PAK मधील मसूद अजहरची टेरर फॅक्टरी उद्ध्वस्त, सॅटेलाईट फोटोमधून बेचिराख पाकिस्तानचे फोटो
Operation Sindoor Satellite Images: पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले असून यामध्ये अनेक दहशतवाद्यांचा खात्मा झाला. उपग्रह प्रतिमांमधून हल्ला झाल्यानंतर काय परिस्थिती झाली?

Operation Sindoor: भारताने 'ऑपरेशन सिंदूर'अंतर्गत पाकिस्तान आणि पिओके मध्ये दहशतवादी तळांना लक्ष्य करत आतंगवाद्यांचा बालेकिल्ला उद्ध्वस्त केला. भारताने केलेल्या हवाई हल्ल्यात ही दहशतवादी प्रशिक्षण आणि भरती केंद्रे बेचिराख झाली. यामध्ये मसूद अजहरच्या जैश-ए- मोहम्मदची टेरर फॅक्टरी उद्ध्वस्त केली. उपग्रह प्रतिमांमधून पाकिस्तानमध्ये झालेला विध्वंस स्पष्टपणे दिसून येत आहे.
भारतीय सैन्याने केलेल्या 'ऑपरेशन सिंदूर' नंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये प्रचंड तणाव वाढला आहे. . भारतीय हवाईदलाने एअर स्ट्राईक (Air Strike) करत पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले असून यामध्ये अनेक दहशतवाद्यांचा खात्मा झाला. उपग्रह प्रतिमांमधून हल्ला करण्यापूर्वी आणि हल्ला झाल्यानंतर काय परिस्थिती झाली हे पाहता येईल.

हल्ल्याच्या काही तासांनंतर, या उपग्रह प्रतिमांवरून असे दिसून येते की मंगळवारी रात्री भारताने निश्चित लक्ष्य ठेवून दहशतवादी तळ उद्ध्वस्त झाले आहेत. या उपग्रहात दिसणाऱ्या प्रतिमांमधून पाकिस्तानच्या बहावलपूरमध्ये जैश ए मोहम्मदचे मुख्य दहशतवादी प्रशिक्षण केंद्र सुभान अल्लाह कितपत उद्ध्वस्त झाले आहे हे दिसून येते. या मरकजच्या परिसरात बांधलेल्या मशिदींचे तिन्ही घुमट या हल्ल्यात उद्ध्वस्त झाले आहे, तर दोन घुमट शाबूत राहिल्याचं दिसून येतंय. 2100 चौरस मीटरपेक्षा जास्त क्षेत्रात पसरलेल्या या संकुलात सिंमेंट, उद्ध्वस्त झालेल्या इमारतींचे तुकडे असा खच पडलेला दिसून येतो.

दहशतवादाचा कणा मोडण्यासाठी भारतीय लष्कराने मंगळवारी मध्यरात्रीनंतर ऑपरेशन सिंदूरअंतर्गत पाकिस्तान आणि पिओकेमधील दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले. भारतीय लष्कर, हवाई दल आणि नौदलाच्या संयुक्त कारवाईअंतर्गत पाकिस्तान आणि पिओकेमधील ज्या नऊ दहशतवादी तळांवर हवाई हल्ले करण्यात आले. त्यात बहावलपूर, मुरीदके, गुलपूर, भिंबक, चक अमरू, बाग, कोटली, सियालकोट आणि मुझफ्फराबाद यांचा समावेश आहे.बहावलपूरमधील बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेचे जैश एक मोहम्मदचे मुख्यालय आणि मुरीदके येथील लष्कर-ए-तैयबाचे मुख्यालय लक्ष्य करण्यात आले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: या ऑपरेशनला ऑपरेशन सिंदूर असे नाव दिले. गेल्या आठवड्यात झालेल्या बैठकांमध्ये पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केले होते की पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांनी हिंदूंना लक्ष्य केले होते ज्यामुळे त्यांच्या पत्नींच्या कपाळावरचं कुंकू पुसलं गेलं. अशा परिस्थितीत भारताने कठोर संदेश द्यावा लागला की दहशतवाद्यांना अशा प्रकारे पळून जाऊ दिले जाऊ शकत नाही. भारतीय गुप्तचर संस्थेने हवाई हल्ल्यासाठी सर्व लक्ष्ये ओळखली होती. त्यानंतर लष्कर आणि जैशच्या तळांवर हल्ला करण्यात आला. मसूद अजहरची टेरर फॅक्टरी उद्ध्वस्त झालीय.
हेही वाचा:























