Pfizer Corona Vaccine: आनंदाची बातमी... ब्रिटनमध्ये कोरोना लसीकरण सुरु, 90 वर्षीय महिलेला दिला पहिला डोस
Pfizer Corona Vaccine: ब्रिटनने Pfizer-BioNTech लसीला वापराला मंजुरी दिल्यानंतर आजपासून लसीकरण सुरु झालं आहे. लसीकरणाची सुरुवात उत्तर आयरलॅंडमधील एका 90 वर्षीय महिलेला डोस देऊन करण्यात आली आहे.
Pfizer Corona Vaccine: जगभरात कोरोना व्हायरसचा कहर सुरुच आहेत. अशात एक दिलासादायक बातमी आहे. ब्रिटनने Pfizer-BioNTech लसीला वापराला मंजुरी दिल्यानंतर आजपासून लसीकरण सुरु झालं आहे. लसीकरणाची सुरुवात उत्तर आयरलॅंडमधील एका 90 वर्षीय महिलेला लस देऊन करण्यात आली आहे. ही महिला फायझर/बायोएनटेक कोविड लस घेणारी जगातली पहिली महिला ठरली आहे. मार्गरेट कीनन असं त्या महिलेचं नाव आहे.
उत्तर आयरलॅंडमधील निस्किलीनमधील मार्गरेट कीनन यांनी सांगितलं की, त्यांना कॉवेंट्री यूनिव्हर्सिटीच्या दवाखान्यात लस घेतली. माहितीनुसार यूकेमध्ये 80 वर्षापेक्षा अधिक वयाच्या नागरिकांसह आरोग्य कर्मचारी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांचं लसीकरण होणार आहे. पहिली कोरोना लस घेतल्यानंतर कीनन यांनी म्हटलं आहे की, कोरोनावरील लस घेणारी जगातील पहिली व्यक्ती ठरल्यानं मला चांगलं वाटलं. हा माझ्यासाठी सर्वात सुंदर जन्मदिवसच आहे. आता मी नवीन वर्षात आपल्या परिवार आणि मित्रांसोबत वेळ घालवण्यासाठी तयार आहे. मी त्या कर्मचाऱ्यांचं आभार मानते ज्यांनी माझी काळजी घेतली.
कुणाकुणाला दिली जाणार लस
ब्रिटन कोरोना व्हायरसवरील लस बनवून त्याची मंजूरी मिळाल्यानंतर लस देणारा पहिला देश ठरला आहे. आधी ब्रिटनमध्ये केअर होम्समध्ये राहणारे लोक आणि कर्मचाऱ्यांना लसीकरण केलं जाणर आहे. त्यानंतर 80 वर्षाच्या वरील बुजुर्ग आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना ही लस दिली जाणार आहे. त्यानंकर 75 वर्षाच्या वरील बुजुर्गांना नंतर 70 त्यानंतर 65 वर्षाच्या वरील लोकांना लस दिली जाईल. त्यानंतर शेवटी 18 ते 65 वर्षांमधील जे अतिजोखमीचे रुग्ण आहेत, त्यांना ही लस दिली जाणार आहे.
लस 95 टक्के प्रभावी ब्रिटनने Pfizer-BioNTech लसीच्या वापराला मंजुरी देऊन त्यात बाजी मारली आहे. ही लस आता सर्वसामान्यांना मिळणार आहे. ब्रिटनमध्ये मंजुरी मिळालेली लस ही 95 टक्के प्रभावी असल्याचं सांगितलं जातंय. या लसीचा वापर सर्वप्रथम उच्च प्राथमिकता असलेल्या लोकांवर आणि रुग्णांवर केला जाणार असल्याचं ब्रिटनच्या प्रशासनानं स्पष्ट केलं आहे. ब्रिटनने आपल्या 2 कोटी लोकसंख्येसाठी प्रत्येकी दोन डोस असे 4 कोटी डोसची ऑर्डर केली आहे. यातील 1 कोटी डोस येत्या काहीच दिवसात येणार आहेत आणि बाकीचे डोस त्यानंतर येतील अशी माहिती ब्रिटनच्या प्रशासनानं दिली आहे.
लोकांनी काळजी घेणं आवश्यक ब्रिटनमध्ये या लसीचा सर्वसामान्यांवर वापर करण्यात येणार असला तरी लोकांनी मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंग आणि सॅनिटायझरचा वापर करणे या नियमांच पालन यापुढेही करणं आवश्यक असल्याचं मत अभ्यासकांनी व्यक्त केलंय. Pfizer-BioNTech या लसीची साठवणूक -70C या तापमानात करावी लागणार आहे. ब्रिटनने वेगवेगळ्या कोरोना लस निर्मीती कंपन्यांना याआधीच 10 कोटी डोसची ऑर्डर केली आहे.
महत्वाच्या बातम्या: