(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nobel Prize : आर्थिक संकट आणि बँकांची भूमिका यासंबंधी संशोधन करणाऱ्या तीन अर्थतज्ज्ञांना सन्मान; अर्थशास्त्रातील नोबेल जाहीर
Nobel Prize in Economics : आपल्याकडे बँकिंग व्यवस्था का आहे आणि बँकिंग व्यवस्थेची घसरण आर्थिक पतनाला कशी कारणीभूत असते यावर या तीन शास्त्रज्ञांनी अभ्यास केला आहे.
स्टॉकहोम: यंदाच्या अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्काराची घोषणा (Nobel Prize) करण्यात आली असून बेन बर्नानके (Ben S. Bernanke), डगलस डायमंड (Douglas W. Diamond) आणि फिलिप डायविग (Philip H. Dybvig) या अमेरिकेच्या तीन शास्त्रज्ञांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. आर्थिक संकटाच्या वेळी अर्थव्यवस्थेमध्ये बँकांची भूमिका (for research on banks and financial crises) या संबंधित या शास्त्रज्ञांनी अभ्यास केला असून त्यासाठी या तीन शास्त्रज्ञांना हा पुरस्कार देण्यात येत असल्याचं नोबेल समितीच्या वतीनं सांगितलं गेलं.
BREAKING NEWS:
— The Nobel Prize (@NobelPrize) October 10, 2022
The Royal Swedish Academy of Sciences has decided to award the 2022 Sveriges Riksbank Prize in Economic Sciences in Memory of Alfred Nobel to Ben S. Bernanke, Douglas W. Diamond and Philip H. Dybvig “for research on banks and financial crises.”#NobelPrize pic.twitter.com/cW0sLFh2sj
बँकिंग व्यवस्था समजून घेणं, बँकांचे नियमन, बँकिंग संकट काळात आर्थिक व्यवस्थापन कसं असावं, या संकटाला कशा पद्धतीने तोंड द्यावं याचा अभ्यास या तीन शास्त्रज्ञांनी केला आहे.
आपल्या व्यवस्थेत बँकांची भूमिका काय, आर्थिक संकटाच्या काळात बँकांना कशा पद्धतीने कमी संवेदनशील करायचं याचा अभ्यास या तीन अर्थतज्ज्ञांनी केला आहे. तसेच बँकिंग व्यवस्थेते पतन हे अर्थव्यवस्थेला कशा पद्धतीने अडचणीत आणतं हे त्यांनी आपल्या अभ्यासातून दाखवून दिलं.
अर्थशास्त्राचा नोबेल नंतर सुरू
सर आल्फ्रेड नोबेल यांनी 1895 साली एक हक्कपत्र तयार केलं आणि कोणत्या क्षेत्रांमध्ये नोबेल पुरस्कार देण्यात यावी याची नोंद केली. त्यांच्या या यादीत सुरुवातील अर्थशास्त्रातील नोबेलची नोंद नव्हती. नंतरच्या काळात अर्थशास्त्राच्या नोबेल पुरस्काराची सुरुवात करण्यात आली.
The work for which Ben Bernanke, Douglas Diamond and Philip Dybvig are being recognised has been crucial to subsequent research that has enhanced our understanding of banks, bank regulation, banking crises and how financial crises should be managed.#NobelPrize pic.twitter.com/4drJwZ0yF9
— The Nobel Prize (@NobelPrize) October 10, 2022