एक्स्प्लोर

PM Modi : दहशतवादविरोधी लढाईत भारत आणि फ्रान्स एकत्र, पॅरीसमधून पंतप्रधान मोदींचा दहशतवादावर हल्लाबोल 

PM Modi in France: दहशतवादाच्या (terrorism) विरोधातील लढाईत भारत आणि फ्रान्स एकत्र असल्याचे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी केलं.

PM Modi in France: दहशतवादाच्या (terrorism) विरोधातील लढाईत भारत आणि फ्रान्स एकत्र असल्याचे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी केलं. ते फ्रान्समध्ये बोलत होते. आपल्या सीमेपलीकडील दहशतवादाचा नायनाट करण्यासाठी कठोर कारवाईची गरज आहे असल्याचे मत दोन्ही देशांच्या नेत्यांनी मांडले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन दिवसांच्या  फ्रान्स दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. यावेळी त्यांनी विविध मुद्दे मांडले.

शांतता आणि स्थैर्य सुनिश्चित करण्याची दोन्ही देशांची जबाबदारी

दहशतवादाच्या विरोधातील लढाईसाठी आणखी पावले उचलण्याचे दोन्ही देशाने मान्य केल्याचे पंतप्रधान म्हणाले. इंडो-पॅसिफिक क्षेत्रात शांतता आणि स्थैर्य सुनिश्चित करण्याची भारत आणि फ्रान्सची विशेष जबाबदारी असल्याचेही पंतप्रधान मोदी म्हणाले. कोरोनाचे संकट आणि युक्रेनमधील युद्धाचा संपूर्ण जगावर परिणाम झाला आहे. याचा विशेषतः 'ग्लोबल साउथ' देशांवर नकारात्मक परिणाम झाला आहे. ही चिंतेची बाब  असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. अशा समस्यांवर उपाय शोधण्यासाठी सर्व देशांनी एकत्रित प्रयत्न करणं आवश्यक आहे. सर्व वाद हे संवादानं सोडवले जाऊ शकतात असा आमचा विश्वास असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. भारत शाश्वत शांततेसाठी योगदान देण्यास तयार असल्याचे ते म्हणाले.

भारत आणि फ्रान यांच्या UPI संदर्भात करार

पंतप्रधानांच्या या दौऱ्यामध्ये दोन्ही देशांनी  UPI संदर्भात करार करण्यात आला आहे.  त्यामुळे आता भारतीयांना फ्रान्समध्ये UPI द्वारे रुपयात पैसे देता येणार आहेत. याची सुरुवात आयफेल टॉवरपासून होणार असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. या करारामुळे भारतीय नवनिर्मितीसाठी एक मोठी नवी बाजारपेठ खुली होणार असल्याचा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला आहे.

 पंतप्रधान मोदींचा 'ग्रँड क्रॉस ऑफ द लीजन ऑफ ऑनर' 

पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांना फ्रान्सच्या या दौऱ्यामध्ये फ्रान्सच्या सर्वोच्च पुरस्काराने म्हणजेच 'ग्रँड क्रॉस ऑफ द लीजन ऑफ ऑनर' सन्मानित करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष इम्यॅनुएल मॅक्रॉन (Emmanuel Macron ) यांच्यामध्ये द्विपक्षीय बैठक देखील पार पडली आहे. राष्ट्राध्यक्ष इम्यॅनुएल मॅक्रॉन यांच्या भेटीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं की, 'फ्रान्स हा संपूर्ण जगात मानवतेसाठी ओळखला जातो. तसेच फ्रान्समध्ये येऊन अभिमान वाटत असल्याचं देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी म्हटलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी युएई दौऱ्यासाठी रवाना

पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसीय फ्रान्स दौऱ्यानंतर आता युएई (UAE) साठी रवाना झाले आहेत.  ते आज पहाटे संयुक्त अरब अमिराती (UAE) दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. संयुक्त अरब अमिराती ते राष्ट्रपती शेख बिन जायद यांची भेट घेतील. युएईसाठी रवाना होण्याआधी पंतप्रधान मोदी यांनी प्रतिक्रिया देत म्हटलं आहे की, माझा युएई दौरा आमच्या सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीतील एका नवीन अध्यायाची सुरुवात करेल.

महत्त्वाच्या बातम्या:

PM Modi France Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इम्यॅनुएल मॅक्रॉन यांच्यात द्विपक्षीय बैठक , पंतप्रधानांनी मानले फ्रान्सच्या राष्ट्रपतींचे आभार

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis : फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड करणाऱ्या, धनश्री सहस्रबुद्धे मनोरुग्णDevendra Fadnavis Office : उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या मंत्रालयातील कार्यालयाबाहेर महिलेकडून तोडफोडMaharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 04 PM 27 Sept 2024ABP Majha Headlines : 04 PM: 27 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Haribhau Bagde: हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Devendra Fadnavis : मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
Sangli News : कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
Pune Gang Rape : पुण्यात धनदांडग्या बापांच्या पोरांच्या विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
पुण्यात विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
Embed widget