एससीओ शिखर परिषदेसाठी पंतप्रधान मोदी उझबेकिस्तानमध्ये पोहोचले, 'या' नेत्यांना भेटू शकतात
PM Modi Uzbekistan Visit: एससीओ शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उझबेकिस्तानमध्ये पोहोचले आहेत. समरकंद आंतरराष्ट्रीय विमानतळावर उझबेकिस्तानचे पंतप्रधान अब्दुल्ला अरिपोव्ह आणि इतर अधिकाऱ्यांनी पंतप्रधान मोदींचे स्वागत केले.

PM Modi Uzbekistan Visit: एससीओ शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उझबेकिस्तानमध्ये पोहोचले आहेत. समरकंद आंतरराष्ट्रीय विमानतळावर उझबेकिस्तानचे पंतप्रधान अब्दुल्ला अरिपोव्ह आणि इतर अधिकाऱ्यांनी पंतप्रधान मोदींचे स्वागत केले. यासह एससीओ शिखर परिषदेत सहभागी झालेले सर्व महत्वाचे नेते उझबेकिस्तानला पोहोचले आहेत. एससीओच्या राज्य प्रमुखांच्या परिषदेची बैठक 15 ते 16 सप्टेंबर रोजी समरकंद येथे होणार आहे.
शांघाय शिखर परिषदेत (SCO) सहभागी होण्यासाठी समरकंदला रवाना होण्यापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी गुरुवारी एक निवेदनही जारी केले होते. ज्यामध्ये पंतप्रधान मोदी म्हणाले की, ते सध्याच्या समस्या, विस्तार आणि समूहातील पुढील सहकार्याबाबत विचारांची देवाणघेवाण करण्यास उत्सुक आहेत. पंतप्रधान मोदी शुक्रवारी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग आणि इराणचे नेते इब्राहिम रायसी यांच्यासह इतर नेत्यांसह एससीओच्या वार्षिक शिखर परिषदेला उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान मोदी उझबेकिस्तानचे राष्ट्रपती शवकत मिर्जियोयेव यांचा निमंत्रण स्वीकारून तिथे दौऱ्यावर जात आहेत.
या नेत्यांना भेटू शकता
एससीओचे शिखर परिषदेत पंतप्रधान मोदी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक घेणार आहेत. याशिवाय पंतप्रधान मोदी उझबेकिस्तानचे राष्ट्रपती आणि इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक घेणार आहेत. यातच चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि पाकिस्तानी पंतप्रधानांशी ते भेटणार की नाही याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. शुक्रवारी 16 सप्टेंबर रोजी भारतीय वेळेनुसार सकाळी 10 नंतर एससीओचे सदस्य देशांच्या प्रमुखांची बैठक होणार आहे. पंतप्रधान मोदींचा समरकंद दौरा 24 तासांपेक्षा कमी असेल. पंतप्रधान मोदी उद्या रात्री 10:15 वाजता म्हणजेच 17 सप्टेंबर रोजी त्यांच्या वाढदिवसापूर्वी दिल्लीला परततील.
दरम्यान, रवाना होण्यापूर्वी मोदींनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, "एससीओ समिटमध्ये मी सध्याच्या, प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर विचारांची देवाणघेवाण, एससीओचा विस्तार आणि संघटनेतील बहुआयामी आणि परस्पर फायदेशीर सहकार्य आणखी वाढवण्याची अपेक्षा करतो. यासाठी मी उत्सुक आहे. व्यापार, अर्थव्यवस्था, संस्कृती आणि पर्यटन क्षेत्रात परस्पर सहकार्यासाठी उझबेक राष्ट्राध्यक्षांच्या काळात अनेक निर्णय घेतले जाण्याची अपेक्षा आहे."
इतर महत्वाच्या बातम्या:
SCO Summit 2022 : तीन वर्षांनंतर भारत-पाकिस्तानचे PM एकाच व्यासपीठावर, SCO शिखर परिषदेत काय असेल खास?
Anna bhau Sathe Moscow : अण्णाभाऊ केवळ एक व्यक्ती नव्हे..! मॉस्कोत लोकशाहीरांच्या पुतळ्याच्या अनावरणप्रसंगी फडणवीसांचे वक्तव्य
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
