एक्स्प्लोर

PM Modi : पंतप्रधान मोदी फ्रान्स दौऱ्यासाठी रवाना, नॅशनल डे परेडमध्ये होणार सहभागी; 14 वर्षानंतर भारताला मिळणार 'हा' मान

PM Modi France Tour : पंतप्रधान मोदी दोन दिवसीय फ्रान्स दौऱ्यासाठी रवाना झाले असून ते बास्तील नॅशनल परेडमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी होतील.

PM Modi France Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज पहाटे दोन फ्रान्स दौऱ्यासाठी (PM Modi France Tour) रवाना झाले आहेत. पंतप्रधान मोदींचा हा फ्रान्स दौरा दोन दिवसांचा असणार आहे. 13 आणि 14 जुलै रोजी पंतप्रधान फ्रान्समध्ये वास्तव्या असतील. 14 जुलै रोजी पंतप्रधान मोदी फ्रान्सच्या बास्तील नॅशनल डे परेड (Bastille Day) मध्ये सहभागी होतील. 14 वर्षानंतर पहिल्यांच्या फ्रान्सच्या या नॅशनल डे परेडमध्ये भारताचे पंतप्रधान सामील होणार आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या फ्रान्स दौऱ्यामध्ये महत्त्वाच्या करारांवर स्वाक्षरी होणार आहे. संरक्षण क्षेत्रासाठी महत्त्वाच्या राफेल-एम च्या कराराकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. फ्रान्स दौऱ्यानंतर पंतप्रधान मोदी संयुक्त अरब अमिराती (UAE) चाही दौरा करणार आहेत.

पंतप्रधान मोदी दोन दिवसीय फ्रान्स दौऱ्यावर

भारत आणि फ्रान्समधील धोरणात्मक भागीदारीला यावर्षी 25 वर्ष पूर्ण होत आहेत, या पार्श्वभूमीवर फ्रान्सचे राष्ट्रापती इमॅनुएल मॅक्रोन (Emmanuel Macron) यांनी पंतप्रधान मोदींना दौऱ्यासाठी खास आमंत्रित केलं आहे. पंतप्रधान मोदींचा हा दौरा फार महत्त्वाचा आहे. पंतप्रधान मोदी 14 जुलै रोजी पॅरिसमधील बास्तील डे परेडमध्ये प्रमुख विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहतील. यानंचर पंतप्रधान मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्रापती इमॅनुएल मॅक्रोन यांच्यासोबत महत्त्वाची बैठक पार पडेल. त्यानंतर 15 जुलै रोजी ते संयुक्त अरब अमिराती (UAE) च्या दौऱ्यासाठी रवाना होतील.

'भारत - फ्रान्स संबंधांना नवी ओळख मिळेल'

फ्रान्सला रवाना होण्यापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, 'आम्ही प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर एकत्र काम करू. मी राष्ट्रपती मॅक्रॉन यांना भेटण्यास उत्सुक आहे. फ्रान्सच्या पंतप्रधान एलिझाबेथ बोर्न (Élisabeth Borne), सिनेटचे अध्यक्ष जेरार्ड लार्चर आणि नॅशनल असेंब्लीचे अध्यक्ष याएल ब्रॉन-पिव्हेट यांच्याशी चर्चा करण्यास उत्सुक आहे. या भेटीमुळे धोरणात्मक भागीदारी आणि परराष्ट्र संबंधांना नवी ओळख मिळेल, असा मला विश्वास आहे.'

पहिल्याच दिवशी भारतीय समुदायाला भेटणार

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान मोदी आज फ्रान्सला रवाना झाले आहेत. मॅक्रॉन यांनी पंतप्रधान मोदींच्या सन्मानार्थ खास डिनरचं आयोजन केलं आहे. पंतप्रधानांच्या फ्रान्स दौऱ्याकडे धोरणात्मक, सांस्कृतिक, वैज्ञानिक, शैक्षणिक आणि आर्थिक द्विपक्षीय संबंध मजबूत करण्याच्या दिशेने एक पाऊल म्हणून पाहिलं जात आहे. फ्रान्स दौऱ्यात पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांचा भर चीनवरील अवलंबित्व कमी करण्यावरही असू शकतो. पंतप्रधान मोदी सहाव्यांदा फ्रान्सला जात आहेत.

भारत-फ्रान्स धोरणात्मक भागीदारीला 25 वर्षे पूर्ण

1998 मध्ये भारताने पोखरणमध्ये अणुचाचणी केली तेव्हा अमेरिका आणि इतर पाश्चिमात्य देशांनी भारतावर अनेक निर्बंध लादले होते. तेव्हा भारताला पाठिंबा देणारा फ्रान्स हा पश्चिमेतील एकमेव देश होता. हा तो काळ होता जेव्हा दोन्ही देशांमधील मैत्रीला सुरुवात झाली होती. 1998 मध्ये भारत आणि फ्रान्स एकमेकांचे सामरिक भागीदार बनले. दोन्ही देशांनी सामरिक भागीदार होण्यासाठी करार केला होता. त्याला 2023 मध्ये 25 वर्षे पूर्ण होत आहेत. अशा परिस्थितीत, सामरिक भागीदार होण्याच्या रौप्य महोत्सवानिमित्त फ्रान्सने भारताच्या पंतप्रधानांना राष्ट्रीय दिन परेडसाठी आमंत्रित केले आहे.

'या' दौऱ्याचं महत्त्व काय?

पंतप्रधान मोदी यांच्या या दौऱ्यातून भारत आणि फ्रान्स या दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ होतील. दोन्ही देशांमध्ये महत्त्वाचे करार करण्यात येतील. भारत आणि फ्रान्स इंडो-पॅसिफिक भागामध्ये शांतता आणि सुरक्षा ठेवण्याचं काम करतो. यासंबधित बाबींवर चर्चा होईल. सांस्कृतिक, आर्थिक आणि शैक्षणिक धोरणांसंबधी नवे करार करण्यात येतील. पंतप्रधान मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्रापती मॅक्रॉन येत्या काळातील आव्हानांवर चर्चा करतील. यामध्ये हवामान बदल, जैवविविधतेचे नुकसान आणि विकासाचे लक्ष्य या महत्त्वाच्या मुद्द्यावंर चर्चा होईल. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  6:30 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणRaj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणChhagan Bhujbal  : मोदींच्या सभेला राष्ट्रवादीच्या नेत्यांची दांडी? भुजबळांनी सांगितलं कारण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
Embed widget