PM Narendra Modi Uses Pakistani Airspace : पीएम मोदींचे विमान पाकिस्तानी हवाई हद्दीत? लाहोर, इस्लामाबादवरून 45 मिनिट्टे उड्डाण केल्याचा दावा!
बालाकोट हल्ल्यानंतर पाकिस्तानने भारतासाठी हवाई हद्द बंद केली होती. भारताने बालाकोट येथे हवाई हल्ला केला होता. यानंतर पाकिस्तानने भारतीय विमानांसाठी आपली हवाई हद्द पूर्णपणे बंद केली आहे.
![PM Narendra Modi Uses Pakistani Airspace : पीएम मोदींचे विमान पाकिस्तानी हवाई हद्दीत? लाहोर, इस्लामाबादवरून 45 मिनिट्टे उड्डाण केल्याचा दावा! PM Narendra Modi Uses Pakistani Airspace It is being claimed that PM Modi used Pakistani airspace while returning from his visit to Poland PM Narendra Modi Uses Pakistani Airspace : पीएम मोदींचे विमान पाकिस्तानी हवाई हद्दीत? लाहोर, इस्लामाबादवरून 45 मिनिट्टे उड्डाण केल्याचा दावा!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/08/25/c1410623ee2b6d57bf3468fc2a8e85fa1724575442557736_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
PM Narendra Modi Uses Pakistani Airspace : पोलंड दौऱ्याहून परतताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (PM Narendra Modi Uses Pakistani Airspace) पाकिस्तानच्या हवाई हद्दीचा वापर केल्याचा दावा केला जात आहे. पाकिस्तानी मीडिया हाऊस डॉनने तेथील नागरी विमान प्राधिकरणाच्या अधिकाऱ्याच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे, रिपोर्टनुसार, पंतप्रधान मोदी 46 मिनिटे पाकिस्तानच्या हवाई क्षेत्रात होते.
पाकिस्तानची हवाई हद्द भारतीय विमानांसाठी हवाई हद्द पूर्णपणे बंद
मोदी यांचे विमान लाहोर आणि इस्लामाबादमार्गे अमृतसरला पोहोचले. जिओ न्यूजनुसार, त्यांचे विमान सकाळी 10.15 वाजता पाकिस्तानच्या हवाई हद्दीत दाखल झाले आणि सकाळी 11.01 पर्यंत तिथेच राहिले. याबाबत भारताने सध्या कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. बालाकोट हल्ल्यानंतर पाकिस्तानने भारतासाठी हवाई हद्द बंद केली होती. भारताने 26 फेब्रुवारी 2019 रोजी पाकिस्तानातील बालाकोट येथे हवाई हल्ला केला होता. यानंतर पाकिस्तानने भारतीय विमानांसाठी आपली हवाई हद्द पूर्णपणे बंद केली आहे.
मार्चमध्ये पाकिस्तानने हवाई क्षेत्र अंशत: उघडले पण भारतीय उड्डाणांसाठी ते मर्यादित ठेवले. डॉनने असा दावाही केला आहे की 2019 मध्ये भारताने पंतप्रधान मोदींच्या विमानांसाठी पाकिस्तानची हवाई हद्द वापरण्याची परवानगी मागितली होती. काश्मीर वादामुळे ते पाकिस्तानने फेटाळले होते. पंतप्रधान मोदींच्या विमानाला जर्मनीला जाण्यासाठी पाकिस्तानच्या हवाई हद्दीची गरज होती. मात्र, दोन वर्षांनंतर पाकिस्तानने मोदींच्या नॉन-स्टॉप विमानाला अमेरिकेच्या हवाई हद्दीतून जाण्याची परवानगी दिली.
मोदींचे टीकाकार त्यांना घेरतील - पाकिस्तानी अधिकारी
डॉनशी बोलताना पाकिस्तानी अधिकाऱ्याने सांगितले की, मोदी भारतात पोहोचताच त्यांचे टीकाकार आमची हवाई हद्द वापरल्याबद्दल त्यांची कोंडी करू शकतात. त्याचवेळी डॉनने मोदींनी पाकिस्तानच्या हवाई क्षेत्राचा वापर करणे हे दोन्ही देशांमधील संबंधांसाठी चांगले संकेत मानले आहे.
पंतप्रधानांच्या प्रवासाच्या मार्गाची सुरक्षा कशी असते?
- भारताच्या पंतप्रधानांच्या परदेश दौऱ्यापूर्वी एसपीजी, एएसएल, एअर ट्रॅफिक कंट्रोल टीम, एव्हिएशन मंत्रालयाचे अधिकारी प्रवासाच्या मार्गावर बैठक घेतात.
- ही माहिती सर्व एअर ट्रॅफिक कंट्रोल अर्थात एटीसीला दिली जाते.
- मीडिया रिपोर्ट्सनुसार, पीएम मोदी बोइंग 777-337 विमान वापरतात. त्याची स्वतःची क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली अंगभूत आहे.
- एअर इंडिया वन शत्रूच्या रडारला सहज चकमा देऊ शकते.
- यात जॅमर नेटवर्क आणि सिग्नल जॅमिंगचे तंत्रज्ञानही आहे.
- उष्णता कॅप्चर करणारी क्षेपणास्त्रे टाळण्याची सुविधाही यात आहे.
- यासाठी कोणत्याही क्रू मेंबरची गरज नाही. हे वैशिष्ट्य विमानात स्वयंचलितपणे कार्य करते.
पाकिस्तानची भारताशी संबंध सुधारण्याची मागणी
पाकिस्तानमध्ये नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर भारतासोबतचे संबंध सुधारण्याची मागणी होत आहे. मार्चमध्ये पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी लंडनमधील एका बैठकीत सांगितले होते की, पाकिस्तानच्या व्यापारी समुदायाला भारतासोबत व्यापारी संबंध पुन्हा सुरू करायचे आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शेहबाज शरीफ यांचे पंतप्रधान झाल्याबद्दल अभिनंदन केले होते. त्याचवेळी मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यावर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि त्यांचे बंधू नवाझ शरीफ यांनी त्यांना शुभेच्छा पाठवल्या. नवाज म्हणाले की, “तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्याबद्दल मोदींचे हार्दिक अभिनंदन. निवडणुकीत तुमच्या पक्षाला मिळालेले यश तुमच्या नेतृत्वावरील लोकांचा विश्वास दर्शवते.” नवाझ शरीफ पुढे लिहितात, “द्वेषाऐवजी आशा आणूया आणि दक्षिणेतील दोन अब्ज (200 कोटी) लोकांचे नशीब बदलण्याची ही संधी घेऊ या.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)