एक्स्प्लोर
Advertisement
उत्तर कोरियाकडून हायड्रोजन बॉम्बची चाचणी, जगात चिंतेचं वातावरण
उत्तर कोरियानं संगजीबायगाम भागात पुन्हा एकदा अणूचाचणी घेतली आहे. उत्तर कोरियाच्या या परिक्षणामुळं सध्या जागतिक वातावरण तापताना दिसत आहे.
प्याँगयांग : गेल्याच आठवड्यात जपानच्या भूभागावरुन मिसाईल सोडल्यानंतर, उत्तर कोरियानं आता अणूचाचणी केली आहे. कोरियाच्या सांगण्यानुसार हा हायड्रोजन बॉम्ब आहे. मात्र काही मीडिया रिपोर्टनुसार हा अणुबॉम्ब असल्याचं सांगण्यात येत आहे.
उत्तर कोरियाच्या संगजीबायगाम भागात या बॉम्बची चाचणी करण्यात आली. या बॉम्बची तीव्रता 6.3 मॅग्निट्यूड असल्याचं सांगण्यात येत आहे. जी आतापर्यंतची सर्वाधिक क्षमता आहे.
या चाचणीमुळं या परिसरात भूकंपाचे धक्केही जाणवल्याचं समजतं आहे. स्थानिक वेळेनुसार दुपारी 12.30 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले.
उत्तर कोरियाच्या या परिक्षणामुळं सध्या जागतिक वातावरण तापताना दिसत आहे. काहीच दिवसापूर्वी कोरियाचे पंतप्रधान किम जाँग उन यांनी या बॉम्बची पाहणी केली होती. याचे पाहाणीचे फोटो उत्तर कोरियाच्या केसीएनएने प्रसिद्ध केले होते. त्यानंतर संपूर्ण जगात एकच खळबळ उडाली होती.
दरम्यान, उत्तर कोरियाकडून मोठ्या प्रमाणात अणवस्त्रांची निर्मिती होत आहे. विशेष म्हणजे, या शस्त्रास्त्रांना बॅलिस्टिक अस्त्रांशी जोडलं जात आहे. गेल्याच वर्षी उत्तर कोरियाकडून 10 किलो टन वजनी बॉम्बचं परिक्षण करण्यात आलं.
पण आज परिक्षण करण्यात आलेल्या बॉम्बची तीव्रता 10 पटीनं जास्त असल्याचं सांगण्यात येत आहे.
संबंधित बातम्या
उत्तर कोरियाने जपानवरुन मिसाईल सोडलं, दोन्ही देशात तणाव
उत्तर कोरियासंदर्भातील ट्विटवरुन चिनी मीडियाची ट्रम्प प्रशासनावर आगपाखड
उत्तर कोरिया: बैठकीत लागली डुलकी, संरक्षण मंत्र्याना धाडलं यमसदनी!
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
निवडणूक
निवडणूक
मुंबई
Advertisement