण भविष्यातील धोक्याने जग चिंताक्रांत
चक्क AI ने बनवला नवा व्हायरस! वैद्यकीय क्षेत्रात क्रांतीची आशा, पण भविष्यातील धोक्याने जग चिंताक्रांत
India America Trade Deal: भारत अमेरिकेला काय काय विकतो आणि अमेरिकेकडून काय खरेदी करतो?, A टू Z माहिती
भारत अमेरिकेला काय काय विकतो आणि अमेरिकेकडून काय खरेदी करतो?, A टू Z माहिती
H1B Visa: तर H-1B व्हिसा धारकांना तत्काळ अमेरिका सोडावी लागणार; तब्बल 5 लाख भारतीयांवर टांगती तलवार!
तर H-1B व्हिसा धारकांना तत्काळ अमेरिका सोडावी लागणार; तब्बल 5 लाख भारतीयांवर टांगती तलवार!

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Modi and Rohit Pawar: PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
AR Rahman Son AR Ameen Car Accident: ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; गायकाची पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
Maharashtra Live blog updates: नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जव्हार-विक्रमगड परिसर हादरला
Maharashtra Live blog updates: नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जव्हार-विक्रमगड परिसर हादरला
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
Mumbai Rain news: मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
Embed widget