एक्स्प्लोर

प्रेग्नंट ब्रेन डेड आईने 123 दिवसांनी जुळ्यांना जन्म दिला!

रिओ दी जनेरो : चमत्कार कधीतरी घडतात. याचा प्रत्यय ब्राझीलमधील एका कुटुंबाला आला. हे कुटुंब एकीकडे आईच्या जाण्याचं दु:ख करतंय तर त्याचवेळी आश्चर्यकारकरित्या जगलेल्या जुळ्या मुलांच्या जन्माचा आनंदही साजरा करत आहे. कारण फ्रँकिएलेन दे सिल्वा झाम्पोली पजिल्या ह्या गर्भवती ब्रेन डेड महिलेने 123 दिवसांनी जुळ्या मुलांना जन्म दिला. 9 आठवड्यांची गर्भवती असलेल्या फ्रँकिएलेनचा मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये ब्रेनहॅमरेजमुळे मृत्यू झाला. पण तिच्या गर्भातील बाळांच्या हृदयाचे ठोके सुरु असल्याचं डॉक्टरांना समजलं. फ्रँकिएलेन ब्रेन डेड होती, परंतु तिचं शरीर अजूनही न जन्मलेल्या बाळांचं पालनपोषण करत होतं. नोसो सेन्होरा दो रोसिओ या रुग्णालयाच्या स्टाफने ह्या ब्रेन डेड आईची रुम सजवली. ते गर्भातील मुलांसाठी गाणी गायचे, गर्भाशयात वाढणाऱ्या भ्रूणांशी बोलायचे. "आई ब्रेन डेड झाल्यामुळे गर्भाशयातील भ्रूणांच्या जगण्याची शाश्वती नव्हती. पण अल्ट्रासाऊंड केल्यानंतर दोन्ही भ्रूण जिवंत असल्याचं पाहिल्यावर आम्हालाही आश्चर्याचा धक्का बसला," असं फ्रँकिएलेनवर उपचार करणारे डॉक्टर डॉल्टन रिवाबेम यांनी सांगितलं. फ्रँकिएलेनचे सर्व अवयव व्यवस्थित आणि सुरळीत काम करत होते. त्यामुळे तिच्या गर्भाशयातील न जन्मलेल्या मुलांना वाचवण्यासाठी तिला जिवंत ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या वाढीवर आमचं कायमच लक्ष असायचं, असंही डॉक्टर म्हणाले. 123 दिवसांनंतर म्हणजेच सातव्या महिन्यात सीझेरियनद्वारे फ्रँकिएलेनने जुळ्या मुलांना जन्म दिला. ज्यामध्ये एक मुलगी आणि एक मुलगा आहे. त्यांना तीन महिने इक्युबेटरमध्ये ठेवण्यात आलं होतं. आता ही जुळी मुलं वडील म्युरिएल पजिल्या आणि आजी ऍअँजेला सिल्वा यांच्यासोबत राहतात. "मला माझ्या मुलीचा अभिमान आहे. तिला गमावणं फार कठीण होतं, पण ती एखाद्या योद्ध्याप्रमाणे आपल्या सुंदर मुलांचं रक्षण करत अखेरच्या श्वासापर्यंत लढली," असं अँजेला म्हणाल्या. तर फ्रँकिएलेनचा आत्मा अजूनही माझ्याशी बोलतो, असं म्युरिएल पजिल्या यांचं म्हणणं आहे. "मी आता सुंदर ठिकाणी आहे. तुझ्यावर आता मोठी जबाबदारी आहे, आपल्या दोन्ही मुलांची काळजी तुलाच घ्यायची आहे. तुला आणखी कणखर होऊन पुढील आयुष्य जगायचं आहे," असं फ्रँकिएलेन बोलल्याचं म्युरिएल पजिल्या यांनी सांगितलं. दरम्यान, मुलांच्या जन्मानंतर फ्रँकिएलेनची लाईफ सपोर्ट सिस्टम काढण्यात आली. यानंतर कुटुंबाने तिला अखेरचा निरोप दिला.

महत्त्वाच्या बातम्या

UAE Missile Alert : क्षेपणास्त्र हल्ला होण्याची शक्यता, सुरक्षित स्थळी आश्रय घ्या, संयुक्त अरब अमिरातीने जारी केला हाय अलर्ट 
क्षेपणास्त्र हल्ला होण्याची शक्यता, सुरक्षित स्थळी आश्रय घ्या, संयुक्त अरब अमिरातीने जारी केला हाय अलर्ट 
Global Food Crisis Warning Marathi News: 2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
अमेरिकन सैन्याला ठार मारा, 30 हजार डॉलर्स मिळवा, इराणकडून बक्षीस जाहीर, महिलांसाठी बक्षिसाची रक्कम दुप्पट 
अमेरिकन सैन्याला ठार मारा, 30 हजार डॉलर्स मिळवा, इराणकडून बक्षीस जाहीर, महिलांसाठी बक्षिसाची रक्कम दुप्पट 
घराचं काम सुरु असताना हाती लागला सोन्याचा खजिना, किंमत तब्बल 99 कोटी रुपये, सापडलेले सोने नेमके कोणाचे? 
घराचं काम सुरु असताना हाती लागला सोन्याचा खजिना, किंमत तब्बल 99 कोटी रुपये, सापडलेले सोने नेमके कोणाचे? 

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget