Miss France : 'मिस फ्रान्स' आयोजकांचा मोठा निर्णय; आता स्पर्धेत सहभागी होण्यास वयोमर्यादा नाही, बदलले हे नियम
'मिस फ्रान्स' (Miss France) या स्पर्धेचे काही नियम आता बदलण्यात आले आहेत.
Miss France : 'मिस फ्रान्स' (Miss France) ही युरोपमधील (Europe) प्रसिद्ध सौंदर्य स्पर्धा आहे. अनेक तरुणी या स्पर्धेमध्ये सहभागी होतात. या स्पर्धेच्या आयोजकांनी नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. स्पर्धेचे काही नियम हे आता बदलण्यात आले आहे. आता कोणत्याही वयोगटातील महिला तसेच मुलाला जन्म दिलेल्या महिल्या या स्पर्धेक सहभागी होऊ शकणार आहेत. आत्तापर्यंत या स्पर्धेक 24 वर्षांपेक्षा कमी वय असणाऱ्या मुली, तसेच अविवाहित आणि मुलाला जन्म न दिलेल्या महिलाच या स्पर्धेत भाग घेऊ शकत होत्या. आता हे सर्व नियम बदलण्यात आले आहे.
हे नियम बदलले नाहीत
'मिस फ्रान्स' मध्ये सहभागी घेण्यासाठी महिलेची उंची ही पाच ते सात फूट असणं आवश्यक आहे तर स्पर्धेच्या दरम्यान स्पर्धकानं वजन वाढवू नये. हा 'मिस फ्रान्स' स्पर्धेचा नियम बदलण्यात आलेला नाही. तसेच हेअर स्टाई बदलण्यास, टॅटू दाखवण्यास 'मिस फ्रान्स' स्पर्धेमध्ये मनाई आहे.
मिसफ्रान्स संस्थेच्या प्रमुख अॅलेक्सिया लारोचे-जौबर्ट यांनी बदललेल्या नियमांबाबत सांगितलं, ' मी स्वत: एक आई आहे. आई असतानाच मी करिअर केले आहे. त्यामुळे या बदलांची गरज होती.' फ्रान्सच्या समानता मंत्री एलिजाबेथ मोरेनो यांनी गेल्या वर्षी 'मिस फ्रान्स' या स्पर्धेचा उल्लेख अप्रचलित आणि भेदभाव करणारी स्पर्धा असा केला होता. तसेच या स्पर्धेला त्या 'बॅकवर्ड' म्हणत या स्पर्धेच्या नियमांवर टीका केली होती. पॅरिसमध्ये राहणारी 24 वर्षीय डायन लेयर ही मिस फ्रान्स 2022 ची विजेते आहे. स्पर्धेबाबत टीका करणाऱ्यांना उत्तर देत डायननं ती फेमिनिस्ट असल्याचं सांगितलं होतं. गेल्या वर्षी, या स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच एका ट्रान्सजेंडर स्पर्धकानं सहभाग घेतला होता. आता इतर सौंदर्य स्पर्धांचे नियम देखील बदलले जाऊ शकतात का? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
हेहा वाचा:
- Manushi Chillar: मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरचा नवा लूक; पाहा ग्लॅमरस फोटो!
- Miss World 2021 : यंदाची मिस वर्ल्ड पोलंडची कॅरोलिना! मिस इंडिया टॉप 6 मध्येही स्थान मिळवू शकली नाही
- PHOTO : पहिल्याच चित्रपटासाठी फिल्मफेअर पटकावणाऱ्या ‘मिस युनिव्हर्स’ लारा दत्ताबद्दल ‘या’ गोष्टी माहितीयेत का?