एक्स्प्लोर

सेल्फीच्या कॉपीराईटसाठी कायदेशीर लढाई लढणाऱ्या माकडाचा पराभव

कॉपीराईटसाठी न्यायालयीन लढाई लढत असलेल्या नारुटो या माकडाचा पराभव झाला आहे. अमेरिकेतील न्यायालयाने त्याची याचिका फेटाळली आहे.

सॅन फ्रान्सिस्को : सध्याच्या टेक्नोसॅव्ही युगात अनेकांना सेल्फीची सवय अनेकांना जडली आहे. पण एका माकडानेही स्वत:चा सेल्फी काढून त्याच्या कॉपीराईटसाठी न्यायालयीन लढाई लढत असल्याचं प्रकरण गेल्या काही दिवसांपासून चांगलंच गाजत आहे. पण कोर्टात त्याची याचिका फेटाळून लावल्याने, न्यायालयीन लढाईत त्याचा पराभव झाला आहे.

वास्तविक, 2011 मध्ये इंडोनेशियाच्या जंगलात मकॉक प्रजातीमधील नारुतो नावाच्या माकडाने स्वत: चा सेल्फी काढल्याचा दावा करण्यात येत होता. या माकडाने न्यू साऊथ वेल्सच्या मोनमाउथशरमधील डेव्हिड स्टेलरच्या कॅमेऱ्यात स्वत: चा सेल्फी घेतला. यानंतर या फोटोच्या कॉपीराईटवरुन मोठा वाद निर्माण झाला होता. यात माकडाच्या वतीने पेटा या संस्थेने कोर्टात याचिका दाखल करुन, कॉपीराईटचा अधिकार माकडालाही दिला जावा अशी मागणी केली. पण न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावत, प्राण्यांना कॉपीराईटचा अधिकार देण्यास मनाई केली. वास्तविक, या प्रकरणात सुरुवातीपासूनच नारुटोच्या लिंगावरुन अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. पेटाचा दावा होता की, या फोटोतील माकड ही मादी जातीची आहे. तर फोटोग्राफर स्टेलरने नारुटो हा मॅकॉक प्रजातीमधील नर जातीचा माकड असल्याचं सांगितलं होतं. दरम्यान, न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावल्याने, फोटोग्राफर डेव्हिड स्टेलरचा विजय झाला आहे. पण तरीही या फोटोच्या विक्रीतून मिळणाऱ्या नफ्याचा 25 टक्के भाग देण्याची स्टेलरने तयारी दर्शवली आहे. ही रक्कम नारुटो आणि त्याची निगा राखणाऱ्या संस्थेला दान करण्यात येणार आहे. स्टेलर आणि पेटा या दोघांनी एक संयुक्त प्रेस रिलीज प्रकाशित करुन याबाबतची माहिती दिली. या प्रकरणावर पेटाचे वकील जेफ कर्र यांनी सांगितलं की, या याचिकेमुळे जगभरात प्राण्यांच्या अधिकाराबाबत चर्चा झाली.  तर फोटोग्राफर स्टेलरने सांगितलं की, मी स्वत: संरक्षणवादी आहे. फोटोमध्ये आवड वाढल्याने इंडोनेशियातील प्राण्यांना त्याचा फायदा झाला.

महत्त्वाच्या बातम्या

Indonesia Earthquake: इंडोनेशियात 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा अलर्ट, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश
इंडोनेशियात 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा अलर्ट, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश
Japan Rain: जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
Nuclear Attack : पाकिस्तान भारतावर अणुबॉम्ब हल्ला करणार; 'या' प्राध्यापकाचा मोठा दावा, या आधीची भविष्यवाणीही खरी ठरली
पाकिस्तान भारतावर अणुबॉम्ब हल्ला करणार; 'या' प्राध्यापकाचा मोठा दावा, या आधीची भविष्यवाणीही खरी ठरली

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs SL 1st Test DAY-1 Live : गॉलमध्ये भारताचा ऐतिहासिक 600वा कसोटी सामना; टॉसपासून प्रत्येक घडामोडीचे LIVE अपडेट्स
IND vs SL DAY-1 Live : गॉलमध्ये भारताचा ऐतिहासिक 600वा कसोटी सामना; टॉसपासून प्रत्येक घडामोडीचे LIVE अपडेट्स
PM Modi Independence Day speech: पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
Baba Vanga Prediction : बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना लागणार लॉटरी; नोकरीत मिळणार प्रमोशनची संधी? वाचा लकी राशी
बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना लागणार लॉटरी; नोकरीत मिळणार प्रमोशनची संधी? वाचा लकी राशी
Indonesia Earthquake: इंडोनेशियात 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा अलर्ट, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश
इंडोनेशियात 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा अलर्ट, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश
फाळणीच्या भयावह वास्तवाची कहाणी सांगणारे हे चित्रपट- सीरिज; ‘बटवारा 1947’ पाहण्याआधी नक्की पाहा हे 5 मास्टरपीस
फाळणीच्या भयावह वास्तवाची कहाणी सांगणारे हे चित्रपट- सीरिज; ‘बटवारा 1947’ पाहण्याआधी नक्की पाहा हे 5 मास्टरपीस
PM Modi Independence Day speech: भारताने आता लहान स्वप्नं बघून चालणार नाहीत, मोठी स्वप्नं आणि संकल्प केले तरच आपलं सामर्थ्य वाढेल: पंतप्रधान मोदी
भारताने आता लहान स्वप्नं बघून चालणार नाहीत, मोठी स्वप्नं आणि संकल्प केले तरच आपलं सामर्थ्य वाढेल: पंतप्रधान मोदी
Horoscope Today 15 August 2026 : आज स्वातंत्र्यदिनी 5 राशींना मिळणार कर्माचं पुण्य फळ; मार्गातील अडथळे होतील दूर, वाचा आजचे राशीभविष्य
आज स्वातंत्र्यदिनी 5 राशींना मिळणार कर्माचं पुण्य फळ; मार्गातील अडथळे होतील दूर, वाचा आजचे राशीभविष्य
Box office collection: सनी देओलच्या ‘बटवारा 1947’ला पहिल्याच दिवशी झटका; ‘आवारापन 2’समोर बॉक्स ऑफिसवर हालत खराब! किती कमावले?
सनी देओलच्या ‘बटवारा 1947’ला पहिल्याच दिवशी झटका; ‘आवारापन 2’समोर बॉक्स ऑफिसवर हालत खराब! किती कमावले?
Embed widget