एक्स्प्लोर
डेनिस मुकवेगे आणि नादिया मुराद यांना शांततेसाठीचा नोबेल जाहीर
शांततेसाठी दिल्या जाणाऱ्या 2018 सालच्या नोबेल पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहेत. यावर्षी डेनिस मुकवेगे आणि नादिया मुराद यांना शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार दिला जाणार आहे
स्टॉकहोम | शांततेसाठी दिल्या जाणाऱ्या 2018 सालच्या नोबेल पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहेत. यावर्षी डेनिस मुकवेगे आणि नादिया मुराद यांना शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार दिला जाणार आहे. या दोघांनीही युद्धभूमीवर लैंगिक अत्याचारांचा वापर शस्त्रासारखा करण्याविरोधात लढा सुरु केला होता.
यावर्षीच्या शांततेसाठीच्या नोबेलसाठी एकूण 331 जणांना नामांकन देण्यात आलं होतं. यात 216 व्यक्ती तर 115 संघटनांचा समावेश आहे. 2016 साली शांततेसाठीच्या नोबेलसाठी 376 व्यक्तींना नामांकन देण्यात आलं होतं, त्यामुळे यावर्षी नामांकनासाठीची दुसरी सर्वात मोठी संख्या होती.
आतापर्यंत शांततेसाठी 98 नोबेल पुरस्कार देण्यात आले आहेत. ज्यात 104 व्यक्ती आणि 27 संघटनांचा समावेश आहे. एकूण 104 नोबेल विजेत्यांपैकी 16 महिलांना हा पुरस्कार मिळाला आहे.
2017 साली ICAN संस्थेला शांततेच्या नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. ही संस्था आण्विक शस्त्रांविरोधात काम करते. इंटरनॅशनल कँपेन टू एबोलिश न्यूक्लीअर वेपन्स असं या संस्थेचं पूर्ण नाव आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement