NeoCov Covid Variant : धक्कादायक! कोरोनाचा सर्वात घातक NeoCov स्ट्रेन; संक्रमित तीनपैकी एकाचा मृत्यू, चिनी शास्त्रज्ञांचा दावा
NeoCov Covid Variant : चीनमधील शास्त्रज्ञांनी कोरोनाच्या एका नव्या व्हेरियंटबाबत माहिती देत जगाला सावधानतेचा इशारा दिला आहे. हा आतापर्यंतचा सर्वात घातक विषाणू असल्याचं बोलले जात आहे.
NeoCov Covid Variant : चीनमधील शास्त्रज्ञांनी कोरोनाच्या एका नव्या व्हेरियंटबाबत माहिती देत जगाला सावधानतेचा इशारा दिला आहे. त्यामुळे एकीकडे कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंट आणि त्यांच्या स्ट्रेनचा कहर पाहायला मिळत असताना आता पुन्हा जगाची चिंता वाढली आहे. चीनमधील शास्त्रज्ञांनी NeoCov या नवीन स्ट्रेनबद्दल चेतावणी दिली आहे. NeoCoV स्ट्रेन आतापर्यंतचा सर्वात घातक प्रकार असल्याचं चीनी शास्त्रज्ञांनी सांगितलं आहे. हा नवा व्हायरस दक्षिण अफ्रिकेमध्ये आढळून आला आहे. शास्त्रज्ञांनी याबाबत चेतावणी देत म्हटले आहे की, याचे संक्रमण झालेल्या 3 पैकी 1 व्यक्तीचा मृत्यू होत आहे. तसेच हा झपाट्याने पसरतो. या नव्या स्ट्रेनला NeoCov असे नाव देण्यात आलं आहे.
रशियन वृत्तवाहिनीनुसार, स्पुटनिक यांच्या मते NoeCov हा कोणता नवा विषाणू नसून MERS-CoV विषाणू संबंधित जोडला आहे. याचा प्रथम शोध 2012 आणि 2015 रोजी मध्य पूर्वेकडील देशांमध्ये लागला होता. हा विषाणू SARS-CoV-2 प्रमाणेच आहे. जसे व्यक्तीला कोरोनाची लागण होते.
मिळालेल्या रिपोर्ट्सनुसार, हा विषाणूचे दक्षिण अफ्रिकेतील वटवाघळांमध्ये आढळला आहे. सध्या हा विषाणू फक्त जनावरांमध्ये फैलावत आहे. परंतु वैज्ञानिकांनी इशारा दिला आहे की, या विषाणूचे संक्रमण माणसाला सुद्धा होऊ शकतो. बायोरेक्सिव वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आलेल्या एका अभ्यासातून असे समोर आले आहे की, NeoCoV व्यक्तींना सुद्धा संक्रमित करु शकतो.
चीनी शास्त्रज्ञांच्या संशोधनाच्या मते, हा विषाणू अत्यंत धोकादायक आहे. NeoCoV मुळे संक्रमित प्रत्येक 3 पैकी एकाचा मृत्यू होत आहे. तसेच, कोरोनाच्या तुलनेत हा अधिक वेगाने पसरत आहे. रिपोर्टमध्ये असे म्हटले की, NeoCoV वर चीनने दिलेल्या एका स्पष्टीकरणानंतर रुस स्टेट वायरॉलजी अॅन्ड बायोटेक्नॉलॉजी रिसर्ज सेंटरच्या शास्त्रज्ञांनी गुरुवारी एक विधान जाहीर केले होते. विधानात असे म्हटले की, या व्हायरसवर लक्ष ठेवले जात आहे. तसचे या बद्दल अधिक अभ्यास करण्याची गरज आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
- Coronavirus Update : देशात कोरोनाची तिसरी लाट शिगेला? काय म्हणालं केंद्रीय आरोग्य मंत्रालय : वाचा सविस्तर
- Kim Jong Un : किम जोंग उनकडून शक्तिशाली देशांना धमकवण्याचा प्रयत्न? उत्तर कोरियाकडून नव्या वर्षात 6 क्षेपणास्त्र चाचण्या
- Viral New : सुरुंगाचा शोध घेणाऱ्या मागवा उंदराचा मृत्यू, हजारोंचे प्राण वाचवल्याबद्दल मिळालं होतं सुवर्ण पदक
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha