एक्स्प्लोर

फ्रान्सचा मालीत एयरस्ट्राईक, अल-कायद्याच्या 50 पेक्षा जास्त दहशतवाद्यांचा खात्मा

फ्रान्सच्या हवाई दलाने सोमवारी मालीत केलेल्या एयरस्ट्राईकमध्ये 50 पेक्षा जास्त दहशतवाद्यांचा मृत्यू झाल्याची माहिती फ्रान्सच्या सरकारने दिली आहे. हे दहशतवादी एका मोठ्या हल्ल्याची तयारी करत असल्याची बातमी होती.

बामको: फ्रान्सने मालीमध्ये केलेल्या एका हवाई हल्ल्यात अल-कायदा या या दहशतवादी संघटनेच्या 50 पेक्षा जास्त दहशतवाद्यांचा मृत्यू झाल्याची बातमी फ्रान्स सरकारने दिली आहे. हा हल्ला शुक्रवारी आफ्रिकेतील बुर्किना फासो आणि नायजेरच्या सीमेवर करण्यात आल्याचे समजते.

मालीच्या या भागात इस्लामी दहशतवादी गटांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे फ्रान्सच्या हवाई दलाने मिराज फायटर जेट आणि ड्रोन्सच्या मदतीने हा हल्ला केला अशी माहिती फ्रान्सचे संरक्षणमंत्री फ्लोरेंस पार्ले यांनी सोमवारी दिली.

या ठिकाणी असणाऱ्या तीन देशांच्या सीमेवर अल-कायदा या दहशतवादी गटांतील दहशतवाद्यांचा मोठ्या प्रमाणात वावर असतो. या देशांच्या सीमेत येण्याजाण्यासाठी दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणावर मोटार सायकलचा वापर केला जातो. त्यावर फ्रान्सने ड्रोनच्या सहाय्याने नजर ठेवली होती. त्यानंतर मिराज फायटर जेटच्या सहाय्याने या दहशतवाद्यांवर हल्ला करण्यात आल्याचे फ्लोरेंस पार्ले यांनी सांगितले.

फ्रान्सच्या लष्कराच्या प्रवक्त्याने सांगितले की, या कारवाईदरम्यान चार दहशतवाद्यांना पकडण्यात आले आहे. तसेच या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात विस्फोटक साहित्य जप्त करण्यात आले आहे. हे दहशतवादी कोणत्यातरी मोठ्या हल्ल्याची तयारी करत होते अशी माहिती फ्रान्सच्या जिहादी विरोधी पथकाला मिळाली होती. या दरम्यान 30 मोटार सायकली नष्ट करण्यात आल्याचेही प्रवक्त्यांनी सांगितले.

गेल्या महिन्यात घडलेल्या दोन दहशतवादी घटनांनी फ्रान्स हादरुन गेले होते. मोहम्मद पैगंबर यांच्या व्यंगचित्राच्या प्रकरणावरुन फ्रान्समध्ये 16 ऑक्टोबर रोजी मिडल स्कूलच्या शिक्षकाला रशियातील चेचन्या वंशाच्या एका 18 वर्षीय मुस्लिम युवकाने ठार मारले होते. त्यानंतर 29 ऑक्टोबर रोजी पुन्हा अशाच प्रकारच्य़ा एका हल्ल्यात ट्युनिशियाच्या 21 वर्षीय युवकाने नीस शहरातील एका चर्चच्या बाहेर तीन लोकांची हत्या केली होती. त्यानंतर तीन दिवसांनंतर ल्योन शहरातील एका चर्चच्या बाहेर झालेल्या एका गोळीबारात ग्रीक ऑर्थोडॉक्स पुजारी गंभीर जखमी झाला होता. व्हिएन्नामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचाही फ्रान्समध्ये झालेल्या हल्ल्याचा संदर्भ असल्याचे सांगण्यात येत आहे.

मालीमध्ये युनोची शांतीसेना मालीमध्ये युनोची शांतीसेना उपस्थित आहे. त्यामध्ये 13,000 सैनिकांचा समावेश आहे. युनोने त्यांच्या या मिशनला MINUSMA असे नाव दिले आहे. त्याचवेळी फ्रान्सने साहेल भागात त्यांचे 5000 सैन्य ठेवले आहे. माली हा देश मोठ्या प्रमाणावर दहशतवादाला बळी पडला आहे.

महत्वाच्या बातम्या:

फ्रान्समध्ये चर्चच्या बाहेर तीन लोकांची चाकूने हत्या, दहशतवादी हल्ल्याचा अंदाज

coronavirus | फ्रान्समध्ये कोरोनाची दुसरी लाट, पुन्हा एकदा देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sadabhau Khot Vs Sharad Pawar | सदाभाऊ आधी बरळले, आज दिलगिरीची भाषा Special ReportBharat Jodo Yatra Congress | भारत जोडो अभियानात 197 संघटना असल्याची माहिती Special ReportDonald Trump |  ट्रम्पचा विजय, भारतासाठी अच्छे दिन? Special ReportShah Rukh Khan Threat | आधी भाईजान आणि आता किंग खान, शाहरूख खानला जीवे मारण्याची धमकी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
Supreme Court on Government JOB : भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget