एक्स्प्लोर

Pakistan: अंधार आणि नुसताच अंधार... पाकिस्तानातील लाहोर, कराचीसह महत्त्वाची शहरं अंधारात, पाकिस्तानचं भविष्यही अंधकारमय

Pakistan Black Out: पाकिस्तानच्या ट्रान्समिशन लाईन्समध्ये बिघाड झाल्यामुळे कराची, लाहोर, इस्लामाबाद, क्वेटा आणि इतर शहरांमध्ये अंधार परसला होता.

कराची: पाकिस्तानची आर्थिक स्थिती एवढी डबघाईला आली आहे की त्या देशाकडे आता वीज केंद्र चालवण्यासाठीही पैसा उरला नाही. परिणामी पाकिस्तानच्या महत्त्वाच्या शहरांमध्ये वीज संकटामुळे अंधार पसरला आहे. आधीच राजकीय आणि आर्थिक संकटांशी झगडत असलेला, आर्थिक दिवाळखोरीत गेलेल्या पाकिस्तानमध्ये सोमवारी ट्रान्समिशन लाईन्समध्ये बिघाड झाल्यामुळे अनेक शहरांमध्ये वीज खंडित झाला. कराची, लाहोर, इस्लामाबाद, क्वेटा आणि पाकिस्तानातील इतर प्रमुख शहरी केंद्रे वीजेविना अंधारात गेली होती. ऊर्जा संकटाचा सामना करणाऱ्या या शेजारील देशात गेल्या चार महिन्यांत ही वीज खंडित होणारी दुसरी मोठी घटना घडली आहे.

पाकिस्तानच्या ऊर्जा मंत्रालयाने आज सकाळी ट्वीट केलं. त्यामध्ये म्हटलं होतं की नॅशनल पॉवर ग्रिडमध्ये व्यापक बिघाड झाला आहे. परंतु देखभालीचे काम वेगाने सुरू आहे. नॅशनल ग्रीडची फ्रिक्वेन्सी सिस्टम आज सकाळी 7:34 वाजता खालावली गेली आणि परिणामी या प्रणालीमध्ये मोठ्या प्रमाणात बिघाड झाला.

पेशावर आणि इस्लामाबादमधील ग्रीड स्टेशनमध्ये तपासणी सुरू असून वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले जात आहेत असं पाकिस्तानच्या उर्जामंत्र्यांनी स्पष्ट केलं. येत्या 12 तासांमध्ये देशातील वीज पुरवठा सुरळीत केला जाईल असं आश्वासनही त्यांनी दिलं आहे. 

देशातील मोठ्या भागातील वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे या देशातील नागरिकांमध्ये मात्र नाराजी पसरली आहे. पाकिस्तामधील या संकटामुळे सोशल मीडियावर #PowerOutrage हे हॅशटॅग ट्रेन्ड होतंय. पाकिस्तानच्या या परिस्थितीवर मोठ्या प्रमाणात मीम्स तयार केले जात आहेत आणि ते व्हायरल केले जात आहेत. 

एका ट्विटर यूजरने ट्वीट केले की, "भावनिक ब्रेक डाउन, मानसिक ब्रेक डाउन, फिजिकल ब्रेक डाउन के बाद पेश-ए-खिदमत हा पॉवर ब्रेकडाउन." दुसर्‍याने लिहिले, "उर्वरित जगामध्ये मध्यरात्र असल्यामुळे वीज गायब झाली आहे. पाकिस्तानमध्ये वीज खंडित झाली आहे, चला झोपायला जाऊया.

पाकिस्तानची आर्थिक स्थिती डबघाईला 

कर्जाच्या फेऱ्यात अडकलेल्या पाकिस्तानात दिवसेंदिवस गरिबी वाढू लागल्याचं चित्र आहे. पाकिस्तानातल्या अन्न उत्पादनावर मोठा परिणाम झाला असून उपासमारीचं संकटाची चिन्हं दिसू लागली आहेत. देशातल्या बहुसंख्या नागरिकांना एकवेळचं जेवण मिळणंही अवघड झालंय. देशातला इंधन साठाही संपण्याची भीती आहे. दुसरीकडे शेअर बाजारातही गोंधळ पहायला मिळतोय.

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Crime : 30 कोटींचा सीएसआर फंड देतो म्हणून संस्थाचालकांची पावणे दोन कोटींची फसवणूक, अध्यक्षा रजनी देशपांडे यांना अटक
30 कोटींचा सीएसआर फंड देतो म्हणून संस्थाचालकांची पावणे दोन कोटींची फसवणूक, अध्यक्षा रजनी देशपांडे यांना अटक
ट्रकचालकाने 3 वाहनांना उडवले, 1 ठार 3 जखमी, संतप्त जमावाने ट्रकच जाळला; शिर्डीजवळही कारचा चेंदामेंदा
ट्रकचालकाने 3 वाहनांना उडवले, 1 ठार 3 जखमी, संतप्त जमावाने ट्रकच जाळला; शिर्डीजवळही कारचा चेंदामेंदा
धनंजय मुंडेंच्या आईंबाबत आक्षेपार्ह टिपण्णी; चुलत भावाने गाठलं बीड पोलीस ठाणे, पुरावे देत तक्रार दाखल
धनंजय मुंडेंच्या आईंबाबत आक्षेपार्ह टिपण्णी; चुलत भावाने गाठलं बीड पोलीस ठाणे, पुरावे देत तक्रार दाखल
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chandrashekhar Bawankule : एप्रिल, मेमध्ये महापालिका निवडणूक होण्याची शक्यता : बावनकुळेDevendra Fadnavis And Ajit Pawar  : देवेंद्र फडणवीस जो निर्णय घेतील तो मान्य : अजित पवारSuresh Dhas On Dhananjay Munde :धनंजय मुंडे कृषी मंत्री असतानाच्या निर्णयाची धस यांनी मागितली माहितीChandrashekhar Bawankule PC | योजना बंद ते लाडक्या बहि‍णींचं बजेट, बावनकुळेंची पत्रकार परिषद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Crime : 30 कोटींचा सीएसआर फंड देतो म्हणून संस्थाचालकांची पावणे दोन कोटींची फसवणूक, अध्यक्षा रजनी देशपांडे यांना अटक
30 कोटींचा सीएसआर फंड देतो म्हणून संस्थाचालकांची पावणे दोन कोटींची फसवणूक, अध्यक्षा रजनी देशपांडे यांना अटक
ट्रकचालकाने 3 वाहनांना उडवले, 1 ठार 3 जखमी, संतप्त जमावाने ट्रकच जाळला; शिर्डीजवळही कारचा चेंदामेंदा
ट्रकचालकाने 3 वाहनांना उडवले, 1 ठार 3 जखमी, संतप्त जमावाने ट्रकच जाळला; शिर्डीजवळही कारचा चेंदामेंदा
धनंजय मुंडेंच्या आईंबाबत आक्षेपार्ह टिपण्णी; चुलत भावाने गाठलं बीड पोलीस ठाणे, पुरावे देत तक्रार दाखल
धनंजय मुंडेंच्या आईंबाबत आक्षेपार्ह टिपण्णी; चुलत भावाने गाठलं बीड पोलीस ठाणे, पुरावे देत तक्रार दाखल
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
सकाळी पत्रकार परिषद अन् संध्याकाळी बदललं स्टेटस; भास्कर जाधवांच्या मनातील 'म्होरक्या' कोण, शिंदे की ठाकरे?
सकाळी पत्रकार परिषद अन् संध्याकाळी बदललं स्टेटस; भास्कर जाधवांच्या मनातील 'म्होरक्या' कोण, शिंदे की ठाकरे?
Mahakumbh 2025 : राहुल गांधी आणि प्रियांका कुंभमेळ्यात जाणार की नाहीत? काँग्रेसकडून पहिल्यांदाच खुलासा!
राहुल गांधी आणि प्रियांका कुंभमेळ्यात जाणार की नाहीत? काँग्रेसकडून पहिल्यांदाच खुलासा!
IPL Shedule 2025 : आयपीएल हंगामात कोण, कधी, कोणाशी भिडणार; मुंबईचे 14 सामने देशभरातली 13 मैदानं
IPL Shedule 2025 : आयपीएल हंगामात कोण, कधी, कोणाशी भिडणार; मुंबईचे 14 सामने देशभरातली 13 मैदानं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 फेब्रुवारी 2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 फेब्रुवारी 2025 | रविवार
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.