Morocco Earthquake : मोरोक्को हादरलं... भूकंपामुळे 1000 हून अधिक जणांचा मृत्यू, 700 लोक जखमी
Morocco Earthquake Updates : मोरोक्कोमध्ये भूकंपाचे जोरदार झटके बसले असून यामध्ये आतापर्यंत 1,037 लोकांना मृत्यू झाला आहे.
मोरोक्को : आफ्रिकन देश मोरक्कोमध्ये भीषण भूकंप झाला आहे. या भूकंपामुळे 1000 हून अधिक जणांचा मृ्त्यू झाला असून हजारो लोक जखमी झाले आहेत. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, मोरोक्कोमध्ये विनाशकारी भूकंपामुळे 1037 नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर, 700 हून अधिक लोक जखमी झाले असून अनेकांची प्रकृती गंभीर आहे. मोरक्कोमध्ये शनिवारी सकाळी जोरदार भूकंपाचे धक्के बसले.
मोरोक्को भूकंपामुळे 1000 हून अधिक जणांचा मृत्यू
मोरोक्कोच्या हाय अॅटलस पर्वत रांगेत 6.8-रिश्टर स्केलच्या भूकंपाचा झटका बसला. स्थानिक वेळेनुसार, शुक्रवारी रात्री उशीरा भूकंपाचे जाणवले. युनायटेड स्टेट्स जिऑलॉजिकल सर्व्हे (USGS) ने दिलेल्या माहितीनुसार, सुमारे 840,000 लोकांचे शहर असलेल्या माराकेचच्या नैऋत्येस सुमारे 72 किलोमीटर (44.7 मैल) भूकंपाचे केंद्र आहे. हे ठिकाण अतिशय लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. 18.5 किलोमीटर (11.4 मैल) खोलीवर या भूकंपाचा केंद्र आहे.
Factbox: Foreign reactions and offers of aid in response to Morocco earthquake https://t.co/9wcAmW0fEn pic.twitter.com/IowIBD3Dnz
— Reuters World (@ReutersWorld) September 9, 2023
शोध आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरु
मोरोक्कोमध्ये भीषण भूकंपानंतर युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. मृतांना ढिगाऱ्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरु आहे. यासोबतच शोधकार्यही सुरु आहे. अद्यापही शेकडो लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. ढिगाऱ्याखालून बाहेर काढलेल्या अनेकांना रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. पीडितांना मदत करण्यासाठी लोकांनी रक्तदान करावे असं आवाहन, आरोग्य अधिकार्यांकडून करण्यात येत आहे.
Reactions from foreign governments to earthquake in Morocco https://t.co/bHbTVibNHj pic.twitter.com/FbBsVpxAdI
— Reuters World (@ReutersWorld) September 9, 2023
मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती
मोरोक्कोमध्ये भूकंपामुळे येथे 1000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 672 जण गंभीर जखमी झाले आहेत. भूकंपाची तीव्रता 6.8 असल्याचं सांगण्यात येत आहे. ढिगाऱ्याखालून लोकांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. यूएस जिओलॉजिकल सर्व्हेच्या माहितीनुसार, भूकंप रात्री 11:11 वाजता (2211 GMT) माराकेशच्या नैऋत्येस 44 मैल (71 किलोमीटर) 18.5 किलोमीटर खोलीवर आला.
पंतप्रधान मोदी यांच्याकडून ट्वीट
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेवर ट्वीट करत संवेदना आणि दु:ख व्यक्त केलं आहे.
Extremely pained by the loss of lives due to an earthquake in Morocco. In this tragic hour, my thoughts are with the people of Morocco. Condolences to those who have lost their loved ones. May the injured recover at the earliest. India is ready to offer all possible assistance to…
— Narendra Modi (@narendramodi) September 9, 2023
महत्त्वाच्या इतर बातम्या :