एक्स्प्लोर
Advertisement
सात वर्षांच्या मुलीसह 9 जणींवर बलात्कार, पाकिस्तानातील नराधमाला फाशी
लाहोरच्या कोट लखपत जेलमध्ये आज (17 ऑक्टोबर) पहाटे 5.30 वाजता इमरान अलीला फाशी देण्यात आली.
लाहोर : संपूर्ण जगाला हादरवणाऱ्या पाकिस्तानातील अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणात अखेर दोषीला शिक्षा मिळाली आहे. सात वर्षांच्या मुलीवर बलात्कार करुन तिची हत्या करणाऱ्या इमरान अलीला (वय 24 वर्ष) फाशी देण्यात आली. पाकिस्तानने अवघ्या 9 महिन्यात दोषीला फासावर लटकवलं. लाहोरच्या कोट लखपत जेलमध्ये आज (17 ऑक्टोबर) पहाटे 5.30 वाजता इमरान अलीला फाशी देण्यात आली.
दोषी इमरान अलीला सार्वजनिक ठिकाणी फाशी द्यावी, अशी मागणी करणारी याचिका तिच्या वडिलांनी केली होती. परंतु लाहोर उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सरदार शमीम अहमद आणि न्यायमूर्ती शाहबाज रिझवी यांच्या दोन सदस्यीय खंडपीठाने मंगळवारी ही याचिका फेटाळली
फाशी देताना न्यायदंडाधिकारी आदिल सरवार यांच्यासह मुलीचे वडीलही तिथे उपस्थित होते. क्रूरकृत्यामुळे इमरान अलीला मिळालेली शिक्षा पाहण्यासाठी त्याच्या कुटुंबातील काही जणांना बोलवलं होतं. फाशीच्या आधी प्रशासनाने अलीला 45 मिनिटांचा वेळ दिला होता, ज्यात तो कुटुंबाला भेटला आणि त्यांच्याशी बोलला.
फाशी दिल्यानंतर मुलीचे वडील अमीन अन्सारी यांनी समाधान व्यक्त केलं आहेत. मी माझ्या डोळ्यांची त्यांचा अंत होताना पाहिलं. त्याला फाशी दिली आणि अर्धा तास त्याचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत होता, असं अमीन अन्सारी म्हणाले.
काय होतं प्रकरण?
क्रूरकर्मा इमरान अलीने एक नाही तर नऊ मुलींना आपलं सावज बनवल्याची कबुली दिली होती. यामध्ये सात वर्षांच्या मुलीचाही समावेश होता.
कसूरमध्ये 5 जानेवारी रोजी पीडित मुलगी ट्यूशनवरुन आपल्या घरी परतत असताना बेपत्ता झाली होती. यावेळी तिचे आई-वडील उमरासाठी सौदी अरेबियाला गेले होते आणि ती एका नातेवाईकासोबत राहत होती.
अपहरणानंतर सीसीसीटीव्ही फुटेजमध्ये ती पीरोवाला रोडजवळ एका अज्ञातासोबत जाताना दिसली होती. यानंतर 9 जानेवारी रोजी शाहबाज खान रोडजवळ कचऱ्यात तिचा मृतदेह आढळला होता.
शवविच्छेदन अहवालात तिच्यावर बलात्कार झाल्याचं नमूद केलं होतं. सर्वोच्च न्यायालयाने दोषीला पकडण्यासाठी पोलिस महानिरीक्षकांना 72 तासांची मुदत दिली होती. या घटनेनंतर देशात मोठ्या प्रमाणात विरोध झाला, आंदोलनं झाली होती. पोलिसांनी या घटनेनंतर 1150 पुरुषांची डीएनए चाचणी केली होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
Advertisement