एक्स्प्लोर

France Flight Indian Passenger : फ्रान्सने 303 भारतीय प्रवासी असलेले विमान केले जप्त; पॅरिस ते दिल्लीपर्यंत खळबळ!

France Flight Indian Passenger : दुबईहून उड्डाण घेतलेले विमान फ्रान्सने ताब्यात घेतले आहे. या विमानात 303 भारतीय प्रवासी आहेत,

Frace Flight :   भारतीय नागरिकांना घेऊन निकाराग्वाला  जाणारे विमान फ्रान्सने रोखले आहे. या विमानात 303 भारतीय नागरिक होते. या विमानाचा मानवी तस्करीसाठी वापर केला जात असल्याचा संशय फ्रेंच यंत्रणांना आहे. एका निनावी सूचनेवरून हे विमान ताब्यात घेण्यात आल्याचे फ्रेंच अधिकाऱ्यांनी सांगितले. प्रजासत्ताक दिनानिमित्त भारताने फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले असताना ही घटना समोर आली आहे. मॅक्रॉन यांनी स्वतः ट्विट करून हे निमंत्रण स्वीकारल्याची माहिती दिली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांनी नकार दिल्यानंतर मॅक्रॉन यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रण पाठवण्यात आले.

फ्रान्सच्या अधिकाऱ्यांनी काय म्हटले?

वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, फ्रान्सच्या अधिकाऱ्यांनी दावा केला आहे की, भारतातून निकाराग्वाला जाणारे विमान मानवी तस्करीसाठी वापरले जाऊ शकते. या विमानाने संयुक्त अरब अमिरातीहून उड्डाण घेतले होते. या प्रवाशांच्या प्रवासाच्या परिस्थिती आणि हेतूंबाबत न्यायालयीन चौकशी सुरू झाल्याची माहिती फ्रेंच अधिकाऱ्यांनी दिली आहे. मानवी तस्करीच्या संशयावरून अधिकारी तपास करत होते. 

विमानाबाबत अधिक माहिती काय?

दुबईहून उड्डाण घेतलेल्या रोमानियन चार्टर कंपनीच्या विमानाचा वापर करण्यात आला. पोलिसांनी मध्यस्थी केल्यावर ते तांत्रिक थांबण्यासाठी छोट्या वॅट्री विमानतळावर उतरवण्यात आले. या ठिकाणी आता प्रवाशांची थांबण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या विमानातील भारतीय नागरिकांना आणखी किती दिवस ठेवण्यात येईल किंवा त्यांना भारतात पाठवण्याची तयारी आहे का, हे फ्रेंच अधिकाऱ्यांनी अद्याप सांगितलेले नाही.

दोन जण ताब्यात 

रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, संघटीत गुन्हेगारी तपासात तज्ज्ञ असलेली एक युनिट मानवी तस्करीच्या संशयावरून तपास करत आहे. तपास यंत्रणांनी चौकशीसाठी दोघांना ताब्यात घेतले आहे. 

निकाराग्वा आणि मानवी तस्करी यांचा काय संबंध आहे?

निकाराग्वा हा मध्य अमेरिकन देश आहे. निकाराग्वाच्या उत्तरेस होंडुरास, पूर्वेस कॅरिबियन, दक्षिणेस कोस्टा रिका आणि पश्चिमेस पॅसिफिक महासागर आहे. बेकायदेशीरपणे अमेरिकेत प्रवेश करणाऱ्यांसाठी हा देश नंदनवन समजला जातो. दरवर्षी हजारो अवैध स्थलांतरित या देशातून अमेरिका-मेक्सिको सीमेवर पोहोचतात. बेकायदेशीर स्थलांतरितांनाही या मार्गावर अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. यात भौगोलिक स्थान आणि चोरी, दरोड्यासारख्या घटनांचा समावेश होतो. निकाराग्वामध्ये या स्थलांतरितांवर विशेष तपास केला जात नाही.

इतर महत्त्वाच्या बातम्या :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विरोधकांकडून प्रचारापासून रोखण्याचा प्रयत्न, जाणीवपूर्वक रॅलीला परवानगी नाकारली जातेय; भर पत्रकार परिषदेत वारिस पठाण ढसाढसा रडले
विरोधकांकडून प्रचारापासून रोखण्याचा प्रयत्न, जाणीवपूर्वक रॅलीला परवानगी नाकारली जातेय; भर पत्रकार परिषदेत वारिस पठाण ढसाढसा रडले
Santaji Ghorpade attack: मोठी बातमी: कोल्हापुरात जनसुराज्यचे उमेदवार संताजी घोरपडेंवर धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला
मोठी बातमी: कोल्हापुरात जनसुराज्यचे उमेदवार संताजी घोरपडेंवर धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला
Horoscope Today 18 November 2024 : आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
Aparshakti Khurana Birthday: 8 व्या वर्षापासून आयुषमानचे पाय धरायचा, वडिलांच्या 'या' नियमाचं काटेकोर पालन करायचा अपारशक्ती
8 व्या वर्षापासून आयुषमानचे पाय धरायचा, वडिलांच्या 'या' नियमाचं काटेकोर पालन करतो अपारशक्ती
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Santaji Ghorpade attack : कोल्हापुरात जनसुराज्यचे उमेदवार संताजी घोरपडेंवर जीवघेणा हल्लाTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :18 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM : 18 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 7 AM : 18 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विरोधकांकडून प्रचारापासून रोखण्याचा प्रयत्न, जाणीवपूर्वक रॅलीला परवानगी नाकारली जातेय; भर पत्रकार परिषदेत वारिस पठाण ढसाढसा रडले
विरोधकांकडून प्रचारापासून रोखण्याचा प्रयत्न, जाणीवपूर्वक रॅलीला परवानगी नाकारली जातेय; भर पत्रकार परिषदेत वारिस पठाण ढसाढसा रडले
Santaji Ghorpade attack: मोठी बातमी: कोल्हापुरात जनसुराज्यचे उमेदवार संताजी घोरपडेंवर धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला
मोठी बातमी: कोल्हापुरात जनसुराज्यचे उमेदवार संताजी घोरपडेंवर धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला
Horoscope Today 18 November 2024 : आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
Aparshakti Khurana Birthday: 8 व्या वर्षापासून आयुषमानचे पाय धरायचा, वडिलांच्या 'या' नियमाचं काटेकोर पालन करायचा अपारशक्ती
8 व्या वर्षापासून आयुषमानचे पाय धरायचा, वडिलांच्या 'या' नियमाचं काटेकोर पालन करतो अपारशक्ती
Uddhav Thackeray : मुंबई तोडता येत नाही म्हणून मोदींच्या मित्राकडून ओरबाडणं सुरू; उद्धव ठाकरेंचा भाजपवर वार
मुंबई तोडता येत नाही म्हणून मोदींच्या मित्राकडून ओरबाडणं सुरू; उद्धव ठाकरेंचा भाजपवर वार
Bandra East Assembly Election 2024 : वांद्रे पूर्वमध्ये पुन्हा तिंरगी लढत, झिशान सिद्दिकींना वरुण सरदेसाईंचं आव्हान, तृप्ती सावंत मनसेकडून रिंगणात
वांद्रे पूर्वमध्ये पुन्हा तिंरगी लढत, झिशान सिद्दिकींना वरुण सरदेसाईंचं आव्हान,तृप्ती सावंत मनसेकडून रिंगणात
Priyanka Gandhi : भाजप कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या शुभेच्छा पण जिंकणार महाविकास आघाडीच, महाराष्ट्र की जय : प्रियांका गांधी
भाजप कार्यकर्त्यांनी पक्षाचे झेंडे दाखवले, प्रियांका गांधी नमस्कार करत म्हणाल्या महाविकास आघाडीच जिंकणार
Ashok Chavan : पैशाच्या जोरावर निवडणूक लढवत नाही, रेवंत रेड्डींकडून पक्षनिष्ठेचे धडे मला घेण्याची गरज नाही, अशोक चव्हाण यांचा पलटवार
पैशाच्या जोरावर निवडणूक लढवत नाही, तेलंगणाचा पैसा महाराष्ट्रात आलाय, अशोक चव्हाण यांचा रेवंत रेड्डींवर पलटवार
Embed widget