(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pakistan : इम्रान खान यांच्यावर देशद्रोहाची कारवाई? काय आहे प्रकरण? वाचा सविस्तर
Pakistan News : पाकिस्तान सरकार माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांच्यावर लवकरच देशद्रोहाची कारवाई करण्याची शक्यता आहे.
Imran Khan Sedition Proceedings : पाकिस्तानचे (Pakistan) माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. पाकिस्तान सरकार आता इम्रान खान यांच्यावर देशद्रोहाची कारवाई (Treason Charges) करण्याची शक्यता आहे. इम्रान खान पीटीआय (PTI) अर्थात पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफ (Pakistan Tehreek-e-Insaf) पक्षाचे प्रमुख आहेत. त्यांच्याविरोधात आता देशद्रोहाचा खटला चालवण्याची तयारी पाकिस्तान सरकारकडून सुरु आहे. यासाठी सरकारने एक समितीही स्थापन केली आहे.
पाकिस्तान सरकारने शुक्रवारी एका समितीची स्थापना केली आहे. ही समिती इम्रान खान यांच्याविरोधात देशद्रोहाच्या कार्रवाईसंदर्भातील निर्णय घेईल. मंत्री मरियम औरंगजेब यांनी माध्यमांना माहिती देत सांगितलं आहे की, मंत्रिमंडळाने इम्रान खान यांच्याविरोधात देशद्रोहाच्या कारवाईसाठी एक समिती स्थापन केली आहे. ही समिती पीटीआय देशद्रोहाच्या गुन्ह्यात दोषी आहे की नाही यासंदर्भात निर्णय घेईल.
कलम 6 अंतर्गत दोषी ठरल्यास, इम्रान खान यांच्यावर कारवाई
पाकिस्तानी संविधानानुसार, कलम 6 अंतर्गत जर कोणत्याही व्यक्तीने राज्यघटना किंवा संविधान मोडलं, बळजबरीने किंवा इतर कोणत्याही मार्गाने राज्यघटना मोडण्याचं षडयंत्र केलं, तर अशी व्यक्ती देशद्रोही असून त्या व्यक्तीला फाशीची शिक्षा होते.
माहिती मंत्री मरियम औरंगजेब यांनी सांगितले की, ही समिती कायदा मंत्री आझम नजीर तरार यांच्या नेतृत्वाखाली काम करेल आणि पुढील मंत्रिमंडळ बैठकीत आपल्या सूचना मांडेल. मागील सरकारने असंवैधानिक आदेश दिले होते असं सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने सिद्ध झालं आहे.
कायदामंत्र्यांच्या नेतृत्वाखाली ही समिती काम करेल
तत्कालीन पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरुद्ध अविश्वास ठरावाचा वादग्रस्त निर्णय न्यायालयाने का फेटाळला यावर सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट करणारा सविस्तर निकाल दिल्यानंतर सरकारनं ही पाऊलं उचलली आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या