एक्स्प्लोर

New Year Celebration : 'या' देशांनी सर्वात आधी केले नववर्षाचे जल्लोषात स्वागत; पाहा डोळे दिपवणारी आतषबाजी

New Year Celebration : भारतासह अनेक देशांमध्ये नवीन वर्षाची प्रतीक्षा केली जात असताना दुसरीकडे काही देशांमध्ये जल्लोषात 2024 या नव्या वर्षाचे स्वागत करण्यात आले.

World's First New Year Celebration : नव्या वर्षाची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत आहे. 31  डिसेंबरची मध्यरात्र जसजशी जवळ येत आहे, तसतसा नववर्षाच्या स्वागताचा (New Year Celebration) जल्लोषही वाढत आहे. मध्यरात्र उलटण्याच्या काही सेकंद आधी काउंटडाऊन मोजला जातो. भारतासह अनेक देशांमध्ये नवीन वर्षाची प्रतीक्षा केली जात असताना दुसरीकडे काही देशांमध्ये जल्लोषात 2024 या नव्या वर्षाचे स्वागत करण्यात आले. पॅसिफीक महासागरातील बेट देश, किरिबाटी, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियात या देशांमध्ये नवीन वर्षाचे स्वागत करण्यात आले आहे.

मध्य पॅसिफिक महासागरातील आंतरराष्ट्रीय तारीख रेषेच्या पूर्वेकडील किरिबाटी, नवीन वर्षाचे स्वागत करणारे पहिले होते. भारतीय वेळेनुसार, संध्याकाळी 5:30 वाजता येथे तारीख 1 जानेवारी 2024 झाली. याशिवाय आता टोंगा आणि समोआ बेटांवरही नवीन वर्षाचे स्वागत झाले आहे. न्यूझीलंडमध्ये 2024 हे वर्ष आधीच काही तासांपूर्वीच आले आहे. फिजी, ऑस्ट्रेलिया, जपान, दक्षिण कोरिया हे अल्पावधीतच नवीन वर्ष साजरे करणार आहेत. 

न्यूझीलंडमध्ये नवीन वर्षाचे स्वागत उत्साहात करण्यात आले. न्यूझीलंडमधील ऑकलंड येथे डोळे दिपावणारी आतषबाजी करण्यात आली. 

 

तर, कांगारुंचा देश ऑस्ट्रेलियातही नवीन वर्षाचे स्वागत दणक्यात करण्यात आले. ऑस्ट्रेलियातील सिडनी शहरात भव्य आतषबाजी करण्यात आली. ही आतषबाजी पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने लोकांनी गर्दी केली होती. सुप्रसिद्ध सिडनी हार्बर पुलावरील आतषबाजीने अनेकांचे भान हरपले. 

नवीन वर्षाची सुरुवात कशी झाली? 

इ.स.पूर्व 45 पूर्वी रोमन साम्राज्यात कॅलेंडर वापरात होते. रोमचा तत्कालीन राजा नुमा पॉम्पिलस याच्या वेळी, रोमन कॅलेंडरमध्ये 10 महिने, वर्षात 310 दिवस आणि आठवड्यात 8 दिवस होते. काही काळानंतर, नुमाने कॅलेंडरमध्ये बदल केले आणि जानेवारी हा कॅलेंडरचा पहिला महिना मानला. 1582 मध्ये ग्रेगोरियन कॅलेंडर सुरू झाल्यानंतर 1 जानेवारी रोजी नवीन वर्ष साजरे करण्याचा ट्रेंड सुरू झाला.

...म्हणून 1 जानेवारीला नवीन वर्ष साजरे करतात  

रोमन शासक ज्युलियस सीझर हा 1 जानेवारी रोजी नवीन वर्ष साजरा करणारा पहिला व्यक्ती होता. नवे कॅलेंडर तयार करण्यासाठी ज्युलियस सीझर यांनी काही खगोलशास्त्रज्ञांची भेट घेतली, त्यानंतर त्यांच्या असे लक्षात आले की पृथ्वी 365 दिवस आणि सहा तासांमध्ये सूर्याला एक फेरी मारतो. त्यामुळे जूलियसने 365 दिवसाचे एक वर्ष असणारे कॅलेंडर तयार केले. 

पोप ग्रेगरी यांनी  1582 मध्ये  जूलियस सीजरने तयार केलेल्या कॅलेंडरमधील लीप वर्षांची चूक शोधली. त्याकाळचे प्रसिद्ध धर्म गुरू सेंट बीड यांनी सांगितले की, एका वर्षात 365 दिवस, 5 तास आणि 46 सेकंद असतात. त्यानंतर रोमन कॅलेंडरमध्ये काही बदल करण्यात आले. तेव्हापासून नवं वर्ष 1 जानेवारीपासून साजरं केले जाऊ लागलं.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 18 January 2024Navi Mumbai Traffic Jam Due to Coldplay concert : नवी मुंबईत होच असलेल्या कोल्ड प्ले कार्यक्रमाचा वाहतुकीवर परिणाम, सायन- पनवेल हायवेवर वाहतूक कोंडीMaha Kumbh 2025 Ashutosh Maharaj 2025 : श्रीकृष्णजन्मभूमी मुक्तीसाठी आशुतोषजींचा लढा, महाकुंभमध्ये अखंड उभं राहून करतायत अनुष्ठानABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 18 January 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
Team India Announced for Champion Trophy 2025 : शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
India Squad For Champions Trophy Live : तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
Israeli attacks on Gaza : 50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
Embed widget