Miss Universe : 'मिस युनिवर्स' स्पर्धेच्या आयोजकांचा ऐतिहासिक निर्णय; विवाहित आणि मुलं असणाऱ्या महिलांनाही होता येणार सहभागी
Miss Universe या स्पर्धेतील काही नियम बदलण्याचा निर्णय या स्पर्धेच्या आयोजकांनी घेतला आहे. आता या स्पर्धेत विवाहित आणि मुलं असणाऱ्या महिला देखील सहभागी होऊ शकणार आहेत.
Miss Universe : मिस युनिवर्स (Miss Universe) या सौंदर्य स्पर्धेमध्ये सहभागी होऊन तो हिऱ्यांचा मुकुट जिंकण्याचं स्वप्न अनेक तरुणी आणि महिला बघत असतात. मिस युनिवर्स हा किताब जिंकण्यासाठी अनेक देशातील मुली या स्पर्धेत सहभागी होतात. दरवर्षी होणाऱ्या या स्पर्धेचे काही नियम असतात. आता या स्पर्धेतील काही नियम बदलण्याचा निर्णय या स्पर्धेच्या आयोजकांनी घेतला आहे. आता या स्पर्धेत विवाहित आणि मुलं असणाऱ्या महिला देखील सहभागी होऊ शकणार आहेत. 2023 पासून हे नियम लागू केले जाणार आहेत.
आता महिलांचे स्वप्न होऊ शकणार पूर्ण
मिस युनिवर्स स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अविवाहित असणे आवश्यक होते. तसेच या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या महिलेनं मुलांना जन्म दिलेला नसावा, तिचं वय हे 18 ते 28 च्या दरम्यान असावे, असे नियम या स्पर्धेचे होते. ही स्पर्धा जिंकेपर्यंत त्या मुलीला हे नियम पाळावे लागत होते. पण आता हे नियम बदलण्याचा निर्णय मिस युनिवर्स स्पर्धेच्या आयोजकांनी घेतला आहे. आता 2023 मध्ये होणाऱ्या 72 मिस युनिवर्स स्पर्धेत विवाहित महिला आणि मुलं असणाऱ्या महिला देखील सहभागी होऊ शकणार आहेत. त्यामुळे आता कोणत्याही वयात किंवा लग्न झाल्यानंतरही महिला मिस युनिवर्स व्हायचे स्वप्न पूर्ण करु शकणार आहेत.
'मिस युनिव्हर्स 2020' नं बदललेल्या नियमांचे केले कौतुक
मेक्सिकोच्या मिस युनिव्हर्स 2020 विजेत्या अँड्रिया मेझाने नियमातील या बदलांचे कौतुक केले आहे. हे बदलेले नियम ऐकून आनंद झाला, असं तिनं एका मुलाखतीमध्ये सांगितलं. ती म्हणाले, समाजातही बदल होत आहेत. महिला सध्या अशा क्षेत्रांमध्ये काम करत आहेत जिथे केवळ पुरुषच काम करत होते. आता विवाहित महिला आणि मुलं असणाऱ्या महिला देखील या स्पर्धेमध्ये सहभागी होऊ शकणार आहेत.
भारताची हरनाज संधू ठरली मिस युनिवर्स
चंदीगढ गर्ल हरनाज संधूनं मिस युनिवर्स 2021 चा किताब पटकावला. 21 वर्षीय हरनाज संधूने नुकताच 'मिस दीवा मिस यूनिवर्स इंडिया 2021' किताब आपल्या नावे केला. त्यानंतर हरनाजने मिस युनिवर्स स्पर्धेची तयारी सुरु केली होती. हरनाज भारताची मान जागतिक स्पर्धेत उंचावत 'Miss Universer 2021' किताबाची मानकरी ठरली.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या:
- Miss France : 'मिस फ्रान्स' आयोजकांचा मोठा निर्णय; आता स्पर्धेत सहभागी होण्यास वयोमर्यादा नाही, बदलले हे नियम
- PHOTO : मिस युनिव्हर्स हरनाज संधूने लूक बदलला, ब्लॉण्ड हेअरमध्ये फोटोशूट