एक्स्प्लोर
Advertisement
पाकिस्तानचा युद्धसराव, लाहोर, कराची एअरस्पेस 13 दिवसांसाठी बंद
इस्लामाबाद : पाकिस्तान 8 ऑक्टोबरपासून लाहोर आणि कराची शहरांवरील एअरस्पेस बंद करणार आहे. या दोन्ही शहरांवरील एअरस्पेस 13 दिवसांसाठी बंद ठेवले जाणार आहे. 'ऑपरेशनल' कारणांमुळे एअरस्पेस बंद करत असल्याचं कारण पाकिस्तानने दिलं आहे.
लाहोर, कराचीवरील एअरस्पेस 13 दिवसांसाठी रोज 18 तास बंद राहणार आहे. संरक्षण आणि हवाई वाहतूक तज्ज्ञांच्या मते, पाकिस्तानने हवाईदलाच्या माध्यमातून युद्ध सरावासाठी कमर्शियल उड्डाण क्षेत्र रिकामं केलं आहे. पाकिस्तान 8 ऑक्टोबर ते 22 ऑक्टोबरपर्यंत लाहोर, कराचीवरील एअरस्पेस बंद ठेवणार आहे.
तज्ज्ञांच्या मते, अनेक देश अशाप्रकारे युद्ध सराव करत असतात. मात्र, अत्यंत व्यस्त एअरस्पेस इतक्या दिवसांसाठी बंद केलं गेलंय, हे विशेष आहे. भारतीय अधिकाऱ्यांची नजरही पाकिस्तानच्या या सर्व हालचालींवर आहे. कारण एअरस्पेस बंद करणं, युद्ध सराव सुरु करणं या सर्व गोष्टी अशा वेळी होत आहेत, ज्यावेळी भारत-पाकिस्तान या दोन्ही देशांमधील संबंध अत्यंत तणावाचे आहेत.
भारताह आशियाहून युरोप आणि मध्यपूर्व भागासाठी एअर ट्रॅफिक कॉरिडोअरमध्ये पाकिस्तान येतं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement