एक्स्प्लोर

Indians In US h1b Visa Pilot Program: अमेरिकेचा H-1B व्हिसाबाबत मोठा निर्णय; भारतीयांना सर्वाधिक फायदा

H-1B व्हिसा हा नॉन-इमिग्रंट व्हिसा आहे. हे अमेरिकन कंपन्यांना परदेशी कामगार ठेवण्याची परवानगी देते. जेव्हा एखादी व्यक्ती अमेरिकन कंपनीत काम करते तेव्हा त्याला H-1B व्हिसा दिला जातो.

Indians In US h1b Visa Pilot Program: अमेरिकेच्या (America) बायडन सरकारनं (Joe Biden Govt) एक मोठा निर्णय घेतला आहे, ज्याचा भारतीयांना (India) मोठा फायदा होणार आहे. अमेरिकन सरकारनं H-1B व्हिसाच्या देशांतर्गत नूतनीकरणासाठी पायलट कार्यक्रम सुरू केला आहे. 24 जानेवारीपासून हा उपक्रम सुरू होणार आहे. हा H-1B व्हिसा पायलट प्रोग्राम फक्त भारतीय आणि कॅनेडियन नागरिकांसाठी आहे. या अंतर्गत अमेरिकेत काम करणाऱ्या भारतीय आयटी प्रोफेशनल्स आणि कॅनडाच्या नागरिकांना फायदा होणार आहे. हा कार्यक्रम अशा कंपन्यांसाठी देखील आहे, ज्यांचे H-1B कर्मचारी कामासाठी परदेशात जाऊ इच्छितात.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या दौऱ्यानंतर अनेक महिन्यांनी अमेरिकेनं हा निर्णय घेतला आहे. जूनमध्ये, जेव्हा पंतप्रधान मोदी अमेरिकेच्या राज्य दौऱ्यावर गेले होते, तेव्हा H-1B व्हिसाच्या नूतनीकरणाची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी काम सुरू होतं. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याच्या वेळी या कार्यक्रमाची औपचारिक घोषणा करण्यात आली.

व्हिसाचं नूतनीकरण कसं केलं जातं?

H-1B व्हिसा हा नॉन-इमिग्रंट व्हिसा आहे. हे अमेरिकन कंपन्यांना परदेशी कामगार ठेवण्याची परवानगी देतं. जेव्हा एखादी व्यक्ती अमेरिकन कंपनीत काम करते, तेव्हा त्या व्यक्तीला H-1B व्हिसा दिला जातो. आत्तापर्यंत असं होतं की, एखाद्या व्यक्तीचा H-1B व्हिसाची मुदत संपली असेल, तर त्याचं नूतनीकरण करून घेण्यासाठी त्याला पुन्हा त्याच्या देशात परतावं लागत होतं. मात्र, आता नूतनीकरण प्रक्रियेसाठी घरी यावं लागणार नाही.

आता तुम्ही अमेरिकेत असताना तुमचा व्हिसा मेल करू शकता आणि त्यानंतर त्याचं नूतनीकरण केलं जाईल. नूतनीकरण प्रक्रियेदरम्यान व्यक्तीला यूएस बाहेर राहण्याची आवश्यकता नाही. व्हिसाच्या नूतनीकरणाची ही प्रक्रिया केवळ वर्क व्हिसासाठी असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. इतर प्रकारच्या व्हिसाच्या प्रक्रियेत कोणताही बदल नाही.

भारतीयांना काय होणार फायदा?

भारतीय-अमेरिकन समुदायाचे नेते अजय जैन भुटोरिया यांनी बायडन सरकारच्या या निर्णयाचं वर्णन 'महत्त्वाचं' असं केलं आहे. H-1B व्हिसाच्या नूतनीकरणाची प्रक्रिया सोपी केल्यानं सुमारे 10 लाख लोकांना फायदा होईल आणि त्यात मोठी संख्या भारतीयांची असेल. लाखो भारतीय अमेरिकेत काम करत आहेत. 2022 मध्ये, यूएस सरकारनं 4.42 लाख लोकांना H-1B जारी केला होता. त्यापैकी 73 टक्के भारतीय होते. 

H1B व्हिसा म्हणजे काय?

H-1B व्हिसा हा नॉन-इमिग्रंट व्हिसा आहे. H1B व्हिसा सामान्यतः अमेरिकेत कामासाठी जाणाऱ्या लोकांना दिला जातो. सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर, हा व्हिसा अमेरिकन कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या अशा कुशल कर्मचाऱ्यांना कामावर घेण्यासाठी दिला जातो, ज्यांची अमेरिकेत कमतरता आहे. यानंतर त्याला ग्रीन कार्ड दिलं जातं. या व्हिसाची वैधता सहा वर्षांची आहे. अमेरिकन कंपन्यांच्या मागणीमुळे भारतीय आयटी व्यावसायिकांना हा व्हिसा सर्वाधिक मिळतो. ज्या लोकांचा H-1B व्हिसाची मुदत संपत आहे ते अमेरिकन नागरिकत्वासाठी अर्ज करू शकतात. H-1B व्हिसा धारण करणारी व्यक्ती आपल्या मुलांसह आणि पत्नीसह अमेरिकेत राहू शकते.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
Embed widget