एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Corona Vaccine | संपूर्ण देशात लसीकरण करु असं म्हटलं नव्हतं : सरकार

"संपूर्ण देशभरात लसीकरण करण्यात येईल असं म्हटलं नव्हतं," असं स्पष्टीकरण केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी दिलं आहे. तसंच "साखळी तुटल्यास प्रत्येकाला कोरोनाची लस देण्याची गरज नाही," असं आयसीएमआरने सांगितलं आहे.

नवी दिल्ली : "संपूर्ण देशभरात लसीकरण करण्यात येईल असं म्हटलं नव्हतं," असं स्पष्टीकरण  केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी दिलं आहे. तसंच "साखळी तुटल्यास प्रत्येकाला कोरोनाची लस देण्याची गरज नाही," असं आयसीएमआरने सांगितलं आहे. "कोरोना लस किती लोकांना दिली जाईल हे उत्पादनावरुन निश्चित केलं जाईल. जर आपण कोरोनाची साखळी तोडली तर देशभरात लसीकरण करण्याची गरज भासणार नाही," असं आयसीएमआरचे महासंचालक डॉ. बलराम भार्गव यांनी सांगितलं.

बलराम भार्गव म्हणाले की, "संपूर्ण देशात लसीकरण केलं जाईल असं सरकारने कधीच म्हटल नव्हतं हे मला स्पष्ट करायचं आहे. कोविड-19 ची साखळी तोडणं हा आमचा उद्देश आहे. जर धोका असलेल्या लोकांना लस देण्यात आम्हाला यश आलं आणि कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यास यशस्वी झालो तर संपूर्ण देशभरात लसीकरण करण्याची आवश्यकता नाही.

आरोग्य सचिव यांनी सांगितलं की, "देशात 11 नोव्हेंबर रोजी संसर्गाचा दर 7.15 टक्के होता आणि 1 डिसेंबर रोजी यामध्ये घट होऊन 6.69 टक्के झाला. ही देशासाठी दिलासादायक बाब आहे. मागील आठवड्यात सरासरी दैंनदिन संसर्गाचा दर 3.72 टक्के होता."

सरकारने ऑक्सफर्ड लसीच्या चाचणीत सहभागी झालेल्या तामिळनाडूच्या एका स्वयंसेवकाच्या आरोपानंतर लसीच्या टाईमलाईनवर परिणाम होण्याची शक्यता फेटाळली आहे. "स्वयंसेवकाच्या आरोपांनतर लसीच्या टाईमलाईनवर परिणाम होणार नाही. जेव्हा क्लिनिकल ट्रायल सुरु होते त्यावेळी यात सहभागी होणारे स्वयंसेवक आधीच सहमती पत्रावर स्वाक्षरी करतात. संपूर्ण जगात हेच होतं. चाचणीदरम्यान काही दुष्परिणामही होऊ शकतात असं फॉर्ममध्येच नमूद केलेलं असतं. स्वयंसेवकांना याची कल्पना असते," असंही आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी स्पष्ट केलं.

राजेश भूषण पुढे म्हणाले की, "डेटा सेफ्टी मॉनिटरिंग बोर्डही नियमित आधारावर क्लिनिकल ट्रायलची देखरेख करत आहेत आणि कोणत्याही प्रकारचे दुष्परिणाम आढळले तर ते नमूद केले जातात. ड्रग कंट्रोलर जनरल सर्व अहवालांचं विश्लेषण करतात आणि जे दुष्परिणाम आढळले ते खरंच कोरोना लसीमुळे आहेत की नाही हे शोधतात.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde : एक रुपयात पीक विमा, महिलांना एसटी प्रवास शुल्कात सवलत ते लाडकी बहीण योजना, एकनाथ शिंदेंचे प्रमुख निर्णय एका क्लिकवर
एक रुपयात पीक विमा ते आनंदाचा शिधा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचे प्रमुख लोकप्रिय निर्णय
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
Raigad : शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Uddhav Thackeray : ठाकरे एकत्र आले तर मुंबईकर त्यांना मत देईल?Rajkiya Shole: भाजपचा शिंदेंसाठी निरोप, आठवलेंची दवंडी!Eknath Shinde Devendra Fadnavis: शिंदेंना चिंता,फडणवीसांचा विरोध; नेत्यांची बॉडी लँग्वेज काय सांगते?Rajkiiya Shole : देवेंद्र फडवीसचं मुख्यमंत्री, भाजपचा एकनाथ शिंदेंना निरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde : एक रुपयात पीक विमा, महिलांना एसटी प्रवास शुल्कात सवलत ते लाडकी बहीण योजना, एकनाथ शिंदेंचे प्रमुख निर्णय एका क्लिकवर
एक रुपयात पीक विमा ते आनंदाचा शिधा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचे प्रमुख लोकप्रिय निर्णय
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
Raigad : शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
Rishabh Pant : लखनौनं रिषभ पंतसाठी 27 कोटी रुपये मोजले, सरकारला करापोटी कोट्यवधी रुपये द्यावे लागणार,रिषभच्या खात्यात किती कोटी राहणार?
लखनौनं रिषभ पंतसाठी 27 कोटी रुपये मोजले, कोट्यवधी रुपये करापोटी द्यावे लागणार, हातात किती येणार?
आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला
आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला
Manda Mhatre : गणेश नाईकांना जे जमलं नाही ते मंदा म्हात्रेंनी करून दाखवलं, बेलापुरात विजयाची हॅट्रिक करत रचला विक्रम
गणेश नाईकांना जे जमलं नाही ते मंदा म्हात्रेंनी करून दाखवलं, बेलापुरात विजयाची हॅट्रिक करत रचला विक्रम
Cidco Lottery 2024 : सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर”महागृहनिर्माण योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 11 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर” योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 92 हजार अर्ज दाखल
Embed widget